१५ मार्च, २०१२

Vonage World – एक सुवर्णसंधी !

( शॉर्ट ब्रेक घेतीय जरा प्रवासवर्णनातून.. किटकॅट खाऊन घ्या तुम्ही तोपर्यंत !! :eat: )
भारताबाहेर राहणार्‍या लोकांना हे पोस्ट उपयोगी जास्त आहे.
भारतात कॉल करण्यासाठी तुम्ही काय वापरता? रिलायन्स, स्काईप, याहू वगैरे?
आम्हीही तेच करत होतो इतके दिवस. पण तिकडून आईबाबांना कम्प्युटरवर ताटकळत ठेवण्यात, एखादी अडचण आली की फोनवरून ती सॉल्व्ह करत बसण्यात काही अर्थ नाही असं दिसल्याने मेसेंजर्सचे पर्याय कमी केले.. रिलायन्स आहे खरं चांगले, पण दोन घरी फोन झाले की बाकी ठिकाणी फोन होण्याचे चान्सेस फारच कमी! त्यामुळे आम्ही सारखे पर्याय शोधतच होतो…

Finally We Have Got The Solution !


Vonage
महीन्याभरापूर्वी Vonage च्या Vonage World या स्कीमची घोषणा झाली व आम्ही इकडेतिकडे चौकशी करून ती घेऊन टाकायचा विचार केला. (Unlimited Calls in USA and Puerto Rico, and Free calls to Landlines and Cellphones in 60 other countries, including India !) whoo..hooo.. ! रेफरलसुद्धा मिळाले [ रेफरल घेतल्यावर ज्याने रेफरल पाठवले आहे त्याला व आपल्याला पहीले २ महीने फ्री मिळतात.. ] व पुढच्या आठवड्यातच ( म्हणजे आत्ताच्या गुरूवारी) पॅकेज घरी आले सुद्धा. पटपट सेटींग्स करून टाकली, आधी सेलफोन्सवर फोन करून पाहीले तर लॅग काहीच नव्हता, पण साऊंड क्वालिटी बेक्कार वाटली! :( मग जरा शोधाशोध केल्यावर कळले, Vonage च्या अकाउंट्समधे जाऊन ती चेंज करता येते. मग ती हाय वर ठेवली आणि सगळे ऍडप्टर्स , मोडेम्स एकमेकांपासून लांब ठेवले!( काय पण नाटकं ना?) पण हे केल्यावर क्वालिटी एकदम सुधारली! व आम्ही भारतात पहाट होण्याची वाट पाहात बसलो. :)
पहाट झाली, घरी, मैत्रिणींकडे , नातेवाईकांकडे भरपूर फोन्स केले, गप्पा मारल्या, अगदी एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या सारखा आवाज, लॅग नाही.. सेलफोन सारखा रेंज / सिग्नलचा प्रॉब्लेम नाही! एकदमच भारी झाले की काम!! :clap:
Vonage Residential Plans : Vonage World येथे जाऊन हा प्लॅन चेक करा. अतिशय उत्तम संधी आहे !
[ अरे हो.. तुम्ही जर तुमचे नाव, इमेल पत्ता इत्यादी कळवलेत तर मी रेफरल इमेल पाठवू शकेन. अर्थात आधी मित्र-मंडळींना पाठवणे चालले आहे. शिवाय असे किती रेफरल्स पाठवता येतात हे सुद्धा पाहीले पाहीजे. पण जमले, तर मी जरूर मदत करीन! ]
टिप्पणी पोस्ट करा

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...