पोस्ट्स

August, 2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

books

इमेज
टिना फे चे बॉसीपँट्स वाचून झाले. अशक्य करमणूक आहे. मी खूप दिवसांनी पुस्तक वाचताना मोठ्यांदा हसले.
पण तरी साधारण पाऊण पुस्तक झाल्यावर किंचित बोर झाले. बहुतेक पुस्तकाचा फॉर्मॅट तसा आहे. फार काही नीट चरित्रासारखा लहानपण म्ग नोकरी असा ग्राफ नाहीये. नक्की नाही माहित पण नंतर जरा अनॉय्ड झाले की काय पॉईंट आहे नक्की..
पण ते सोडल्यास प्युअर धमाल! मी फारसा टीव्ही पाहात नसल्याने मला टिना फे केवळ नावानेच माहित होती. आणि ओझरते ऐकले होते की तिने सेरा पेलिनची नक्कल असलेले स्किट केले होते वगैरे. ते सर्व भाग वाचायला, रायटर लोकांचं रूटीन कसं असतं, सॅटर्डे नाईट लाइव्ह, ३० रॉक वगैरे शोजबद्दल माहिती/गॉसिप असे वाचायला छान वाटले.
मी आता ३० रॉक बघायला सुरवात केली आहे.  दुसरे चिंगुले पुस्तक संपवले ते म्हणजे 'माय साईनफिल्ड यिअर' बाय फ्रेड स्टोलर. पुस्तकाची सुरवात अशी आहे की कोण हा फ्रेड स्टोलर. तर तो असा माणूस आहे की तुम्ही त्याला नावाने ओळखायचा नाहीत पण फोटो पाहिला तर चेहरा खूप ओळखीचा वाटेल पण तरीही तो कोण हे नक्की सांगता येणार नाही! हे वर्णन वाचून माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला आणि गुगल केले तर तो बरोब…

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!)
तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी!
बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात!
____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्यावर, स्ट…

Coming clean - Kimberly Rae Miller

मी फार महिने हे पुस्तक वाचत होते. एकावेळेस जास्त वाचू शकत नव्हते म्हणून इतका वेळ लागला. कमिंग क्लीन बाय किंबर्ली रे मिलर. होर्डर आईबाबांची मुलगी. अत्यंत हॉरीबल बालपण गेले हिचे. होर्डींगची कदाचित सगळ्यात वाईट स्टेज असेल हिचे पालक म्हणजे. ह्या पुस्तकातली वर्णनं अंगावर येतात. (नुसत्याच साठलेल्या वस्तूच नव्हेत, पण कुजलेले अन्नपदार्थ, फ्लीज, बग्ज, प्लंबिंग चालत नसल्याने बाथरूम्स नॉन फंक्शनल, ह्या सर्व परिस्थितीमुळे येणारे हाऊस अरेस्ट फिलिंग, केऑस फिलिंग - कॅन्ट हॅव एनिबडी ओवर सिंड्रोम. आणि व्हॉट नॉट!) पण ती मुलगी ते अ‍ॅक्चुअली अनुभवत होती ह्या विचाराने अत्यंत वाईट वाटत होते. फार मुश्किलीने वाचले हे पुस्तक. पण मला उत्सुकता होती की तिचे आई बाबा सुधारतात का किंवा ती मुलगी हे सर्व कसं कोप करते इत्यादी. खूप एगेजिंग आहे पुस्तक, पण फार त्रास होतो वाचायला. किंबर्ली मोठी झाल्यावर, स्वतंत्र राहू लागल्यावरचे भाग फार नीटच तिची ओढाताण दाखवतात. चांगले आहे पुस्तक. अनमॅनेज्ड मेंटल डीसॉर्डर्स किती थराला जाऊ शकतात हे वाचून थरकाप झाला. मी आयुष्यात परत स्वतःला होर्डर म्हणून घेणार नाही. मला तशी फार सवय होती. …