मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पुस्तक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

GTD - Getting things Done

सध्या प्रॉडक्टीव्हिटीचा फीवर चढला आहे तर त्या एरियातले बायबल वाचायला घेतले आहे. गेटींग थिंग्ज डन - डेव्हिड अ‍ॅलन. मला खूप आवडत आहे. जीटीडी मेथडॉलॉजीशी ओळख माझी विविध टूडू अ‍ॅप्स मुळे आधीच होती. आता मूळ मेथडॉलॉजीचा जनक त्याबद्दल काय म्हणतोय मुळात ते वाचायला छान वाटतंय.  मुळात जीटीडीचा आधार आहे क्कोअर- म्हणजे कॅप्चर,क्लॅरिफाय,ओर्गनाईझ,रिफ्लेक्ट, एंगेज.   १) कॅप्चरः (collect what has your attention) डोक्यातील सर्वच्या सर्व थॉट्स ओता. ह्यासाठी जीटीडीमध्ये इनबॉक्स ही फॅसिलिटी असते. त्यात अक्षरश: दिवसभरात जेजे डोक्यात येईल ते नोंदवत राहयचे. काय आहे ती गोष्ट, टूडू आहे की इव्हेंट, की जनरल ऐकलेली इंटरेस्टींग माहिती त्याच्याशी आत्ता काही देणंघेणं नाही.   २) क्लॅरिफाय: (process what it means) म्हणजे जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा इनबॉक्स उघडून एक एक गोष्ट बघायची. ही गोष्ट्/आयटेम अ‍ॅक्शनेबल आहे की नाही? अ‍ॅक्शनेबल असेल व जर ती २ मिनिटाच्या आत करता येणार असेल तर लगेच करून टाका. दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ती त्या स्पेसिफिक कप्प्यात/ प्रोजेक्टमध्ये/ फोल्डरमध्ये ढकल...

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!) तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी! बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात! ____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्...

Coming clean - Kimberly Rae Miller

मी फार महिने हे पुस्तक वाचत होते. एकावेळेस जास्त वाचू शकत नव्हते म्हणून इतका वेळ लागला. कमिंग क्लीन बाय किंबर्ली रे मिलर. होर्डर आईबाबांची मुलगी. अत्यंत हॉरीबल बालपण गेले हिचे. होर्डींगची कदाचित सगळ्यात वाईट स्टेज असेल हिचे पालक म्हणजे. ह्या पुस्तकातली वर्णनं अंगावर येतात. (नुसत्याच साठलेल्या वस्तूच नव्हेत, पण कुजलेले अन्नपदार्थ, फ्लीज, बग्ज, प्लंबिंग चालत नसल्याने बाथरूम्स नॉन फंक्शनल, ह्या सर्व परिस्थितीमुळे येणारे हाऊस अरेस्ट फिलिंग, केऑस फिलिंग - कॅन्ट हॅव एनिबडी ओवर सिंड्रोम. आणि व्हॉट नॉट!) पण ती मुलगी ते अ‍ॅक्चुअली अनुभवत होती ह्या विचाराने अत्यंत वाईट वाटत होते. फार मुश्किलीने वाचले हे पुस्तक. पण मला उत्सुकता होती की तिचे आई बाबा सुधारतात का किंवा ती मुलगी हे सर्व कसं कोप करते इत्यादी. खूप एगेजिंग आहे पुस्तक, पण फार त्रास होतो वाचायला. किंबर्ली मोठी झाल्यावर, स्वतंत्र राहू लागल्यावरचे भाग फार नीटच तिची ओढाताण दाखवतात. चांगले आहे पुस्तक. अनमॅनेज्ड मेंटल डीसॉर्डर्स किती थराला जाऊ शकतात हे वाचून थरकाप झाला. मी आयुष्यात परत स्वतःला होर्डर म्हणून घेणार नाही. मला तशी फार सवय होती...

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे श...
गेले काही महीने मस्त गेले.. नवर्‍याने बरीच पुस्तकं आणली भारतातून.. ती वाचण्यात मस्त वेळ गेला. मुक्काम-गौरी देशपांडे, इजिप्तायन,मेक्सिकोपर्व - डॉ. मीना प्रभु, माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, हसरे दुख्ख - भा.द. खेर (मागे एकदा चार्ली चॅप्लिनचे पुस्तक वाचल्यावर पोस्ट लिहीली होती, तेव्हा खूप जणांनी याचे नाव घेतले होते.. आवडले..पण बेस्ट नाही वाटले! अनुवाद आहे कळते,काही भाग इतका विनोदी पद्धतीने उरकला आहे! असो..) त्यानंतर वाचले वपुंचे एक पुस्तक-नाही आवडले विशेष, मला त्यांचे महोत्सव आवडलंय तितकं बाकीचे नाही आवडणार बहुतेक.. पुलंची ऑल टाईम फेव पुस्तकं वाचून झाली, आता गाडी वळाली पानिपत !  ऐतिहासिक पुस्तकं/कादंबर्‍या वाचण्याविषयी माझं जरा त्रांगडं झालंय ! मी सिरीअसली वाचायची सुरवात केली ’श्रीमान योगी’ पासून.. अज्जुन आठवतंय मला! बाबा तेव्हा सोलापुरला होते. त्यांच्या ऑफीसच्या गेस्टहाऊस मधे आम्ही राहायचो जेव्हा जायचो तेव्हा.. मला माहीतीय जागांची वर्णनं असं लिखीत स्वरूपात वाचणे फार त्रासदायक आहे! पण मी लिहीणार ! :) मी ते कधीही विसरणार नाही, तरी मला ते परत परत सांगायला, लिहायला आवडते.. :...