पोस्ट्स

जुलै, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॉंग ड्राईव्ह.. !

इमेज
काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला.. लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्‍याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते! काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर

ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

इमेज
"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:.. "अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा "हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :(" "ह्म्म.." "ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...." "असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) " "हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त द
गेले काही महीने मस्त गेले.. नवर्‍याने बरीच पुस्तकं आणली भारतातून.. ती वाचण्यात मस्त वेळ गेला. मुक्काम-गौरी देशपांडे, इजिप्तायन,मेक्सिकोपर्व - डॉ. मीना प्रभु, माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, हसरे दुख्ख - भा.द. खेर (मागे एकदा चार्ली चॅप्लिनचे पुस्तक वाचल्यावर पोस्ट लिहीली होती, तेव्हा खूप जणांनी याचे नाव घेतले होते.. आवडले..पण बेस्ट नाही वाटले! अनुवाद आहे कळते,काही भाग इतका विनोदी पद्धतीने उरकला आहे! असो..) त्यानंतर वाचले वपुंचे एक पुस्तक-नाही आवडले विशेष, मला त्यांचे महोत्सव आवडलंय तितकं बाकीचे नाही आवडणार बहुतेक.. पुलंची ऑल टाईम फेव पुस्तकं वाचून झाली, आता गाडी वळाली पानिपत !  ऐतिहासिक पुस्तकं/कादंबर्‍या वाचण्याविषयी माझं जरा त्रांगडं झालंय ! मी सिरीअसली वाचायची सुरवात केली ’श्रीमान योगी’ पासून.. अज्जुन आठवतंय मला! बाबा तेव्हा सोलापुरला होते. त्यांच्या ऑफीसच्या गेस्टहाऊस मधे आम्ही राहायचो जेव्हा जायचो तेव्हा.. मला माहीतीय जागांची वर्णनं असं लिखीत स्वरूपात वाचणे फार त्रासदायक आहे! पण मी लिहीणार ! :) मी ते कधीही विसरणार नाही, तरी मला ते परत परत सांगायला, लिहायला आवडते.. :) गे