मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Timepass लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला! सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा! ही काय नाहीतर ती काय.. १०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला ! जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला. अरे पण हे काय ! असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही. नावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना? समुद्र म्ह...

टॅग – टॅग ..

नमस्कार वाचकहो.. सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही! असो.. आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग कमेंट्स पाहताना लक्षात आले की , मंदार आणि अनिकेत* या दोघा ब्लॉगर्सनी मला एका प्रश्नावलीसाठी टॅग केलं आहे त्यामुळे ते कळल्याबरोबर व वेळ मिळाल्याबरोबर लगेचच ब्लॉग उघडला.. * एक छोटी मिस्टेकची दुरूस्ती .. मंदार आणि विरेंद्र या दोघांनि टॅग केले होते. कमेंट्स पाहून लेख लिहायला घेईपर्यंत नावांचा गोंधळ केला.. ८-१० दिवसांत नियमित ब्लॉगिंग सुरू होईलच असे दिसते आहे.. तेव्हा भेटू परत.. तोवर ही माझी उत्तरं ! 1.Where is your cell phone? माझ्या डाव्या हाता जवळ.. 2.Your hair? काळे-कुरळे… 3.Your mother? Defense employee. थोडक्यातच लिहीते – “माझा आदर्श” ! 4.Your father? M.com, L.L.B, C.A. Apart from being proud of my successful HR – Finance Director Dad, I always wondered how did Baba manage to conquer all these degrees...

मराठी Blogs, ब्लॉगविश्व इत्यादी

तुम्हा वाचकांना माझ्या एकंदरीत Blogging Activity वरून एक समजले असेल. मी हल्ली खूप लिहीते. कधीकधी भंगारही लिहीते. कधी विषय असे धुमकेतूसारखे उगवतात, कधी मी एकदम Technical होते. आणि कायमच Blog Templates/ Themes आणि Widgets च्या शोधात असते. थोडक्यात मी या ब्लॉग्स प्रकरणात पूर्णपणे बुडून गेले आहे. मी हल्ली मराठी फोरम्सवर पडिक राहणे टाळत असून खूप खूप इतर इंटरनेटवर वाचत आहे. [ मराठी फोरम्समधे काही राम नाही हे माझे बहुमूल्य मत देखील नोंदवून टाकते! :D अर्थातच मायबोली हा अपवाद! ]असो. तर सांगण्याचा मुद्दा हा, की फोरम्सपेक्षा ब्लॉग्स हे जास्त उपयोगी वाटू लागले आहेत मला. एकतर काय वाचायचे हे आपल्या हातात राहते. उगीच समोर येईल ते वाचणे, मग ते भडक विधाने दिसली की आपला माथा भडकणे, हिरीरीने भांडणे करणे यापेक्षा आपल्यास जी माहीती हवी आहे तीच शोधून तीच्याबद्दल वाचणे फार उत्तम! गेल्या काही दिवसात मी खूप इंग्रजी ब्लॉग्स देखील वाचले. बरेचसे टेक्निकल. SEO [Search Engine Optimization] , How to make money online?, Blogging tips वगैरे जास्त होते. प्रत्येक ब्लॉग हा; उत्तमरित्या सजवलेला, उपयोगी आणि खर...