पोस्ट्स

ऑक्टोबर, २००७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेन-स्केच

इमेज
(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

नेनचिम!

इमेज
काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... ! खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!) नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि