मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विचार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी. सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.  नंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.   स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. एखाद्या प्रचंड मोठ्या...

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे श...

काय बोलत असतील ती दोघं?

आज बाहेरची कामं आटोपून घरी येताना सिग्नलला थांबले होते. सहज बसस्टॉपकडे नजर गेली तर एक वेगळंच दृश्य दिसले. इकडे लॉस एंजिलीसमध्ये बसस्टॉपपाशी खूप होमलेस लोकं दिसतात. (आय मिन एकाच स्टॉपपाशी खूप लोकं नव्हे. जनरल पूर्वीच्या गावापेक्षा इकडे होमलेस जास्त दिसतात. एखाद्या स्टॉपवर, डिव्हायडरवर एखाद-दुसराच माणूस असतो..) जवळच एखादी बेवारशी शॉपिंग कार्ट, त्यात अठरापगड गोष्टी असतात. कोणीतरी एखादे गरम जॅकेट वा कम्फर्टर दिले असते ते घेऊन तो माणूस बसलेला असतो.. क्वचित स्त्रियाही असतात. इथे एक वेगळंच आहे. आपण भारतात असताना सरसकट रस्त्यावरच्या लोकांना भिकारी म्हणतो. इथे तसे होत नाही. इथे होमलेस म्हणतात. होमलेस लोकं पुअर, जॉबलेसही असू शकतात पण क्वचित कधी त्यांना व्यवस्थित नोकर्‍याही असू शकतात. राहायला मात्र जागा नसते. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जवळच्या बसस्टॉपपाशी राहणारा माणूस मी जाते त्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये शॉपिंग करतो. आय मिन एखादेच काहीतरी कॅन्ड फुड वगैरे. पण तोही दिसतो मला तिथे.. एनीवे.. तर हा होमलेस माणूस, जुनेच पण एकंदरीत परिस्थितीशी फटकून असलेले सोनेरी बटणांचे क्वॉड्राय जॅकेट घालून, ड...

व्हर्चुअल की रिअल?

भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते? माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते.  एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?"  दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्र...

विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय..  ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला.. मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे ...

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :) ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड! ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :))) तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं...

ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:.. "अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा "हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :(" "ह्म्म.." "ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...." "असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) " "हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त द...

दगडावर कोरलेले क्षण..

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! :) अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून राहायचे.. पण आपोआप एक हसू फुटायचे आणि मग आई बाबांना समजायचे की मी जागीय! :) तरीही मी पुढे लोळत पडायचे.. मग त्या लाडाची जागा आधी ४-४ दा हाका मारण्यात, नंतर ओरडण्यात .. क्वचित एखाद्या धपाट्यात व्हायची! :) काहीही असलं तरी तो क्षण मला खूप आवडायचा! तसेच दादा उठवायला आला की तो प्रथम माझ्याबरोबर झोपून टाकायचा, आणि मग १५ मिनिटांना उठून पायाला ओढून रेल्वे रेल्वे खेळून उठवायचा! ते ही भन्नाट! शाळेत असतानाची हिवाळ्यातली सकाळ.. ती कडाकडा दात वाजवणारी थंडी मला अजुनही आवडते.. (तिचा कितीही त्रास झाला तरी!) लहानपणी मामा अमेरिकेतून पेपरमेट्सची पेनं आणायचा ढीगभर! त्याचा तो गुळगुळीत आणि स्लीम स्पर्ष अजुन हातात आहे! परवा मुद्दाम जाऊन घेऊन आले पेपर...