पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे शक्यच नव्ह