मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आवडलेले काही.. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

GTD - Getting things Done

सध्या प्रॉडक्टीव्हिटीचा फीवर चढला आहे तर त्या एरियातले बायबल वाचायला घेतले आहे. गेटींग थिंग्ज डन - डेव्हिड अ‍ॅलन. मला खूप आवडत आहे. जीटीडी मेथडॉलॉजीशी ओळख माझी विविध टूडू अ‍ॅप्स मुळे आधीच होती. आता मूळ मेथडॉलॉजीचा जनक त्याबद्दल काय म्हणतोय मुळात ते वाचायला छान वाटतंय.  मुळात जीटीडीचा आधार आहे क्कोअर- म्हणजे कॅप्चर,क्लॅरिफाय,ओर्गनाईझ,रिफ्लेक्ट, एंगेज.   १) कॅप्चरः (collect what has your attention) डोक्यातील सर्वच्या सर्व थॉट्स ओता. ह्यासाठी जीटीडीमध्ये इनबॉक्स ही फॅसिलिटी असते. त्यात अक्षरश: दिवसभरात जेजे डोक्यात येईल ते नोंदवत राहयचे. काय आहे ती गोष्ट, टूडू आहे की इव्हेंट, की जनरल ऐकलेली इंटरेस्टींग माहिती त्याच्याशी आत्ता काही देणंघेणं नाही.   २) क्लॅरिफाय: (process what it means) म्हणजे जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा इनबॉक्स उघडून एक एक गोष्ट बघायची. ही गोष्ट्/आयटेम अ‍ॅक्शनेबल आहे की नाही? अ‍ॅक्शनेबल असेल व जर ती २ मिनिटाच्या आत करता येणार असेल तर लगेच करून टाका. दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ती त्या स्पेसिफिक कप्प्यात/ प्रोजेक्टमध्ये/ फोल्डरमध्ये ढकल...

'मेरू'

काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होत...

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!) तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी! बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात! ____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्...

Into the wild (चित्रपट)

Into the wild खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव. रूतून बसले होते अगदी. इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात. नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही. एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला. लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द.. There is a pleasure in the pathless woods, There is a rapture on the lonely shore, There is society, where none intrudes, By the deep sea, and music in its roar: I love not man the less, but Nature more. आणि सुरू झाला प्रवास, I...

व्हर्चुअल की रिअल?

भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते? माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते.  एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?"  दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्र...

माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)

मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.  आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं  पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)  ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच...

आह.. साझ !

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली! आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या! किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता. तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे. शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये. झाकीर हुसेनचे संगीत !!!! झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून! एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता. व नंतर अगणित वेळा पाहिला. कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व...

तो पाऊस.. हा पाऊस..

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय. रवीवारपासून शुक्रवार पर्यंत. रस्त्यावर तळी साचली आहेत.. जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. ! का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही! माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! ) आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद.. लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो! वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता.. पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी...