पोस्ट्स

मे, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपेक्षाभंग!!! ... :|

इमेज
huh, पाहीला एकदाचा वळू ! इतकी हैराण झाले होते मी ऑनलाईन मिळत नाही म्हणून.. पण मिळाला, आणि अगदी उत्साहाने बसले पाहायला.. नाही आवडला मला.. :( कदाचित खूपच अपेक्षा वाढल्या होत्या त्या पिक्चरच्या चर्चेने.. म्हणून असेल.. पण तितका नाहीच आवडला.. ह्म्म आता तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.. पिक्चर ’बघायला’ मस्त वाटतो.. गावतलं वातावरण,ते राजकारण मस्त घेतलंय.. पण ज्या बद्दल आहे पिक्चर तो वळू, म्हणजे देवाला वाहीलेला, माजलेला बैल.. तो किती शांत दाखवावा? नुस्ता आपला इकडुन तिकडे फिरतोय.. आणि म्हणे डुरक्याचा लई त्रास.. तितका त्रासदायक नाहीच वाटला तो.. [ गोड आहे उलट! :))) ] आणि त्याचा सस्पेन्स तो किती! मला वाटलं चांगला मोट्ठा असणार, त्याला पकडणं खूप अवघड जाणार .. कसलं काय.. १०-५ पावलांवरून ते इंजेक्शन मारतात.. इतकी लोकं पळत , दंगा करत येतात, त्या आवाजाने बैल ढिम्म हलत नाही! ही लोकं इंजेक्शन कधी मारतायत अशी वाट पाहात उभा राहीलेला वाटतो.. असो.. ते डॉक्युमेट्री घेणं वगैरे मला विनोदी वाटलं.. आणि दिलीप प्रभावळ्कर अजिबात विनोदी नाही वाटला.. काहीच्या काही घुसडलीयेत काही काही लोकं! दिलिप प्रभावळकर, अमृता सुभाष आण

मोर !

इमेज
मागच्या वर्षी केलेले वारली चित्र.. कापडावर अक्रेलिक पेन्ट वापरून काढले आहे .. चित्र सम्पूर्ण बसत नाही, त्यावर क्लिक केले तर दिसेल ..

चिल्ड्रेन ऑफ हेवन...!

इमेज
काल चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला.. खूप ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून पाहायचा होता.. फार आवडला मुव्ही.. स्टोरी काय माहीतीच असेल सगळ्यांना, आणि मला परीक्षणं लिहीता येत नाहीत.. म्हणून फार नाही लिहीत.. पण मनात आलं ते उतरवतीय.. सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची इतकी सवय झाली होती, की हा पिक्चर पाहताना इतकं शांत आणि वेगळं वाटलं.. साधी पण सुंदर कथा.. साधं चित्रीकरण, साध्या लोकेशन्स..फार बरं वाटलं असं पाहून.. (सुरवातीला ते मीठ विकणार्या माणसाचं ओरडणं ऐकून तर भारतात पोचले मी!) .. इराण मधलं वातावरण, तिथले लोकांचे दारीद्र्य, झारा आणि अली इतके लहान असून त्यांचे घरकामात आई बाबांना मदत करणं.. झारा तर केव्हढीश्शी आहे! पण एक शाळा झाली की कुठे भांडी घास, नाहीतर लहान भावाला(बहीणीला) सांभाळ अशी कामं करत राहते..(झाराच्या डोक्यावर हिजाब पाहून तर कसंतरीच वाटलं.. कसं आयुष्य असेल ना तिथे मुलींचं??) ते बुट हरवणं,दोघांनी मग अलीचे बुट शेअर करणं,ती पळापळ, पैसे नसल्यामुळे बाबांना कळू नये म्हणूनची धडपड..तो समजुतदार

बटर चिकन आणि व्हेज. बिर्याणी

इमेज
ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं च होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत.. बटर चिकन ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!) असो.. मला जमेल तशी देतीय रेसीपी. अगदी अचूक प्रमाण नाही देता येणार कारण मी अंदाजेच घालते सगळे मसाले.. जिन्नस : १) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन. २) एक मोठा कांदा चिरून. ( अमेरीकेतला असेल तर अर्धाच. आमचा कॉस्कोचा होता. तो जरा अतीच जास्त आहे..) ३)एक टोमॅटो. ४) खोबरं ५) आलं, लसूण. ६) ३ मिरच्या ७) थोडी कोथिंबीर. ८)चिकन मसाला.. ९) थोडासा काळा मसाला.. १०) आवश्यक वाटला तर फूड कलर्.(अर्थात लाल.) ११) दही. १२) हळद्,तिखट,तेल वगैरे. कृती : १. प्रथम चिकन साफ करून त्याचे तुकडे करून ठेवणे. मग दही, हळद्,आणि थोडा चिकन मसाला घालून मॅरीनेट करावे. २. मग कुकर मधे शिजवून घ्यावे. ३. मसाल्यासाठी : चिरलेला कांदा बटर मधे किंचित परतून घ्यावा. खोबरं परतून घ्यावं(बटर शि