आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्या साईट्स बद्दल काही विशेष ममत्व वाटत नाही.. तेच इतरांना माझ्या ब्लॉगबद्दल नको वाटायला.. म्हणुन हा निरोप.. असो.. आजचे पोस्ट मी खरंतर केवळ निरोपसमारंभ नाही.. मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो.. तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची! पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही!...
विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...