ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले.. इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले! जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! :) , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! :) का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते! खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल.. "माझे इंजिनिअरिंगचे दिवस!" :) गाथा होईल याची लिटरली! अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्याच गोष्टी मिळवू शकले.. त्यातली एक इंजिनिअरिंगची डिग्री! :D (मैत्रिणींना हे पटायचे नाही! त्यांना वाटायचे मी ’भयंकर’ अभ्यासू आहे! आणि त्यांना न सांगता मी रात्र रात्र अभ्यास करते वगैरे! lol.. ) खरं सांगायचे तर मी कधीच अभ्यास केला नाही!! नाही म्हणायला आई आवर्जून मी पहिलीत असताना कशी स्वत:हून अभ्यासाला बसायचे, कवीता म्हणायचे इत्यादी सांगते.. अर्थातच ती तिथेच थांबते.. बहुदा मी नंतर अभ्यास केला नसावा! हेहे.. शाळेत मी तशी बडबडी आणि शांत(किंवा शिष्ठ!) अशी दोन्ही अर्थांनी प्रसिद्ध.. म...
विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...