पोस्ट्स

सप्टेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :) ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड! ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :))) तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं