पोस्ट्स

ऑगस्ट, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Feels Like Heaven ... !

इमेज
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्यालाच जमेल.. आपण फक्त तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा.. दुसरं काय करू शकतो नाहीतरी आपण? या टेंप्लेटमधे फोटोज दिसायला अडचण येतेय.. :( किती त्रास! तोवर ही लिंक घ्या.. माझे फ्लीकर अकाउंट..

कंग पाओ टोफु..!

इमेज
मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. :) तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप आवडली.. आणि तेव्हापासून मी ती नेहेमीच घ्यायला लागले.... दर वेळेला बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं, घरी ट्राय करावी.. तर सद्ध्या चालू श्रावण.. म्हणून चिकन च्या ऐवजी टोफु घालून करावी असा विचार केला.. आणि बराच सेम पदार्थ तयार झाला! (चिकनला तोड नाही पण) :) नंतर जालावर शोधताना कळलं, की ही बरीच कॉमन रेसीपी आहे.. :( तरी मी सद्ध्या तरी ती self invented recipe आहे असं समजून चालले आहे.. मी ही पाककृती खूपच अंदाजाने आणी आयत्या वेळेस केली असल्या मुळे , घरात बर्‍याच गोष्टी नव्हत्या.. रेड बेल पेप्पर ( सिमला मिरची), किंवा झुकीनी (काकडी सदृश प्रकार) इत्यादी जिन्नस नसल्या मुळे साधी लाल मिरची, आ