मुख्य सामग्रीवर वगळा

टॅग – टॅग ..

नमस्कार वाचकहो..
सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही! :)
असो..
आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग कमेंट्स पाहताना लक्षात आले की , मंदार आणि अनिकेत* या दोघा ब्लॉगर्सनी मला एका प्रश्नावलीसाठी टॅग केलं आहे त्यामुळे ते कळल्याबरोबर व वेळ मिळाल्याबरोबर लगेचच ब्लॉग उघडला..
* एक छोटी मिस्टेकची दुरूस्ती .. मंदार आणि विरेंद्र या दोघांनि टॅग केले होते. कमेंट्स पाहून लेख लिहायला घेईपर्यंत नावांचा गोंधळ केला.. :(
८-१० दिवसांत नियमित ब्लॉगिंग सुरू होईलच असे दिसते आहे.. :)
तेव्हा भेटू परत..
तोवर ही माझी उत्तरं !
1.Where is your cell phone?
माझ्या डाव्या हाता जवळ..
2.Your hair?
काळे-कुरळे…
3.Your mother?
Defense employee. थोडक्यातच लिहीते – “माझा आदर्श” !
4.Your father?
M.com, L.L.B, C.A.
Apart from being proud of my successful HR – Finance Director Dad, I always wondered how did Baba manage to conquer all these degrees with such an effort in hell of an situation, when on the other hand It was damn difficult for me to become just an Engineer with having all the financial, moral and what not support from my mom-dad !! :)

5.Your favorite food?
नंबर १ : आईच्या हातचे भाजणीचे थालिपीठ – फोडणीची पोळी.
बाकी बरंच आवडतं! पण वरील गोष्टींना तोड नाही !!
पुरणपोळी, भेळ, रगडा-पॅटीस ( गणॆश भेळचचच ) , सौथ इंडियन डिशेस,
मांचुरियन, मेक्सिकन बरंच- त्यातही चिकन चलुपा,१$ मॅकअडोनल्ड बर्गर्स :D , कंग पाऊ चिकन, p.f chang’s लेट्युस रॅप्स, … जाऊदे .. बहुतेक मला अमेरिकेची आठवण यायला लागलीय आता !! :D
6.Your dream last night?
I’m going to be extremely frank !
to my nightmare – I was cooking in my LA apartment.. ! :O :D
7.Your favorite drink?
कॉफी !! पण सगळे जळतात मला चांगली कॉफी करता येते म्हणून.. आणि सग्गळॆजण मला ती सोडायला सांगतात !!
8.Your dream/goal?
मला जगातील सर्व गोष्टी… स-र्व-गो-ष्टी- … – कला – नृत्यप्रकार – पाकप्रकार – भाषा – जगात जे काही exist होते ते आले पाहीजे.
नव्यानेच जाणीव झालेले ड्रिम आहे ! बघू काय होते ते.. :D
9.What room are you in?
माहेरी – पुण्यात :) माझ्या रूम मध्ये :) :) कंप्युटरसमोर :) :) :)
10.Your hobby?
जे दिसेल ते वाचायचे.
कंप्युटर( आधी बिघडवून) दुरूस्त करणे .
भसाड्या आवाजात चुकीच्या लिरीक्स व किमान ३ वेगळ्या पट्ट्यांमध्ये गाणे .. :) rare quality !
मुड असेल तर चित्रे काढणे,
पण अगेन.. जे दिसेल ते वाचणेच मला अती आवडतं !! I’m crazy book lover !!
11.Your fear?
बर्‍याच फालतू गोष्टी.. उदाहरणार्थ,विमान टेक-ऑफ+लॅंडींग करताना, अंधार, अंधारात दिसणारी काळी झाडे, तसेच वॉर्डरोबची सावली..
झुरळ.. ही फालतू चीज नाहीये.. ती लिस्ट संपली वर.. आता अती डेंजर..
आता विचार केला तर समजतंय़, मला उड्णार्‍या व अती वेगाने पळणार्‍या + मानवाच्या जवळ बिन्धास्त जाऊ शकतात अशा कुठल्याही क्रिचरची भिती वाटते.. :( ((
12.Where do you want to be in 6 years?
In India.. :)
13.Where were you last night?
१३ तास कंप्युटर समोर.. ट्रोजन्स बरोबर लढाई सुरू होती ! मी निकाल लावला त्यांचा !! :)
14.Something that you aren’t diplomatic?
probably to everybody. I cannot be diplomatic anytime in my life. that’s one thing I want to learn ! :D
15.Muffins?
yumm .. yumm.. yumm…
16.Wish list item?
थोडंसं गंभीर व्हायचे झाले तर ..
१. i want my college life back.
२. मला शक्य असते तर या जगातून नस्तं राजकारण – छक्के-पंजे काढून टाकायचे आहेत.
३.i want my niece back.
17.Where did you grow up?
पुणे .. एरंडवणे.
18.Last thing you did?
Bought Jodawi and Bangles for Sankranti ! :D
19.What are you wearing?
black trackpant , green Tshirt.
(What’s the pupose of this Q? :D )
20.Your TV?
I hate TV.
21.Your pets?
नाही आहेत. असलेली आवडले असते, परंतू १०-१२ वर्षांनी दु:ख्ख सहन करायची ताकद नाहीये.
22.Friends
मोजकेच. इतके मोजकेच की नावंच सांगते.
शाळेतली – मानसी
कर्नाटक गृप : मैथिली, योगिता, विशाल, स्मितल
इंजिनिअरिंग : स्विटी.
23.Your life?
मला मिळालेले आयुष्य फार जबरी आहे ! Thank God !
24.Your mood?
फार मुडी आहे. तो नक्की कसा आहे हे सुद्धा पटकन सांगता नाही येणार इतका लवकर तो बदलतो !
25.Missing someone?
हो .. नवरा..
26.Vehicle?
स्वत:ची कुठलीच नाही .. बाबांची Ritz. नवर्‍याची Corolla.
27.Something you’re not wearing?
मत्सर..
28.Your favorite store?
any book store.
Your favorite color?
black, brown, blue.
29.When was the last time you laughed?
रोजच हसते. पण खदाखदा, continuous, ३-४ तास विचाराल तर Hotel Darshan, prabhaat road, पुणे, २१ डिसेंबर ०९, संध्याकाळी ८ .
Our Karnatak group meet. one hell of meeting !
30.Last time you cried?
don’t want to recall that.
31.Your best friend?
आई, निनाद(नवरा), मानसी, मैथिली , मैथिलीची आई, स्विटी.
32.One place that you go to over and over?
In Pune – probably Laxmi road & Tulashi baug.
In LA – Sea .. any Sea !
33.One person who emails me regularly?
काही मराठी ब्लॉगर्स, Problogger, Copyblogger, John Chow, Chakali, Chintoo आणि ऑर्कुटवरील वर्क फ़्रोम होम + इंटरनेटवरून किती पैसे मिळाले सांगणार्‍या पोरी… इत्यादी लोक नियमित मेल पाठवतात ! जवळचे कोणीच इमेल पाठवत नाही. ते फोन करतात. :)
34.Favorite place to eat?
जाऊदे.. सारखे काय खाण्यावर बोलायचे.. खादाड म्हणतील लोकं!! :(
टॅग कोणाला करावे कळात नाहीये. ज्यांनी वाचले हे, व ज्यांनी ही प्रश्नमालिका सोडावली नाहीये त्यांनी अवश्य स्वत:ला टॅग करून घ्यावे.
:)
टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी.

सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.

 नंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.

स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला.

एखाद्या प्रचंड मोठ्या सॅम्पल साईझबद…

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा. माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस(  ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड!  मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). …

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!)
तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी!
बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात!
____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्यावर, स्ट…