पोस्ट्स

मार्च, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आश्चर्याचा सुखद धक्का..... !!

इमेज
नेटवर असेच फिरताना, ९ मार्च २००८ च्‍या लोकसत्ता, रविवार वृत्तांत 'मर्‍हाटी नेट-भेट' मध्‍ये, निवडक वाचनीय blog मधे माझ्या ब्लॉगचे नाव पाहून, बसलेला धक्का अजुन गेलेला नाहीय !... :) http://loksatta.com/daily/20080309/ravi01.htm thanks alot loksatta !! :)

लायब्ररी !!

इमेज
फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम वर तर, काहीच वाचावसं सापडत नाही आजकाल! म्हणजे वाचणेबल असतं बरच काय काय.. पण बहुधा मला नेट वर वाचायचा कंटाळा आलाय.. शेवटी नवर्‍याला लायब्ररीमधे घेऊन जाण्याचा तगादा लावला.. ( काय ना.. ड्रायव्हींग येत नसेल तर अमेरीकेत अगदी भजं होऊन जातं तुमचं!! :( माझी स्कुटी पाहीजे होती इथे... :D) एकदाचं लायब्ररी मधे आलो !! काय सुंदर आणि प्रचंड आहे इथली लायब्ररी.. ऐकुन होतेच पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं.. कार्ड घेण्यासाठी रांगेत उभी राहीले, तर १ मिनिटार सगळी प्रोसिजर खतम..! कार्ड हातात, आणि अन्लिमिटेड पुस्तकं , ३ आठवड्यांसाठी... wow !! घाईने पुस्तकांच्या सेक्शन मधे गेले, आणि लिटरली वेड लागलं.. आख्खा मजला भरून फक्त fiction.. त्याच्या वरच्या मजल्यावर non-fiction