मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

things I love.. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'मेरू'

काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होत...

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे श...

व्हर्चुअल की रिअल?

भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते? माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते.  एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?"  दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्र...

माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)

मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.  आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं  पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)  ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच...

एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला! सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा! ही काय नाहीतर ती काय.. १०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला ! जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला. अरे पण हे काय ! असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही. नावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना? समुद्र म्ह...