Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..
Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..
युट्युबवर फिरताना ही मजा सापडली!
आधी हा व्हीडीओ पाहा..
ओळखली चाल?
आपले दिल तडप तडप या पोलिश लोकगीतावरूनच आले आहे..
आजकाल प्रीतम वगैरे संगीतकार बिन्धास्त कोरिअन म्युझिक/चाली चोरतात तेव्हा चीडचीड होते. पण काही कारणाने मला हे साम्यस्थळ पाहून वैताग नाही झाला. कदाचित आपले दिल तडप तडप इतके सुंदर गाणे आहे, की ते कुठल्या दुसर्या गाण्यावर आधारीत असले तरी फरक पडत नाही. मजा वाटते,वैताग नाही याचे अजुन काय कारण आहे माहीत नाही. [ अजुन एक आठवण म्हणजे, हे गाणं माझा दादा गिटारवर फार भारी वाजवायचा! MITच्या ऑर्केस्ट्रामध्ये तोच असायचा गिटारला, त्याच्या गिटारमुळेच बरीच गाणी अशी ट्युनसकट लक्षात राहीली आहेत व बेहद्द आवडतात! ]
तसं बघायला गेलं तर ही अशी प्रेरणा मिळणे काही कमी नाही आपल्याकडे!
मेहबूबा - Demis Roussos – Say You Love Me
[ अर्थात, मेहबूबा अशक्य सही आहे यापेक्षा!! ]
नींद चुरायी मेरी - Sending all my love – Linear
[ मला दोन्ही गाणी प्रचंड आवडतात!! ]
हां हां ये प्यार है – Frankie Valli’s ‘Cant take my eyes off you’!
[ ही हां हां ये प्यार है ओळ दोन्ही गाण्यात किती उशीरा येते! मला असे झाले कस्ले स्लो गाणे आहे, झोप येईल आता! ]
आते जाते (मैने प्यार किया) – हे स्टीव्ही वंडरच्या I just called to say I love you आणि मेरे रंग मैं हे Final Countdown च्या कॉपीज आहेत हे तर जगजाहीर आहे..
तु मिले दिल खिले हे सुद्धा नितांतसुंदर गाणे जर्रासे ढापले आहे. Enigmaच्या ‘Carlyl’s song’ वरून, अजुनही एक दोन गाण्यात ते ट्रेसेस सापडतात.
पण हे बघा कसलं note to note ढापलंय !
जाना सुनो (खामोषी) – Bring The Wine – Paul Anka.
[तरीच मी विचार करायचे हे असले निबंध गाणं का आणि कसे आले आपल्याकडे?]
दिल को तुमसे प्यार हुआ (RHTDM) – Song from secret Garden
[ प्लीज हा.. RHTDM ची सुद्धा गाणी सापडायला लागल्यावर मी हा उद्द्योग आटोपताच घेतला.. ती गाणी अतीसुंदर आहेत. कशाची कॉपी असली तरी मी नाही लक्ष देणार! ]
पल पल (लगे रहे) – Theme for dream 0 Cliff Richard
[ हे तरी गाणं ओरिजिनल पाहीजे होते.. भन्नाट आवडले होते हे गाणं ]
असो ! अशी खरंच लाखो गाणी मिळतील. पण मी इथे मला जी आवडतात किंवा ज्या गाण्यांनी मला पार शॉक दिला अशी गाणी लिस्ट केली आहेत.. I am sure there are more. पण मलाच कंटाळा आला आता!
तुम्हाला अशी गाणी माहीत आहेत का? तुमची आवडती कॉपी कुठली ?
[ अशा कॉप्यांचा उत्तम डेटाबेस इथे मिळेल.. http://www.itwofs.com/ ]
Popularity: 20% [?]
टिप्पण्या