मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

washington लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ] अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा : मूळात या बांधकामाच्या प्रकाराला Obelisk म्हणतात, जे इजिप्त (Luxor temple , Heliopolis(city of sun) – Cairo) , रोम , USA ( Central Park – New York , Washington Monument – Washington DC) , इथिओपिया,अर्जेंटीना अशा बर्‍याच ठिकाणी आढळते. ओबेलिस्कचे बांधकाम म्हणजे एक सरळसोट उंच चौकोनी खांब, व वर छोटा, उंच पिरॅमिड. बर्‍याचदा म्हणजे पूर्वीच्या काळी obelisk हे monolith असायचे. मोनो(एक), लिथ(दगड). थोडक्यात एकाच दगडातून उभा राहीलेला चौकोनी उंच खांब. त्यावर पूर्वीच्या काळी असायचा सोन्या...