आली दिवाळी!!!
आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे.. :) तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा.. दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे.. आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे फोन.. मित्रमैत्रिणी.. दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की मी,स्नेहल,आदित्य,गजु-चिंटू असं आम्हा ५ जणांची तपासणी सूरू व्हायची.. कुठे चांगली माती आहे?? बांधकाम चालू आहे त्या बिल्डींगचे.. तिथे वीटा चांगल्या दिसतायत का कुठे? मी सगळ्यात लहान.. त्यामुळे आमचं काम लिंबू टिंबू.. उगीच आपलं मागे मागे फिरायचे.. :)) मेन काम हीच लोकं करणार.. मग माती मिळाली मनासारखी की माझं काम सुरू.. चाळणी पैदा करायची घरातून , आणि चाळत बसायचं! काय छान मातीत लोळायला मिळायचं! :P मग इकडे आमचे आर्किटेक्ट लोकं किल्ल्यांची रूपरेषा ठरवायचे.. मग हळु हळू २-३ दिवसात किल्ला साकारला जायचा.. कुणी डॉक्टर असेल तर त्यांच्या कडून इंजेक्शनची सिरींज मिळवून त्याचं कारंजं करायचे.. मावळे सा...