नीलरंगी रंगले…
वॉव !! किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून?? दिवस कशाला मोजू? साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय! शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले..
असो !
असो !
एक न्युज तुम्हा वाचकांबरोबर वाटायची आहे..
मी आई झाले.. :O
कसलं भारदस्त वाटतंय असं लिहायला!
स्वत:लाच पिल्लू समजणार्या मला, आता आई म्हणणारे एक पिल्लू आले आहे! ’नील’ त्याचे नाव.
ते साखरेचे पोते अलिकडेच २ महिन्याचे झाले. व मला थोडासा वेळ मिळू लागला. म्हटले काही नाही तर ब्लॉगवर पुनश्च हरि ओम, पुन्हा एकदा करावे..

मी आत्ताच्या घडीला तरी नीलरंगी रंगले आहे. गंमती जमती होत असतात रोज!
उदा: पूर्वी नील रशियन परिकथेत गोष्ट आहे तसा एकच डोळा बंद करून झोपायचा! हाहा..
किंवा नीलला कपाळाला आठी , डोळे मोठे व चेहर्यावर हसू असा धमाल चेहरा करतो येतो! करून बघा! आठी व डोळे मोठे जमतच नाहीत. हसू तर लांबची गोष्ट!
शीशी करताना तर स्वारी अफाट खुष असते! त्यामुळे बाळ व्हायच्या आधी ज्या गोष्टीचे जरा टेन्शनच होते ती एकदम मस्त होऊन गेलीय! हीही.. मी तर आता त्या मोमेंटची वाट पाहात असते…
नील अगदी लहान असल्यापासून जोर्रात ’अगं…” असं म्हणतो.. मेजर क्युट प्रकार आहे तो..

एकंदरीत धमाल आहे! रोजचा दिवस नवीन उजाडतो.. पूर्वी किती प्रचंड वेळ मिळायचा हे आता तो मिळत नसल्यामुळे जाणवू लागले आहे..
तरीही जमेल तसा, तेव्हा ब्लॉग लिहावा असं मनात आहे. बघू काय होतंय!
टिप्पण्या