मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Travel लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'मेरू'

काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होत...

लॉस एंजिलीसचा ट्रॅफीक !!

एल.ए.चा ट्रॅफीक!  काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कधी आपलं ५ माईल च्या स्पीडने चालवत, व प्रत्येक मिनिटात किमान १७ वेळा तरी ब्रेक दाबत गाडी चालवायची. चालवायची हे क्रियापद फारच फास्ट आहे. रेटायची, ओढायची वगैरे ठिके. अर्थात फ्रीवे नसेल तर दर काही फुटांवर येणारे व जीव जाईस्तोवर लालच राहणरे सिग्नलचे दिवे येतात. त्यातून रस्ते काही सबर्बसारखे प्रशस्त नाहीत.. सगळा गिचमिडकाला.. इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे ना इथे गाडी चालवणे. सिरिअसली. दोनेक वर्षापूर्वी मला एका कामानिमित्त एके ठिकाणी भल्या सकाळी ८ वाजता पोचायचे असायचे. कित्तीही सकाळी उठले तरीही मी आपली १० ते १५ मिनिटं उशीराच उगवणार. समजतच नाही मला असे होते तरी कसे? बरं अंतर किती असेल ते? ६ नाहीतर ७ माईल्स! ६-७ माईल्सना साधारण ३० माईल्स ताशी वेगाने गेल्यास किती वेळ लागावा?   २०-२५ मिनिटं? चला अजुन एक्स्ट्राची १५ मिनिटं अ‍ॅड करूय...

माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)

मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.  आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं  पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)  ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच...