मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]
अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा :
  • मूळात या बांधकामाच्या प्रकाराला Obelisk म्हणतात, जे इजिप्त (Luxor temple , Heliopolis(city of sun) – Cairo) , रोम , USA ( Central Park – New York , Washington Monument – Washington DC) , इथिओपिया,अर्जेंटीना अशा बर्‍याच ठिकाणी आढळते.
  • ओबेलिस्कचे बांधकाम म्हणजे एक सरळसोट उंच चौकोनी खांब, व वर छोटा, उंच पिरॅमिड. बर्‍याचदा म्हणजे पूर्वीच्या काळी obelisk हे monolith असायचे. मोनो(एक), लिथ(दगड). थोडक्यात एकाच दगडातून उभा राहीलेला चौकोनी उंच खांब. त्यावर पूर्वीच्या काळी असायचा सोन्याचा पिरॅमिड. [ सोने या धातूला इजिप्शिअयन लोकं 'flesh of god' समजत.] अर्थातच आता तसे नाही. वर सोन्याचा पिरॅमिडही नसतो तसेच एकाच दगडातूनही ते बांधकाम होत नाही. वेगवेगळ्या दगडांनी , संगमरवरांनी बनवलेला असतो. [ वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे असे आहे. दगड + संगमरवर ]
  • इजिप्शियन एन्शन्ट भाषेमध्ये याला शब्द आहे TEJEN. ज्याचा अर्थ : Protection or Defense. काही संकट येणार असेल तर ते या obelisk मुळे, त्याच्यावरच्या उंच तोकदार नीडलमुळे दूर होते अशी त्यांची धारणा.
  • इजिप्शियन देव Ra [rah] - Sun God, याच्या देवळात मोकळ्या भागात कायम हे उभारले जातात, संरक्षणार्थ. [ रा या देवाच्या नावाबद्दल बरेच संभ्रम आहेत. त्याला ’रे’ असे सुद्धा संबोधले जाते
  • जसे ख्रिश्चन लोकांमध्ये थडगी असतात, तसेच हे Obelisk. इजिप्शियन संस्कृतीत आणि इजिप्शियन भूमीवर असे बरेच ओबेलिस्क्स उभे आहेत. त्या राजांची आठवण म्हणून बांधलेले. [ Ramses, Hatshepsut इत्यादी ]
  • त्यामुळेच obelisk च्या पाठोपाठ येतो इजिप्शियन देव Osiris. God of death, afterlife. असेही काही समज आहेत, की obelisk वरच्या टोकावर असणारा पिरॅमिड ( जो बर्‍याचदा enlightenmentशी संबंधित असतो ) हा सूर्याची किरणं या ओबेलिस्कवर पोहोचवेल. व सूर्यदेवाच्या किरणात इतकी शक्ती आहे की त्यामुळे obelisk मधील आत्मा पुनर्जन्म घेऊ शकेल. [ Resurrection ]
  • या सगळ्यात थोडेसे वेगळे पण डीसीशी संबंधित असल्याने लिहीलेच पाहीजे. ज्याच्या स्मरणार्थ हे मॉन्युमेंट बांधले – वॉशिंग्टन- तो फ्रिमेझन होता. मेझनरी माहीत नसणार्‍यांनी either गुगल करावे किंवा Dan Brown’s ’The lost Symbol’ वाचावे. थोडक्यात सांगायचे तर ख्रिश्चन धर्माला (निदान पूर्वीतरी) सायन्सचा प्रचंड राग होता. [ आठवा : गॅलेलिओने प्रसृत केलेली सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते ही थिअरी न पटल्यामुळे, व बायबल/ख्रिष्चनिटीच्या विरोधात असल्याने गॅलेलिओला झालेला त्रास. अशी उदाहरणे बरीच असतील. ] यासर्वांमुळे एक सिक्रेट सोसायटी स्थापन झाली ज्यात खूप नामवंत शास्त्रज्ञ, कलावंत, राजकारणी होते. उदा: न्यूटन, गॅलेलिओ, वॉशिंग्टन, रुझवेल्ट, हेन्री फोर्ड, नेपोलिअन बोनापार्ट, आपल्याकडचे स्वामी विवेकानंद, डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाक्रिष्णन, मोतीलाल नेहेरू, परिक्षित साहानी.. … संपणार नाही ही लिस्ट ! आख्ख्या वॉशिंग्टन डीसी मध्ये मेझनिक सिम्बॉल्स आहेत असं म्हणतात. ओह बायदवे, ओम, स्वस्तिक हे मेझनिक सिम्बॉल्स आहेत म्हणे! :) [ प्रचंड इंटरेस्टींग आहे ते सर्व. पण लिहीत बसले तर सगळा ब्लॉग भरून जाईल. ]
असो. विषय भरकटायला लागला!
तर.. अशा वेग्वेगळ्या इतिहासाने भरून गेलेल्या ठिकाणी आम्ही होतो. मला हे सगळे अंधुक तुकडे तिकडे आठवत होते. त्या भल्या मोठ्या 555 ft 5⅛ inches इतक्या उंचीच्या मॉन्युमेंटवर नेमकं आम्हाला जाता नाही आले. त्यासाठी भल्या पहाटे वगैरे जावे लागत असावे. आम्हाला तितका वेळही नव्हता. पण तिथेच टेकलो जरा वेळ. मॉन्युमेंट तर संगमरवरात आहेच, पण तेथील व्हीजिटर्स लोकांना बसायचे बाक देखील संगमरवरात आहेत. त्या गार गार मार्बलवर बसून वरचा तो मॉन्युमेंट, समोर दिसणारे कॅपिटॉल हिल बिल्डींग, पाठीमागचे लिंकन मेमोरियल तर डावीकडे झुडुपात लपलेले व्हाईट हाऊस असा दूरवर पसरलेला तो परिसर पाहायला खूप मजा आली !! गंमत म्हणजे कॅपिटॉल हिल, मॉन्युमेंट्स ( लिंकन, वॉशिंग्टन) यांना दिलेल्या परिसराचे क्षेत्रफळ पाहता व्हाईट हाऊस अगदीच छोटूसे आहे ! :) निदान झुडुपात लपल्यामुळे तरी तसेच वाटते!
थोड्यावेळ फोटोसेशन केले व आम्ही निघालो व्हाईट हाऊसकडे. ते सर्व पुढच्या भागात !
काही फोटोज :








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??