पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)

इमेज
मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.  आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं  पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)  ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच बरं वाटलं! त्

बटर चिकन

इमेज
मागच्या आठवड्यात बटर चिकन केले होते. हल्ली महिन्यातून दोनदातरी होतेच ते. इथे Los Angeles, मध्ये आल्यापासून आम्हाला विविध रेस्टॉरंट्सच्या होम डिलिव्हरीची फार सवय लागली होती! पण एकंदरीत सर्व इंडीयन रेस्टॉरंट्सप्रमाणे कुठेही कन्सिस्टन्सी नाही हो! मागच्या वेळेस अमुक मधीन ढमुक चांगले होते म्हणावे तर पुढच्या वेळेस नक्की घोळ होणार! शेवटी स्वतः करून , एक फिक्स रेसिपी शोधणे आले. हल्ली तेच बरे वाटते. मनापासून खाल्लेही जाते!  :)  माझ्या ब्लॉगवर २००८ मध्ये मी ही पोस्ट लिहीली होती. खरं म्हणजे ती रेस्पी म्हणावी तर बटर चिकनची नाहीये! [पण आम्ही हीच रेसीपी वापरून केलेली तेव्हाची डिश मात्र बटर चिकनसारखीच लागत होती! :))] पण ते काही खरे नव्हे. चांगली ऑथेंटीक रेस्पी परत लिहीलीच पाहीजे मला.  ही घ्या ट्राईड & टेस्टेड बटर चिकनची पाककृती! :)  लागणारा वेळ:  ४० मिनिटे लागणारे जिन्नस:  ५०० ते ७०० ग्रॅम बोनलेस, स्किनलेस चिकन ब्रेस्ट मोठा चमचा दही अर्धा चमचा लिंबाचा रस हळद २ मोठे कांदे २ टोमॅटो ६-७ मोठ्या लसूण पाकळ्या बटर (भरपूर!) ८फ्लु औंझ हेवी व्हिपिंग क्रीमचा छोटा पॅक मिळतो. त

कंटाळा

इमेज
भयानक कंटाळा आलाय राव.. का...ही केलं नाही आपण मोलाचे.. आयुष्य नुसतंच वाया चाललंय असं वाटावं   इतका तो कंटाळा...सतत करणार तरी काय म्हणा? पिक्चर्स बघ, टीव्ही बघ, पुस्तके वाच, झाडून सर्व मराठी साईट्स वाच, नवीन पदार्थ कर, घर आवर,अभ्यास कर.. काहीही कर.. पण हा कंटाळा आहेच?? किती तो हटवादीपणा?? काहीतरी उच्च, दैदिप्यमान काम केलं पाहीजे.. सगळं जग, बरं जरा जास्तच झाले.. निदान तुम्ही राहता ती कॉलनी तरी तुम्हाला ओळखेल असं काहीतरी... इथे काय? शेजारची दोन घरंही मला ओळखत नाहीत.. मी ही त्यांना ओळखत नाही म्हणा.. पण असं काय केलं म्हणजे जरा बरं वाटेल स्वत:बद्दल? :|