१६ ऑक्टोबर, २००७

पेन-स्केच


(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

Signature2

११ ऑक्टोबर, २००७

नेनचिम!

काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... !
खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!)

नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि नव-नविन प्रयोग चालु आहेत..पामिली तर्फे एक नविन प्रयोग अमलात आणण्यात येतो, आणि प्रचंड यशस्वी होतो! 'सिन्तारी' .. एकमेकांच्या मनातील विचार ओळखणारी यंत्रणा.. ज्यामुळे ता-वरीनी चे काम अजुनच सोपे झाले.. गुन्हेगारीला एकदम आळा घालता आला.. परंतू.. लवकरच सर्व शास्त्रद्न्यांना उमगते की नेनचिम चे या आकाशमालेतील वास्तव्य अगदीच छोटे आहे.. म्हणजे तरी काही कोटी वर्ष.. परंतू नजिकच्या काळामधे नेनचिम संपुष्टात येणार आहे याची सर्वाना जाणीव होते. आणि नेनचिम ला कसे वाचवता येईल याचा विचार चालू होतो.. आकाशमाले मधे असा कुठला ग्रह आहे का, की जिथे नेनचिम ची वस्ती हलवता येईल? परंतू असा कुठलाच ग्रह जवळ सापडत नाही. जो सापडतो.. तो कितीतरी प्रकाशवर्षे लांब असतो.. पण तरी प्रयत्न करून पाहयचे ठरते..
सर्व शाखामधले शास्त्रद्न्य कामाला लागतात.. नेनचिम वरील शास्त्र इतके पुढे गेलेले असते, की ते lab मधे मानवाचे बीज तयार करतात.. अशा पद्धतीने store करून ठेवतात की ते जेव्हा यानातून, त्या दुसर्या वस्ती होऊ शकेल अस हवामान असलेल्या ग्रहावर पोचेल तेव्हा तिथे मानवाची उत्पत्ती होऊ शकेल. परंतू या प्रयोगाच्या यशाची खात्री कोणालाच नसते.. थोडक्यात नेनचिम चा जगाच्या पाठीवर कसलंही अस्तित्व नं उरता अंत होणार अशी खात्री पटायला लागते..
तेवढ्यात, रोलान नावाचा शास्त्रद्न्य असा विचार मांडतो की.. नेनचिम हे काही फक्त मानव इकडून तिकडे गेल्याने अमर होणार नाही आहे. आपल्या ग्रहावरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती.. ती जर आपण बाकीच्या जगापर्यंत पोचवू शकलो, तर नेनचिमचे महत्व नक्कीच जगासमोर येईल. इतकी प्रगत वस्ती असणारा हा ग्रह केवळ त्याच जिवनमान कमी आहे म्हणून अंत पावला हे जगाल समजेल.. हा त्याचा विचार सर्वांना पटतो.. आणि जशी एकीकडे मानवी बीज दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न चालू असतात, तसेच बरोबरीने, नेनचिमचा इतिहास.. नेनचिमवरील महत्वाच्या व्यक्ती.. या ग्रहावर झालेलं संशोधन, नविन प्रयोग..आणि मुक्ख्य म्हणजे सिन्तारी... हे सर्व एका ठिकाणी store केलं जातं.. कालांतराने... नेनचिम वरील वातावरण बदलू लागते.. तापमान वाढ होते.. पाऊस कमी होतो.. हवा विरळ होऊ लागते... थोडक्यात.. वातावरण मानवास राहण्यासाठी उपयोगी राहात नाही.. खूप पुर्वी हा धोका लक्षात घेउन नेनचिम च्या गर्भामधे राहण्याची व्यवस्था पामिलीने केलेली असते.. तेथे हवा, अन्न निर्माण करायचे काम, पामिलीचाच एक शोध, 'यंत्रेश' नावाचे यंत्र करत असते.. परंतू ते प्रयत्न सुद्धा कमी पडत जातात.. सर्व मानव वंश संपतो.. एकपेशीय प्राणी काही काळ तग धरून राहतात, परंतू त्यांचाही पाडाव होतो.. राहते ते फ़क्त... नेनचिम मधील अवाढव्या प्रगत अशा इमारती.. यंत्रे... स्वयंचलीत यंत्रे! जी मानव नसताना देखील चालू राहतात.. अव्याहत त्यांना नेमून दिलेलं काम करत राहतात.. अर्थात या सोयींचा उपभोग घ्यायला कुठलाही मान्व जिवंत नसतो.. कालांतराने.. वातावरण इतके तापते.. की सर्व पोलादी इमारती.. यंत्रे वितळून जातात.. पत्त्यांच्या बंगल्यासारखे खाली कोसळतात... अर्थात आवाजही होत नाही.. कारण मुळात तिथे हवाच नसते... अशा रीतीने नेनचिमचा अंत होतो.....
पुढे आपल्याला समजते की नेनचिम म्हणजेच आपला चंद्र.. ! (अर्थात ही गोष्ट काल्पनिक आहे.. परंतू त्यांनी असे संदर्ब दिले आहेत की पुढे मानव चंद्रावर पाऊल ठेवतो.. ) तेव्हा ४ मानव पहील्यांदा चांद्रावर (इथे : नेनचिम वर) उतरतात.. तेव्हा एक स्फोट होतो.. आणि जमिनीखाली दडवलेली सिन्तारी यंत्रणेबद्दलची माहीती त्या मानवांना मिळेल अशी व्यवस्था झालेली दिसते.. त्या चार मानवांमधे.. १ अमेरीकन, १ रशियन, १ चिनी तर १ अर्थात भारतीय असतो.. भारत नावाचा! त्याला सिन्तारीच्या माध्यमातून इतर ३चे विचार कळतात.. आणि ही यंत्रणा जर पृथ्वीवर आली तर काय अराजक माजेल ते त्याला जाणवते आणि तो ती नष्ट करतो.. इत्यादी....
सगळं कथानक जरी मी इथे लिहीलं असलं तरी ते इत्थंभूत वर्णन, धारपांच्या शैलीमधे वाचण्यामधे मजा आहे!
शक्यतो कुठल्याही science fiction मधे एक सत्याचा आधार असतो.. आणि मग ती कल्पना फुलवलेली असते.. इथेही तसेच आहे.. global warming नी काय काय होऊ शकते याची चुणुक नक्कीच मिळेल.. आणि कितीही शास्त्र प्रगत झाले तरी निसर्ग, वातावरणापुढे आपले काहीही चालणार नाही याची कल्पना येते! त्यामुळे मला आधी कधीही जाणवला नव्हता इतका global warming बद्दल अवेरनेस जाणवला हे पुस्तक वाचून.. तेव्हा पुस्तक मिळालं तर जरूर वाचा....
Signature2

१४ सप्टेंबर, २००७

hmmm... nostalgia ! (कॉलनीचा गणेशोत्सव)

आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग ! बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :)

दुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ! ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही! त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी वाजत-गाजत मिरवणुक निघायची.. सगळी पोरं-टॊरं जमून आपले घसे साफ करून घेणार.. त्या घोषणा.. मुलांचे नाचणॆ.. बायकांच्या फुगड्या.. तो उत्साह ! :) सगळ्यात शेवटी मग ती मुर्ती देव्हार्‍यात विराजमान होणार.. Artist लोकांनी नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ट सजावट केलेली असायची.. मुर्ती बसेपर्यंत आमच टाईमपास चाले.. मग आरती च्या वेळेला मात्र न चुकता हजर ! तेव्हा आरत्या पण येत नव्हत्या.. पण जाऊन जाऊन पाठ पण झाल्या.. आणि सगळ्या जमावाबरोबर आरती म्हणण्यातलं थ्रिल अनुभवलं.. अजुनही एकत्र आरती म्हणताना काटे येतात अंगावर.. !! आरती संपली की हमखास होणारी बेहेरे काकांची आणि गुरुजींची मंत्रपुष्पांजलीच्या वेळेची जुगलबंदी!.. फार हसू यायचे तेव्हा.. :D आरती झाली की मुख्य आकर्षण! प्रसाद.... :) कुट-साखर.. आंब्याची बर्फी.. शिरा( प्रसादाचा आणि तो पण!! umm.... yummy !! ) ... :)

रात्रीची जेवण कशीबशी आटोपून लग्गेच पळायचं.. बरोब्बर ९ वाजता कार्यक्रम चालू व्हायचे.. बर्‍याचदा त्यात अस्मादीकांचा सक्रीय भाग असायचाच.. त्यामुळे ती वेगळीच धावपळ.. नाटका-नाचाचे वेगळे कपडे.. मेकप-गेटप... मॅकड्रॅप ची ती नेहेमीची ड्रेपरी!! कपडे सुद्धा ओळखीचे झाले होते! :) दर वेळेला भाग घेऊनही स्टेजवर जातानाची भिती अजुनही आठवतीय... पुर्वी लोकं सुद्धा सगळी यायची कार्यक्रम पाहायला आणि कार्यक्रमही चांगले असायचे.. :) नाटक वा नाच झाला की रात्री ११-११.३० ला मोठ्यांकडून मिळणारा बटाटावडा, किंवा सॅंडविच...! भूक तरी असायची का! पण ते कौतुकाचे एक स्वरूप होते.. आमच्या कॉलनी मधे कायम कला-गुणांना वाव मिळाला.. माझ्यासारखी बुजरी मुलगी .. आणि वर्षानुवर्ष न घाबरता इतक्या लोकांसमोर perform करत होते, यातच कॉलनीचे यश म्हणायचे!!

कार्यक्रमांचे स्वरूप पण ठरलेले असायचे.. पहील्या दिवशी गणेश स्तवन म्हणून गाणं... मग एखादं भरतनाट्यम.. :। काय बोर व्हायचे ते !! ते झाले की मग खर्‍या कार्यक्रमांना सुरवात! विविध डान्स, कथाकथन, नाट्यछटा, नाटकं... आणि डान्स मधे देखील किती प्रकार! सर्वप्रकारची लोकंनृत्ये.. कोळीनृत्यं, नवरात्रावरच्या गाण्यांवरचा नाच.. रेकॉर्ड डान्स असायचेच पण त्यातही creativity... एकदा आम्ही छायागीत सादर केले होते.. बापरे.. केव्हढी ती गाणी,प्रॅक्टीस... पण प्रोग्रॅम इतका सुंदर झाला.. तसेच आधुनिक रामायण वगैरे... सगळी लोकं अफाट मेहेनत घ्यायचे.. नाटकं पण इतकी विनोदी.. अगदी नावापासून... रंगरंगिले छैलछबिले, शूर राजूची चड्डी ओली वगैरे... :D :D :D पण ही सर्व नाटकं कॉलनीमधल्या लोकांनीच लिहीलेली असायची... direct केलेली असायची.. आणि आम्ही मुलंच त्यात काम करायचो.. :)
दुसर्या दिवशी असाच प्रोग्रॅम असायचा, आणि तिसर्‍या दिवशी व्हायचा आम्च्या कॉलनी मधल्या मुलांनी बसवलेला ऑर्केस्ट्रा... !! सर्व वादक,गायक,निवेदक म्हणजे आमचेच दादा अन ताई लोकं!! काय गाजायचा ऑर्केस्ट्रा!! अगदी १ वाजे पर्यंत चालायचा.. ( तेव्हा वेळॆचं बंधन नव्हतं!)
४थ्या दिवशी याच लोकांचे ३ अंकी विनोदी नाटक..!! काय टॅलंत होतं या लोकांमधे... ! शांतेच कार्ट, गेला माधव कुणीकडे, लग्नाची बेडी ई.ई. नाटकं मी प्रथम या लोकांची पाहीली... ! फारच सुपर्ब!
आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी व्हायचं फन-फेअर.. ! फुल्टू धमाल... भरपुर खाण्याचे आणि खेळण्याचे स्टॉल्स.. मस्त म्युझीक! आणि मित्र-मैत्रीणींचा गोंधळ... २-३ तास एकदम मजा असायची! फन-फेअर झाले की व्हायची तयारी बाप्पांच्या मिरवणुकीची... :( खरंच घरातलं कुणीतरी सोडुन चालल्याची जाणीव व्हायची तेव्हा... ५ दिवस चाललेला गोंधळ संपल्याची जाणीव व्हायची! :(
रात्री व्हायचा बक्षिस-समारंभ.. १०-१२वि झालेल्यांना बक्षिसे असायची.. प्लस, खेळामधे जिंकलेल्या लोकांना, तसेच सगळ्यात जास्त कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलाला/मुलीला ही बक्षिस असायचे.. ते बर्‍याचदा वंदनालाच मिळायचं! :) आम्ही आपले वाट पाहायचो हा समारम्भ संपायची... ! कारण त्यानंतर असायचे कॉफीपान.. :) आख्ख्या वर्षभरात कॉफी न मिळाल्यासारखे आम्ही लोकं कॉफी प्यायचो तेव्हा! पैजाही लागायच्या कोण जास्त कॉफी पितो.. needless to say, त्या मीच जिंकायचे! :)
hmmmmm...........
आता यातलं काय उरलं?? जवळपास काहीच नाही.. कारण दादा लोकांच्या पिढीतले आता इथे कुणीच नाही, even आमच्या देखील... सगळी चिल्ली-पिल्ली आहेत आता... त्यांचे ते काहीही सिन्क्रो नसलेले डान्स पाहायला, आणि जवळपास सगळे डायलॉग्स अं..अं... करत म्हटलेली नाटकं पाहायला काही उत्साह नाही राहीला... ते केवळ त्यांच्या आई-बाबांच्या कौतुकाचा विषय! तसेच, त्यांचे ते वयाला नं शोभणारे नाचही पाहावत नाहीत..
कार्यक्रम हळुहळु संपतच आलेत म्हणा.. कोण जाणे अजुन काही वर्षांनी इतपत तरी काही होईल का?
असं काहीही असलं तरी आमच्या कॉलनीचा गणेशोत्सव हा सगळ्यांचाच वीक-पॉईंट आहे... [ यंदाचे तर गणेशोत्सवाचे २५वे वर्ष आहे! :) ] त्यात आख्खं कुटुंब सहभागी असायचे.. लोकमान्य टिळकांचा हेतू किती चांगला होता हे कळते.. सगळे १५०-२०० फ्लॅट्स एकत्र येऊ शकत.. njoy करू शकत...
असो... मराठी माणूस हा जरा अतीच nostalgic होत असतो हे पटते अशावेळेला.. पुढच्या वर्षीपासून मी हे सगळं वाईट्ट मिस करणारे.. ते वातावरण.. तो उत्साह ! US of A मधे अजुनतरी इतकं कुणी celebrate नाही करत... चालायचंच...
आज हे सगळं आठवलं आणि चक्क माझ्या ब्लॉग वर नविन पोस्ट आलं! हेहे... आठवणींचे हा एक फायदा आहे.. त्या लिहून ठेवल्या की नंतर वाचायला मस्त वाटतात!! :)
i hope, अशाच आठवणी येतील, आणि मी काहीतरी लिहीन.... ( नाहीतरी मला लिही काहीतरी, लिही काहीतरी असं काही लोकं म्हणतंच होती... भोगा आता आपल्या कर्माची फळं!! :D :D :D ) !!

९ ऑगस्ट, २००७


काही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले.... well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्‍यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :)
( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! )सद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे! :)

Vaishali pen-sketch

आणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय..


IMG_0223


** click on the images to view the enlarged image.


Signature2

२५ जून, २००७

मागचा आठवडा फारच मस्त गेला!
आठवड्याच्या सुरवातीलाच Junior College च्या Principal सत्यनारायण मॅडम भेटल्या.. खरंतरं, दिसल्या... पण चक्क चक्क त्यांनी मला ओळखलं.. आणि आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्या!! कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते... तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या... सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल... :D किती त्रास द्यायचो आम्ही त्यांना!!! )
फक्त एवढंच नाही.. तो आठवडाच वेगळा होता! Junior collegeचे एक सर, MIT मधले chemistry चे कोकाटे सर, आणि साठे मॅडम सुद्धा दिसल्या.. !!
जबरी वाटलं.....आणि जबरी वाटलं म्हणून आश्चर्य सुद्धा ! मी कधीच फार sincere/fav student नव्हते.. (हम्म्म.. black list मधे पण नव्हते बरका...) पण तरी या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली, मला त्यांना भेटून आनंद झाला(आणि त्यांना मला भेटून!) यामुळे मजा वाटली!
एकंदरीतच जुन्या आठवणींमधे किती रमतो ना आपण? जुने दिवस, शाळा-कॉलेज मधले शिक्षक,मित्र-मैत्रिणी....त्यांना भेटल्यावर आपल्याला तो काळ आठवतो.. एकदम tension free,मस्त life होतं ते.. तेव्हा कदाचित तितकं जवळचे कुणी वाटत नसेलही, परंतू नंतर त्यांना भेटल्यावर आनंद होतो खरा! किंवा कदाचित मी आता इथे(म्हणजे पुण्यात,भारतात!) काही दिवसंच आहे, म्हणून होत असेल... माहीत नाही... पण मस्त feeling !! :)
Signature2

१३ जून, २००७

I knew I loved you before I met you ...!!

हल्ली काही लिहायला सुचतच नाही... स्वस्थपणा मिळाला नाही तर ते सुचणे अवघड आहे..
सो, सद्ध्या फक्त एवढंच..माझ्या अतिशय आवडत्या गाण्याच्या ओळी!

I knew I loved you before I met you ...!!
( savage garden)

Maybe it's intuition
but some things you just don't question
Like in your eyes, I see my future in an instant
And there it goes, I think I found my best friend
I know that it might sound
more than a little crazy but I believe...

I knew I loved you before I met you
I think I dreamed you into life
I knew I loved you before I met you
I have been waiting all my life

There's just no rhyme or reason
Only the sense of completion
And in your eyes,I see
the missing pieces I'm searching for
I think I've found my way home
I know that it might sound
more than a little crazy but I believe...

I knew I loved you before I met you
I think I dreamed you into life
I knew I loved you before I met you
I have been waiting all my life ...

A thousand angels dance around you
I am complete now that I've found you ..

I knew I loved you before I met you
I think I dreamed you into life
I knew I loved you before I met you
I have been waiting all my life ....

२७ मार्च, २००७

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..
सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध 'ट्रॅंप' कसा जन्माला आला, याची कहाणी आहे.. हळुहळु चॅपलीन प्रसिद्ध आणि श्रीमंत होत गेला.. यात त्याच्याकाही महत्वाच्या चित्रपटांची जन्मकथा आहे. त्याला घेतलेले त्यानी कष्ट आहेत.. संघर्ष आहे.. थोडंफार चित्रपट तयार करण्याच्या तंत्राबद्दल देखील माहीती आहे..
पण सगळ्यात उत्कंठेचा भाग आहे तो म्हणजे, जेव्हा बोलपटांचे आगमन झाले आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळानंतरचे.. ज्या कलाकारानी सगळ्या जगाला हसवत ठेवले (आणि हसवता हसवता रडवले देखील) त्या कलाकाराशी अमेरीका नंतर फारच वाईट वागली.. त्याला कम्युनीस्ट ठरवले गेले, बरेच खटले झाले.. आणि सरतेशेवटी अमेरीकेतून हकालपट्टी करण्यात आली! मग तो स्वित्झर्लंड इथे स्थायिक झाला...
या पुस्तकातून चॅपलीनचे इतके पैलू दिसतात! त्याची कॉमेडी थोडी करूणच होती.. मुळात त्याची मनोवृत्ती जरा करूण अशीच असावी.. कुठलीही सुंदर कलाकृती पाहीली किंवा आनंद झाला की चॅपलीनचे डोळे पाण्याने भरून जायचे.. या पुस्तकातले त्याची काही स्वगतं, किंवा महायुद्धाच्या काळात त्याने केलेली भाषणे, 'द ग्रेट डिक्टेटर' मधील त्याचे भाषण अतिशय सुंदर आहेत! या पुस्तकात, त्याचे, त्याच्या कुटुंबाचे, चित्रपटसृष्टीतील लोकांचे खूप सुंदर फोटोज आहेत..नाहीतर चार्ली चॅपलीन ला कायम त्या ट्रॅंपच्या भुमिकेतच पाहायची सवय आपल्याला!
हे पुस्तक वाचल्यावर चार्ली चॅपलीन किती थोर होता हे कळतं आपल्याला.. केवळ तो ईंग्लीश होता आणि त्याने कधीच अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले नाही म्हणून आणि अशाच कारणांमूळे अमेरीका सोडायला लागली तरी त्याने कधी कटूता नाही ठेवली मनात.. तो स्वतः थोर होताच, परंतू अनेक थोर लोकांना तो प्रत्यक्ष भेटला.. आईनस्टाईन, म. गांधी, नेहरू, रुझवेल्ट, हुवर,पिकासो आणि अशीच अनेक व्यक्तीमत्वं!
एकंदरीत पुस्तक खूपच छान झालंय.. ओघवतं झालंय.. कुठेही रटाळ नाही आहे.. पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे, परंतू अनुवादकाचे नावच न कळल्यामुळे नक्की तपशील नाही सांगता येत आहे.. पण मिळालंच तर जरूर वाचा!


Signature2

७ मार्च, २००७

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??
Signature2

२६ फेब्रुवारी, २००७

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्राण्याकडे पाहावं तसेच पाहतात.. नाही तसे मी बाकीचेही उद्द्योग करते, नोकरीचे अर्ज करते, थोडा जमला तर अभ्यास करते, अधुन-मधुन कुठल्यातरी कंपनीच्या परीक्षा देऊन येते, पण माझा बराचसा वेळ हा वाचनातच जातो. प्रत्यक्ष library मधून पुस्तके आणून वाचणे यात जी मजा आहे ती बाकी कशात नसली तरी, internet मुळे अनेक इतर गोष्टींकडे लक्ष गेले, जे मी कधी स्वतःहुन वाचले नसते. उदा. मायबोली, मनोगत सारख्या साईट्स.. ज्यांच्यामुळे मी मराठी कविता वाचायला लागले. (आणि त्या कळायलाही लागल्या.. :)) माझी आई जरी कविता करत असली तरी दुर्दैवानी (आणि तुमच्या सुदैवानी) ती देणगी माझ्याकडे नाही. त्यामुळे फक्त वाचनावरच आनंद मानायचा.. मायबोली मी मुख्यतः कथा-कविता-विनोद-विडंबन ई. साठी वाचते. फारच उत्कृष्ठ दर्जाचे साहीत्य आहे तिथे. अनेक दर्जेदार कवी, कवयित्री,photographer,चित्रकार आहेत तिथे! मायबोलीचा उपयोग मी कविता लिहीण्यात जरी केला नसला तरी मी चित्रे काढू लागले.. गझल कशाशी खातात ते मला कळू लागले.. (आणि आता तर गझलेची कार्यशाळा सुरू झाल्यापसून ते आपल्या बसची बात नाही हेही कळाले!) खरच मायबोली वर जाऊन आले की असे वाटते आपण किती दरिद्री आहोत! काही म्हणून प्रतिभा नाही... हा एक ब्लॉग काढुन महीना झाला तरी काय लिहावं कळत नव्हतं.. आणि या लोकांना इतक्या चांगल्या कल्पना सुचतात कशा, आणि ते त्यांना शब्दांत बांधतात कसे, हे माझ्यासाठी कोडंच आहे! पण ठीके.. आपल्याला निदान वाचता येते याचा आनंद होतो अशावेळी. मनोगत देखील अशीच एक साईट.. पण ती आता पूर्वीसारखी नाही राहीली.. सुदैवानी मायबोली अजूनही तशीच दर्जेदार आहे. (हे माझे मत.. अनेकांना मनोगत अधिक चांगली वाटू शकते.) मराठीब्लॉग्सनी तर खजिनाच उघडला माझ्यासाठी.. इऽऽतके (मराठी) ब्लॉग्स.. आणि काही काही लोकांचे ब्लॉग्स असेच सुंदर.. कुणाकुणाचे नाव घ्यायचे! पण तरीही.. ट्युलीप च्या ब्लॉगनी मलाही ब्लॉग सुरू करावा अशी ईच्छा झाली. इतके सहज आणि सोप्पे असतं होय ब्लॉगींग.. मग काय अवघड आहे! ( पण आता कळतय सहज आणि सोप्प लिहीणेच सगळ्यात अवघड आहे!) आपल्या आयुष्यातले काही प्रसंग इथे share करणे वाटत तितकं सोप्प नाहीय. पण लिहायची इच्छा निर्माण झाली हे मात्र खरं...
या बेकारीच्या दिवसांत(जे अजून चालूच आहेत!) अक्षरशः पुस्तकांचा फडशा पाडला.. (मी वाचलेली पुस्तके, आवडलेली पुस्तके वर नंतर कधी तरी लिहीन..)
दुसरी माझी activity म्हणजे गाणी ऐकणे.. इंजिनिअरींगच्या काळात खरे म्हणजे हे वेड लागले.. अनेक सुंदर जुनी-नवी हिंदी , इंग्लीश, मराठी गाणि ऐकली.. शास्त्रीय बैठकीची ही गाणी (कधीकधी) आवडू लागली.. (इथे पण, माझी आई उत्तम गाते.. पण माझ्याकडे तो गुण नाही.. आम्ही फक्त कानसेन.. ) इतकी गाण्याची आवड असूनसुद्धा मी कधी आयडिया सारेगमप चा एकही भाग पाहू नाही शकले... कारण तो t.v. वर लागतो! .. हो मी आख्ख्या २४ तासात २४ सेकंद सुद्धा t.v. पहात नाही. पाहीलाच तर discovery, natgeo, pogo!, cartoon network (:D) etc etc.. बाकी t.v. वर पाहण्यासारखे काहीही नसते असे माझे स्पष्ट मत आहे! (पुणेकर आहे मी.. इथे-तिथे मतं नोंदवलीच पाहीजेत!! )
भाषा शिकायची आवड खरं म्हणजे मला लहानपणापासून आहे. ८वी मधे जेव्हा संस्कृत शिकले, तेव्हापासूनच मी संस्कृतच्या प्रेमात पडले. ( याला बर्वेकाकूंचा क्लासही कारणीभूत आहे.. ) पण जसे ठरवले तसे मी काही संस्कृत शिकणे चालू ठेवले नाही.. आई आणि भाऊ शिकले असल्यामुळे असेल पण japanese बद्द्ल उत्सुकता वाटतीय.. थोडं-थोडं शिकतही आहे.. मानसीमुळे जर्मन बद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालय.. पण ती भाषा मला उगीचच (अस तीचे म्हणणे..) अवघड वाटते.. बाकी भाषांमधली spanish पण जरा शिकायला बरी वाटतीय.. बाकीच्या भाषा मला या जन्मात जमतील असॆ वाटत नाही!..
एकंदरीत माझे interests पाहता मी चुकून engg ला आले की काय असे वाटते. पण मला Computer बद्दल प्रचंड fascination आहे.. नविन टेक्नॊलॉजी,सॉफ्टवेअर्स शिकणे/शोधणे मला खूप आवडतात.. computer दुरुस्त करणे हेही मला खूप आवडते.. (ofcoz माझ्या भावाच्या-कपीलच्या मदतीने) आणि माझ्या comp. लाही माझी ही आवड कळल्यामुळे तो बर्‍याचदा बंद पडुन मला माझी आवड जोपासायला मदत करतो! .. :D
अर्थात जरी हे सगळे interests/hobbies असले तरी बेकार घरात बसणे अजिबात सुखावह कल्पना नाहीय.. इतके प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, ही फार छान भावना नाहीय़! आपलं काय चुकते म्हणून नोकरी मिळत नाही, आपण Loser आहोत या विचारानी frustration येतं.. आधीच फार friendly नसणारी मी या विचारांनी अजून एकटी राहायला लागते.. लोकांना face करावसं वाटत नाही.. आणि मी 'माणुसघाणी' म्हणून ओळखली जाते !.. :( पण हे तेवढ्यापुरतंच.. दुपारी मी अशी असीन तर संध्याकाळी मस्तपैकी रेडीओ मिर्ची ऐकत jogging करत असते.. afterall i knw am capricornian, and capricorn ppl hav to fight alot to achieve success! (कुणाला असा अनुभव मगरींनो ?? :D )
neways.... हे सगळं फारच 'मी-माझं-मला' झाले का?? पण शेवटी हा 'माझा' ब्लॉग असल्याने 'मी' 'माझ्याशिवाय' नाही तर अजून कुणाबद्दल लिहीणार?
पहीलंच पोस्ट असल्याने आणि काही विषय डोक्यात नसल्याने हे लिखाण बरेच random आणि abstract झाले असण्याची शक्यता आहे.. कुणी वाचलंच.. आणि त्यातून आवडलंच तर अवश्य कळवा! (म्हणजे मला पुढे लिहू की नको ते कळेल.. :) )
Signature2

२ फेब्रुवारी, २००७

॥ श्री ॥

पहिले पोस्ट..... !!

www.marathiblogs.com वरचे ब्लॊग्स पाहून आपणही ब्लॊग लिहावा अशी बरेच दिवस मनात इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं. :) सगळेच इतकं सुरेख लिहीतात की आपलॆ पोस्ट कोण वाचणार ही शंका.. तरीही काहीतरी लिहायची इच्छा झाली तर असु द्यावा म्हणून हा खटाटोप.. लवकरच इथे काही (पब्लीश करण्याजोगं) लिहीता येईल अशी आशा करते ! तोपर्यंत टाटा..

२५ जानेवारी, २००७

About Me?

ब्लॉग सुरू करून वर्ष उलटून गेले,तरी मला अजुन इथे काय लिहावं हे काही झेपत नाही..
ब्लॉगवर इतकी सारी बडबड करून देखील अजुन मला स्वतःबद्द्ल ४ ओळी लिहीता येत नाहीत..
माझ्यासाठी सर्वात कठीण काम....
थोडक्यात असं बघा..
हा माझा ब्लॉग, माझे विचार.. वाचून बघा..
विचार वाचून कळेलच मी कशी आहे/असेन ते.. काय?

Archives

श्री
काय करतेस दिवसभर??"
Rave Party & TOI..
चार्ली चॅप्लिन..
I knew I loved you, before I met you..
मागचा आठवडा..
पेन स्केच ( वैशाली )
hmm.. nostalgia..
नेनचिम!
पेन स्केच ( बाप-लेक )
तारे जमिन पर! :)
लायब्ररी !!
आश्चर्याचा सुखद धक्का! ( लोकसत्ता मधे दखल!)
माझी शेफगिरी(मांचुरिअन)
कंटाळा
बटर चिकन, बिर्याणी..
चिल्ड्रेन ऑफ हेवन !
पेंटींग ( वारली - मोर )
अपेक्षाभंग.. वळू
काही फोटोज..
अविस्मरणीय..
आठवणी
Women Of Tilonia..
The Goal..!
भुकंप.!
कंग पाओ टोफु...
Feels like heaven..!
आवडलेले काही - कवितांचा खोखो.
एका इ-लग्नाची गोष्ट!! :)
इडियॉक्रसी..!
आली दिवाळी...!
"स्वच्छतेच्या बैलाला..." च्या निमित्ताने..
एक उनाड पोस्ट... :D
माझेही दोन पैसे.. सारेगमप
डबा ऐसपैस
माझी खाद्ययात्रा
धमाल!
द हॅपनिंग!
माझी भटकंती - ओहाय (Ojai)
माझ्या आयपॉडमधील खजिना!
मी - एक करोडपती! :)
आईची कवीता.. संक्रांत..
कॉलेजचे भन्नाट दिवस!
दगडावर कोरलेले क्षण..
Zoo Zoo..!
१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!
Wish List..
मी टिपलेली काही फुले!
रंगरंगिले छैलछबिले!! :)
सूर्य-ढगांची लपाछपी
माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )
Gone too soon..
माझी भटकंती - सोल्वॅंग - California's Little Denmark
पुस्तकं
ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!
लॉंग ड्राईव्ह.. !
एक उनाड पोस्ट! :D
अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!
अमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..
अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी १
अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल .....
Vonage World – एक सुवर्णसंधी !
धडपड नोंद !
8 Movies I liked the Most
SSKचे दिवस ! :D
आपण मराठी लोकं Blogs/कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी 
Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..
अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट
अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !
टॅग – टॅग ..
तो पाऊस.. हा पाऊस..
गुढी.. आह.. 
साझ !
ल्हानपण देगा देवा !
एक भन्नाट दुपार !
थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Tha...
नीलरंगी रंगले…
विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!
कंटाळा
बटर चिकन
माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...