धडपड नोंद !
[ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip, which I was planning to finish ASAP. त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय! त्यामुळे आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! ]
ह्म्म… विषयाचे बंधन नाही ही चांगली गोष्ट आहे, पण एक तरी विषय पाहीजे ना डोक्यात? जो होता मोठ्ठा तो बाजूला सारला. आता विचार करतीय काय लिहू?? हल्ली डोक्यात इतके काय काय चालू असते ना, की प्रत्येक क्षणी येत असतं या गोष्टीवर आपण नीट लिहूया, त्याच्यावर वाचले पाहीजे, interesting आहे वगैरे. पण प्रत्यक्षात लिहायला बसले की नाहीच काही ते आठवत. मजाच आहे !
सद्ध्या मी इतक्या गोष्टींवर वाचतीय :
- सेल्फ होस्टेड ब्लॉगमध्ये काय काय सुधारणा / प्लगिन्स असले पाहीजेत?
- माझा आवडता टॉपिक, Search Engine Optimization, हा तर मी नेहेमीच वाचत असते, माझ्या ब्लॉगवर प्रयोग करत असते. नक्की कशामुळे माहीत नाही, पण हल्ली Search Engines, Image Search मधून वगैरे माझ्या ब्लॉगवर भरपूर हिट्स येत आहेत. (हा माझ्या प्रयोगांचा परिणाम आहे की नव्यानेच वर्डप्रेसवर आले त्याचा हात आहे गुगललाच माहीत!)
- The Lost Symbol - हे अफलातून पुस्तक मी निम्म्याहून अधिक संपवले. Dan Brown हा माणूस भारी आहे बाकी काही नाही! त्याचे प्रत्येक पुस्तक वाचताना मी मनातल्या मनात बोलत असते, ” हा माणूस वेडाय का?” , “इतके कसं भारी सुचते??” , “किती अभ्यास केला असेल त्यानी??” वगैरे..
- पानिपत वाचायला घेतले होते. दूर्दैवाने ते मी वाचूच शकत नाहीये ! ऐतिहासिक पुस्तकांचा कंटाळा का आला हे मात्र मला समजत नाही आहे.
So , सद्ध्या वाचनाच्या आघाडीवर तसे चांगले चालले आहे. मध्यंतरी घाबरगुंडी उडाली होती माझे न-वाचन पाहून!
निनादने मला मस्त टॉपिक सुचवलाय ब्लॉगसाठी . सिरीजच होईल ती एक. “धडपड नोंद” वगैरे नाव शोभेल त्याला! मी दिवसातून इतक्यांदा, इतक्या ठिकाणी, माझ्याही नकळत आपटत,पडत,घसरत,ठेचकाळत असते की विचारायची सोय नाही! आता विषय निघालाच आहे तर काही नोंदी – भूतकाळातल्या – नोंदवूनच टाकते!
- इयत्ता ११वी, कॉलेजचा पहीला दिवस. काहीतरी टाईमपास मुख्याध्यापकांचा Address असा कार्यक्रम होता. मी जवळजवळ ३इंचाचे हाय हिल्स घालून पॅसेजमधून चालत खूर्चीपाशी येत होते. उशीर झाल्याने सर्वच जणांचे माझ्याकडे लक्ष गेले, आणि मी जमिनिवर ! ) कोणीतरी लांबून तरंगत येतंय आणि दुसर्या क्षणाला भूईसपाट होतंय म्हण्जे हाईटच होती ती! ( ३ इंचाचे वगैरे हायहिल्स मी तेव्हा का परिधान केले होते मला कल्पना नाही ! जीन्स आणि टिशर्ट असा वेश असताना, त्यातून कम्प्लिट बॉयिश हेअरकट असताना खाली इतके उंच हिल्स का घातले होते हे ” तेव्हाच्या – मलाच ” माहीत !!)
- त्याच ११वीच्या प्रॉपर शालेय जीवनाचा पहिला दिवस. सेमी इंग्लिश माध्यमातून आलेल्या मला, माझ्या आयुष्यातला तो पहीलाच इंग्रजाळलेला दिवस अगदिच कोंडून ठेवल्यासारखा वाटला होता! त्यामुळे पटापट जीने उतरत कोपर्यावर असलेल्या माझ्या घरी पळण्याच्या तयारीत होते. आणि चिखल लागलेल्या जीन्यावरून घसरत खाली! ( कॉलेजमधल्या सर्व लोकांशी माझी इन्ट्रॉडक्शन ही अशी झाली!)
- अगदी सेम टू सेम फ्रेम माझ्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवशी रिपिट झाली! [ या योगायोगाचे कारण मला माहीत नाही! ]
- आणि ही त्याकाळातली सगळ्यात हाईट !! – मी आणि मिथू, डेक्कनवर काहीतरी शॉपिंगला गेलो होतो. गाडी लावली व चालत कुठेतरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे प्रचंड बडबड चालूच होती! आणि अचानक माझा आवाज बंद. म्हणून मिथूने पाहीले तर मी शेजारी नाहीच ! मी जमिनीवर पडून विव्हळत – कम – हसत बसले होते !! ) I still remember that look of mithu. “How on the earth do you fell on the plain road??? “ का आणि कशी पडले ते अजुनही माहित नाही! पण अशक्य किस्सा आहे तो !
बरेच बरेच किस्से आहेत असे ! भूतकाळातले नाही आठवले तरी मी भविष्यात नक्कीच लिहीन असा मला आत्मविश्वास आहे ! मला कधी कधी शंका येते, माझ्या मेंदूत आणि हाता-पायात काही सिन्क्रोनायझेशन नावाची चीज आहे की नाही ?? पण ते जाऊदे, कारण काहीही असले तरी मी नेहेमीच ट्रॅक सोडून पडते – पळते !
( जसा आज मी प्रवासवर्णनांचा ब्लॉगिंग ट्रॅक सोडलाय ! पण मला हाच ट्रॅक आवडतो ! व्यवस्थित ठरवून, शिस्तित लिहीत बसायला ही काय ब्लॉग स्कूल आहे का! )
टिप्पण्या