मराठी Blogs, ब्लॉगविश्व इत्यादी
तुम्हा वाचकांना माझ्या एकंदरीत Blogging Activity वरून एक समजले असेल. मी हल्ली खूप लिहीते. कधीकधी भंगारही लिहीते. कधी विषय असे धुमकेतूसारखे उगवतात, कधी मी एकदम Technical होते. आणि कायमच Blog Templates/ Themes आणि Widgets च्या शोधात असते. थोडक्यात मी या ब्लॉग्स प्रकरणात पूर्णपणे बुडून गेले आहे. मी हल्ली मराठी फोरम्सवर पडिक राहणे टाळत असून खूप खूप इतर इंटरनेटवर वाचत आहे. [ मराठी फोरम्समधे काही राम नाही हे माझे बहुमूल्य मत देखील नोंदवून टाकते! :D अर्थातच मायबोली हा अपवाद! ]असो. तर सांगण्याचा मुद्दा हा, की फोरम्सपेक्षा ब्लॉग्स हे जास्त उपयोगी वाटू लागले आहेत मला. एकतर काय वाचायचे हे आपल्या हातात राहते. उगीच समोर येईल ते वाचणे, मग ते भडक विधाने दिसली की आपला माथा भडकणे, हिरीरीने भांडणे करणे यापेक्षा आपल्यास जी माहीती हवी आहे तीच शोधून तीच्याबद्दल वाचणे फार उत्तम!
गेल्या काही दिवसात मी खूप इंग्रजी ब्लॉग्स देखील वाचले. बरेचसे टेक्निकल. SEO [Search Engine Optimization] , How to make money online?, Blogging tips वगैरे जास्त होते.प्रत्येक ब्लॉग हा;
- उत्तमरित्या सजवलेला,
- उपयोगी आणि खरंच काही अर्थ असतील अशी विजेट्स – प्लगिन्स,
- Technically Advanced,
- माहीतीने भरलेला [आणि अर्थातच जाहीरातींनीसुद्धा भरलेला!] आणि,
- कमेंट्स सुद्धा भरभरून असलेल्या..
हं, तुम्ही म्हणाल असे मराठी ब्लॉग्स सुद्धा आहेत की! आहेत आहेत.. पण यात फरक होता, की बरेच व्हीजिटर्स हे सोशल नेटवर्कींग साईट्सवरून किंवा Dig, StumbleUpon, Technorati इत्यादी ठिकाणांहून आलेले होते. आपण मान्य करू की ते ब्लॉग्स English मधे असल्याने जास्त श्रोतृगण मिळतो. बरोबर आहे. इंग्लिश ही तर जगाची भाषा! अगदी फाडफाड बोलता नाही आली तर समजते तर नक्कीच! त्यामुळे जास्त ट्रॅफीक, जास्त कमेंट्स, जास्त आर्टीकल्स डिग्ड, जास्त टेक्नोराटीच्या ऑथॉरिटीज, जास्त स्टम्बल्स अर्थातच जास्त पैसा वगैरे वगैरे… [ पण पैसा हा मुद्दा नाही आहे माझा. कारण ब्लॉगिंगमधून पैसा कमवायला खूप खूप मेहनत, लिखाण, माहीती, टेक्निक अवगत असले पाहीजे.. ]
Building Blogging Network, Having Niche Blogs, Different Aggregators
हे सगळं आपण कधी सुरू करणार? मराठीमधील ब्लॉग्स – त्यातूनही माहीतीपूर्ण ब्लॉग्स तसे कमीच आहेत. पण ब्लॉगचा Niche कुठलाही असला तरी ज्याला ब्लॉगिंग नेटवर्क जोडणे म्हणतात ते होत नाहीये फारसे. मराठीब्लॉग्स, ब्लॉगअड्डा, ब्लॉगवाणी, इन्डीब्लॉगर सोडले तर मराठी ऍग्रिगेटर्स कमीच! नेटवर्कींग काय होईल तर ऑर्कुट, फेसबुक आणि ट्विटर.. अजुन काही दुसरे मला आठवत / दिसत नाही!
मुळात हे सगळं माझ्या मनात का येतंय ? काही दिवसांपूर्वी मी बर्याच ब्लॉग्सना कमेंट्स द्यायचे. लिंक एक्स्चेंज व्हायची, ओळखी व्हायच्या. आता मी फारसे नाही करत. कारण? मला वाटते आपण आपले आयुष्य फार फास्ट व उगीचच व्यस्त करून ठेवले आहे. एखादे छान पोस्ट वाचले की कमेंट द्यायला कितीसा वेळ लागतो ? पण भराभरा पुढे सरकायची घाई! कुठे जायचे असते कोण जाणे… पण जे आहे / जे बघत आहे / जे वाचत आहे ते पटाकन उरका! इंटरनेटमुळे बैठक मारून वाचणे कमी झाले आहे असे मी काही महिन्यांपूर्वी एका पोस्टमधे लिहीले होते ते परत आठवत आहे मला. [ बायदवे, अजुनही असे ब्लॉगर्स आहेत जे नित्यनेमाने लिहीतात, कमेंट्स लिहीतात सर्वांना , हे खरंच कौतुकास्पद आहे. ] असे सर्वांनी वागले तर मराठी ब्लॉगिंग खूप पुढे जाईल. बरं असो.. मी फारच फिलॉसॉफिकल झाले का? :D
शेवटी इंटरनेटचे हे जग. http://secondlife.com/ सारख्या वेबसाईट्स येत आहेत. वेबवरसुद्धा एक आयुष्य निर्माण झाले आहे, उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे ते. आणि काय काय नाही ?? त्यामुळे या सर्व गोष्टींना महत्व हे आहेच! प्रश्न हा आहे, आपण हे महत्व किती लवकर जाणून घेणार आहोत याचा !
---------------------------------------------------------------------------------
comments pan save karte ithe..
टिप्पण्या