अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!

दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..
मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये..
शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..
आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..
ग्रोसरी काय आणायची, अभ्यास कसला करायचा, शॉपिंगसाठी कुठ्ल्या दुकानात जायचे, घर कसं आणि कुठून आवरायचे याचबरोबर मी नेहेमी प्रवासाला जायच्या आधी लिस्ट करते.. बॅगेत भरायच्या सामानाची लिस्ट. यात सबलिस्ट येते. बाहेर भटकायचे कपडे, घरात घालायचे कपडे त्यांची लिस्ट.. त्यानंतर येतात कॅमेरे, हॅंडीकॅम्स, त्यांचे व सेलफोन्सचे चार्जर्स .. अर्थातच सेलफोन्स सुद्धा! शिवाय टोप्या व गॉगल्स, सनस्क्रीन लोशन्स पाहीजेतच! त्यांना मोठा गोल – न विसरण्यासाठी.. आवरण्यासाठी लागणारे सामानाची वेगळी लिस्ट.. त्यातही सबलिस्ट करता येते.. माझे कॉस्मेटीक्स आणि नवर्‍याचे दाढीसामान,पर्फ्युम्स वगैरे वेगळंच..
असो.. मी इथेही बॅगच भरायला लागले की… :D
तर हे सगळं करताना एकीकडे कागदपत्रांची लिस्टही करणे जरूरी होते.. टोटल सहा दिवसांच्या मुक्कामात लागणारी हॉटेल बुकींग्स, रेंटल कार्स, उडणारी विमानं, पळणार्‍या बसेस सर्वांची कन्फर्मेशन्स..
आणि धडाम धूम! ४ तारखेला संध्याकाळी ४वाजता माझ्या लक्षात आले की अजुन न्युयॉर्क मधले हॉटेल, तिथे घ्यायच्या टूर्स शिवाय रेंटल कारचे काम बाकी आहे !! :O मग काय नुसती पळापळ.. एका साईडला फ्रिजमधे पेरिशेबल वस्तू नाहीयेत ना हे पाहायचे, तर दुसरीकडे हॉटेल कुठले हे शोधायचे.. हॉटेलं सगळीच महाग! मग निदान टूरला जवळ पडेल असं तरी शोधावं.. अरे देवा, टूर कुठे बुक केलीय अजुन! ओह तो आवडता टॉप बॅगेत टाकायचा राहीला.. नायगराला थंडी असेल, स्वेटरही टाकला पाहीजे.. टुर कुठली घ्यावी? महीन्याभरापूर्वी एक चांगले टूरचे पॅकेज सापडले होते.. आता कुठून शोधू मी? साईटचे नावही आठवत नाहीये.. हिस्टरीचे रेकॉर्ड्स पाहावेत.. अजुन डिलीट केली नसेल तर बरंय.. हा, हे हिस्टरीचे पान .. नेक्स्ट .. नेक्स्ट .. नेक्स्ट.. टॉप आणला… नेक्स्ट ..नेक्स्ट .. स्वेटर, टुथब्रश ठेवले.. नेक्स्ट .. नेक्स्ट.. ( आईगं किती ब्राउझिंग करते मी!! ) नेक्स्ट.. थोडा लाडू चिवडा आणि प्रिंगल्स ठेवावेत.. लागतात प्रवासात.. नेक्स्ट.. नेक्स्ट .. निनादचीही बॅग भरून ठेवावी, त्याला काय २ जीन्स ५ शर्ट्स.. बास होतात! मुली का नटतात इतक्या! .. नेक्स्ट.. नेक्स्ट.. हुश्श.. सापडली एकदाची! ह्म्म.. टूर करून टाकते बुक.. आता टूर कुठून निघतीय त्या रस्त्याच्या आसपासचे हॉटेल.. आईगं.. न्युयॉर्क पाहीले पण नाही आणि हे असले पत्ते शोधायचे! बर शोध.. किती वाजले.. ४.३० ? मायगॉड! ..
ओके हा रस्ता , इथून नाईट टूर निघतीय.. गुगल मॅप्स वर ब्रॉडवे आणि ऍव्हेन्युज टाकले तर मिळेल का जागा? होप सो! अर्रे रेस्टॉरंट मिळाले हे, खूण सांगितलीय टूरवाल्यंनी.. म्म म्हणजे हाच पत्ता.. आता हॉटेल्स.कॉम .. हा पत्ता टाकला, हॉटेलं कैच्याकै महाग देऊ नका! ११०-१२०$/पर नाईट पुष्कळ बख्खळ झालेत.. ह्म्म बरी दिसतायत की हॉटेल्स! अरे वा.. हॉलिडे इन.. चांगलेच असणार हे.. हरकत नाही.. ओह वेट.. रेंटल कार कुठे परत करायचीय ? ला गार्डीआ एअरपोर्ट.. तो कुठे आला आता? ४.५ माईल्स? सुपर्ब!! करून टाका बुक!
निनादला विचारून कन्फर्म केले सगळे , सर्व बुकींग्स झाली..
आता मिशन बॅग्स .. अर्ध्या तासात संपलंच पाहीजे.. पण किती अवघड आहे हे.. फार फिराफिरी करावी लागणार तीही सामान बरोबर ठेऊन म्हणून सोयीच्या बॅगपॅक्स आणल्या.. भल्या मोठ्या आहेत, पण तरी बॅगपॅक्सच ना त्या.. कितीसं सामान बसणार.. मला सगळे पातळ, कॉटन्चे वगैरे टॉप्स घ्यावे लागणार म्हणजे.. स्वेटर हातातच ठेवावा.. नशीब बॅगपॅक्स्ना रोलर व्हील्स आहेत.. हवे तेव्हा फरफटत न्यायची! … ह्म्म ही झाली माझी बॅग .. आता निनादची.. पटकन होते.. महत्वाची कागदपत्रं टाकली की झालं…
ओके फ्रीज व्यवस्थित आहे .. डिशवॉशरला काहिही लोड केले नाहीये. गॅस बंद .. घर पण जरा आवरून ठेवलंय.. जाताना पॅकींगचा पसारा होतो खरं, पण परत घरी येताना ते छान नीटनेटकंच बरं वाटतं.. मग तेही करून झाले.. हॅंडीकॅम चार्जिंगला लावून ठेवलाय तो ठेवला पाहीजे बॅगेत.. कॅमेर्‍याच्या बॅटर्‍या .. अरे किती वाजले… ६.४० ?? अजुन निनाद आला नाही! काय हे… ७ ला निघायचे होते.. तो LAX चा एअर्पोर्ट म्हणजे दिव्य आहे! ४ तास आधी निघालंच पाहीजे.. नशीब आला निनाद.. आता मी फ्रेश झाले की निघूयातच..
४ सप्टेंबर २००९ : ७.३५ मिनिटे .. अरे काय हे.. कधीपासून आवरतीय.. तरी साडेसात वाजले.. अजुन काही खाल्लं नही.. आय होप एअरपोर्टवर वेळ मिळेल खायला.. ह्म्म.. अरे वा आज गर्दी नाहीये नाही रस्त्याला! चक्क चक्क !! डॉट नऊला एअरपोर्ट पार्कींग्मधे ? गुड!
गाडी लावून जायचंय ना.. परत येताना बरं,आपलीच गाडी असली की.. मध्यरात्रीचे शटल कुठून करून जायचे… आता हे एअरपोर्ट पार्कींग का सापडत नाहीये ? किती गोल फिरायचे! :( हेच असेल अरे निनाद.. ऐक.. त्या बाईला विचारते.. हेच आहे.. परत जाताना क्न्फर्मेशन कोड दाखवायचाय.. ओके .. चला.. दुसर्‍या मजल्यावर मिळालं पार्कींग.. लिफ्टने आलो खाली.. निनाद विचारायला गेलाय बरोबरे ना ते? पण चुकलंच शेवटी.. लॉंग टाईम पार्कींग करायचे ३ ते ७ मजल्यावर! लिफ्ट यायला तयार नाही!! १० मिनिटं उभे आहोत जड बॅगा पाठीवर टाकून!! जाऊदे पळतच चढूया… बसलो गाडीत निनाद निघाला ७व्या वरच! नंतर टेन्शन नको.. लिफ्ट परत ढपली! ७ मजले उतरून खाली !! घड्याळ : ९:४५ रात्रीचे.. ठीके.. एक तास आधी आलो आहोत.. १०:५५ ची फ्लाईट ! आता शटलची वाट पाहू.. येईलच, मगाशी ४-५ आल्या डोळ्यादेखत…
पण आत्ता का येत नाहीयेत? आम्हाला एक मिनिटसुद्धा इतका महत्वाचा आहे आणि तुम्ही १५ मिन्टं झाली येत नाही म्हणजे काय ?? चालत जाऊया का? छे.. कुठाय एअरपोर्ट माहीत्तीय़ का? खात्रीनी विमान चुकवू आपण! थांबूया.. १०:१७ मिनिटं … आलं एकदांचं शटल.. पण नेमका आपला स्टॉप शेवटचा का? :( अरे लवकर चल की सभ्य गृहस्था!! :( विमान चुकवू नकोस… पुढचे सगळे प्लॅनिंग कोसळेल!! डेल्टा.. नाही… साउथवेस्ट.. नाही रे बाबा!! कधी येणार.. हा.. आलं.. सुटा पळत !!!!!
१०:२४ मिनिटं .. बोर्डींग पाशी .. समोरचा माणूस : huh talk about the timing ! if it was one minute later my system would not have allowed you!! goo run ! you will still make it! :)
परत पळा … सिक्युरिटीला लाईन दिसतीय.. देवा .. काय हा सस्पेन्स.. प्लीज प्लीज जमूदे …
ती बाई आली विचारत आमचे नाव. .. आहोत गं आम्ही.. आलोच एव्हढं सिक्युरीटी चेक करून.. विमानाला म्हणावं थांब!!
टींग.. अर्र.. माझा बेल्ट राहीला.. परत टिंग ?ह्म्म किल्ली राहीली खिशात .. तिकडे निनादच्या बॅगेत टिंग.. ओह.. शेव्हींग क्रीम कसं चालेल कॅरीऑन लगेजला! घ्या काढून.. काय खुष झाला होता तो समोरचा! फुकटात मिळालं ना! :|
अरे हे काय…
निनाद थांब!! मी अजुन शूज घालतीय.. ओह गॉड हा पळायला पण लागला.. कसा पळू शकतोय एव्ह्ढी बॅग पाठीवर टाकून ?? अरे माझे शूज का जात नाहीयेत… तसंच पळते.. केहढी जड आहे सॅक.. किती कपडे घेतले मी नेमके? धड पळता पण येत नाहीये शूज अर्धवट घातल्याने.. टाचा बाहेर आणि बोटं शूज मधे! काय फनी दिसत असेन मी.. :) ))
हा असा का पळतोय!! कुठे आहे गेट नक्कि?? अगदी जिना चढून झाला.. उजवीकडे वळलो..(शूज गेले पायात नीट, पळतापळताच!! हुश्श.. आता पळता येईल.. ) मग सरळ जऊन परत डावीकडे !! मग एक चौक लागला! आयमिन तिथे चारी बाजूला गेट्स होते… आमचं कुठलं? परत पळत जाऊन उजवीकडे!! अरे वा… विमान आहे अजुन !! धॅन्टॅन्डॅन !!!!
शेवटचे पॅसेंजर आम्ही .. ! हाफ हुफ करत बसावं तर बॅगांना जागा नाही.. अरे बसवा ना कसं तरी, चेक इन कशाला तेव्हढ्यासाठी.. बर चेक इनच करायचे असते तर निनादचे शेव्हींग जेल नसते का आले !! :(
हुश्श… सर्वात शेवटी आमच्या बॅग्स बसल्या एकदाच्या .. आणि आम्हीही बसलो !!
किती पळापळ ?? काही सुमार ? पाणी नाही अन्न नाही! ही लोकं काय दाणे देणार.. बर पाणी द्या आधी प्लीज..
आय होप मला विमान लागणार नाही! :( हा निनाद मुद्दाम घाबरवतो.. हं ठीके झालं नीट टेक ऑफ.. पाणी प्यायले, दाणे खाल्ले.. आता झोपा.. पाय आखडून का होईना ! ५ तासांनी बाल्टीमोर !!
:)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!