१५ मार्च, २०१२

8 Movies I liked the Most8 Movies I liked the Most


आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच.
अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ?
My Cousin Vinny :
आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्‍याला तर ह्याचे डायलॉग्स, त्या विनीच्या ऍक्सेंटसकट पाठ आहेत! माझेही होतील आता. इतक्या वेळेला लागतो टीव्हीवर, व आम्ही नेहेमी नेहेमी पाहतोच !! ( Rating : 5/5 )
Evan Almighty :
Bruce Almighty नंतरचा हा सिक्वेल. वेल, ब्रुस अल्मायटी सहीच आहे! पण यात Jim Carrey नसून Steve Carell आहे. आणि त्याने अफलातून काम केले आहे! ( माझा आवडता ऍक्टर तो. ) चित्रपटाची थीम तशीच, हा देवाचा धावा करतो, आणि देव खरंच मदतीला येतो! आणि वर एक विचित्र टास्क सांगतो त्याला.. बघाच तुम्ही! :) यालासुद्धा ५/५
Legally Blonde
बराच उशीरा पाहीलेला पण प्रचंड आवडलेला मुव्ही ! आपल्याकडचे सरदारजीचे जोक्स जसे फेमस तसे इथले ब्लॉन्ड्सचे.. ही ब्लॉंड इथे काय काय धमाल करते ते पाहाच तुम्ही ! Total Entertainment !! ( Rating : again 5/5 )
LegallyBlonde
Wild Hogs :
हा सुद्धा सारखा टीव्हीवर लागलेला असतो ! मस्त टाईमपास आहे.. दैनंदिन आयष्याला आणि कटकटींना वैतागलेले कॉलेजपासूनचे मित्र असलेले ४ जणं शेवटी बाईकवरून रोड-ट्रिपला निघतात.. त्यांचा पूर्वीचा वाईल्ड हॉग्स हा ग्रुप परत एकदा नवनिर्माण करतात, आणि त्या भल्या थोरल्या बाईक्स घेऊन, ते काळे कपडे घालून ,अगदी आपले सेल फोन्स सुद्धा फेकून देऊन आपल्या आयुष्याला हॅपनिंग बनवायला जातात आणि ५० Bikers च्या घोळक्याच्या खुन्नशीमधे अडकतात! :) ) फार सही आहे हा चित्रपट! ( Rating 4/5 )
wild-hogs
Flight Plan :
एक थरारक चित्रपट . म्हणजे मी नंतर सुन्नच होऊन बसले होते. असे कसे काढतात पिक्चर्स? डोकं कसं चालतं?
मला या पिक्चरमधले काय आवडले म्हणाल, तर हा पिक्चर पाहताना आपल्या मनात जितके काही आणि जे काही विचार येत -जात असतात, त्याला तोड नाही ! काय विचार येतात ते तुम्हीच पाहा. मी काहीही फोडणार नाहीये ! Must watch movie ! ( Rating : 5/5 )
FlightPlan
The happening :
या चित्रपटाबद्दल मी येथे लिहीले होते. थोडा गूढ, भितीदायक, तरीही विचारात टाकणारा चित्रपट. खूप जणांना आवडला नाही असे ऐकले. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पाहणे. मला तरी आवडला.
Idiocracy :
मी पूर्वी लिहीलेले हे पोस्ट वाचा.. :)

idiocracy

Children Of Heaven :
childrenofheaven
well,ही लिस्ट न संपणारी आहे. परंतू आत्ता इतकेच. जसे आठवतील तशी सिरीज लिहीनच.. :)
[ Disclaimer : यातले सर्वच चित्रपट मुलांबरोबर पाहण्यासारखे असतीलच असे नाही, याची नोंद घ्या. रेटींग पाहून मगच ठरवा. ]
टिप्पणी पोस्ट करा

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...