मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

long drive लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)

मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.  आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं  पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)  ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच...

लॉंग ड्राईव्ह.. !

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला.. लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्‍याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते! काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर...