पोस्ट्स

सप्टेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय..  ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला.. मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायब