मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

चित्रपट.. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'मेरू'

काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होत...

Into the wild (चित्रपट)

Into the wild खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव. रूतून बसले होते अगदी. इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात. नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही. एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला. लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द.. There is a pleasure in the pathless woods, There is a rapture on the lonely shore, There is society, where none intrudes, By the deep sea, and music in its roar: I love not man the less, but Nature more. आणि सुरू झाला प्रवास, I...

"Flight" - Amazing movie!

परवा डेंझेल वॉशिंग्टनचा ’फ्लाईट’ पाहीला.आजकाल मी मुव्हीज पाहणे अगदी कमी केले आहे. मुद्दाम नाही. पण इतक्या वेळ ताटकळत बसणे अगदी बोर होते. पण नवर्‍याने हा मुव्ही लावला अन १५ मिनिटातच मी हातातला लॅपटॉप बाजूला ठेऊन मुव्ही बघितला. पूर्ण! मला मुळातच डेंझेल वॉशिंग्टन हा अभिनेता आवडतो. आवडतो म्हणजे हृथिक रोशनसारखा नाही. की सगळे झाडून त्याचे मुव्हीज बघणार म्हणजे बघणार. मला खरंतर दुसरा कुठला मुव्ही आठवत पण नाही, डेंझेल वॉशिंग्टनचा. परंतू त्याचे जे मुव्हीज पाहीले आहेत ते आवडले आहेत. खूप संयत, सुंदर ॲक्टींग करतो तो.. मी जेव्हा बघायला लागले तेव्हा एक कळले की यात त्याने काम केले ’व्हिप’ नावाच्या पायलटची. तो विमानात जातो आणि चक्क दारू पितो! नंतर फ्लाईट अटेंडंटला ॲस्पिरीनच्या गोळ्या वगैरे मागतो. आणि .. झोपून जातो. :। त्याचा कोपायलट आपला डोळे फिरवतो व विमान चालवायच्या कामाला लागतो. भरपूर पाऊस असतो, व अतिशय वाईट हवामान. प्रत्येक हॉलिवूडपटात होते तेच इथेही होते. संकट येते. अचानक विमानातील काही कंट्रोल्स काम करेनासे होतात. व क्षणार्धात विमानाला मोठा जर्क बसतो. झोपलेला व्हिप जागा होतो, आणि एका सेकं...

8 Movies I liked the Most

8 Movies I liked the Most by BHAGYASHREE posted on OCTOBER 7, 2009 आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच. अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ? My Cousin Vinny : आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्‍याला तर ह्याचे डायलॉग्स, त्या विनीच्या ऍक्सेंटसकट पाठ आहेत! माझेही होतील आता. इतक्या वेळेला लागतो टीव्हीवर, व आम्ही नेहेमी नेहेमी पाहतोच !! ( Rating : 5/5 ) Evan Almighty : Bruce Almighty नंतरचा हा सिक्वेल. वेल, ब्रुस अल्मायटी सहीच आहे! पण यात Jim Carrey नसून Steve Carell आहे. आणि त्याने अफलातून काम केले आहे! ( माझा आवडता ऍक्टर तो. ) चित्रपटाची थीम तशीच, हा देवाचा धावा करतो, आणि देव खरंच मदतीला येतो! आणि वर एक विचित्र टास्क सांगतो त्याला.. बघाच तुम्ही! यालासुद्धा ५/५ Legally Blonde बराच उशीरा पाहीलेला पण प्रचंड आवडलेला मुव्ही ! आपल्याकडचे सरदारजीचे जोक्स जसे फेमस तसे इथले ब्लॉन्ड्सचे.. ही ब...

द हॅपनिंग...

मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला....    SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल.. काहीएक माहीत नसताना हा पिक्चर बघण्यात कदाचित जास्त मजा(भिती?) आहे !)  सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध..  आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात...  म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मा...

इडियॉक्रसी..!

असं म्हणतात माकडापासून आत्ताचा मानव विकसित झाला.. ४ पायांवरून २ पायांवर आला.. या इव्हॉल्युशन मधे शेपटीसारखे न लागणारे अवयव नष्ट झाले.. पण उद्या जर अशी वेळ आली की, मानवाने मेंदूचा, बुद्धीचा वापर करणं सोडून दिलं.. तर काय वेळ येईल?? इडियॉक्रसी बघितल्यावर समजतं काय होईल...! Joe या अत्यंत ऍव्हरेज अशा यु.एस आर्मी लायब्ररीयनला आणि Rita या प्रॉस्टीट्युटला मिलिट्रीच्या human hibernation project मधे सामिल करून घेतात.. प्रयोग असा की १वर्ष त्या दोघांना फ्रीझ करून ठेवायचं.. थोडक्यात रिसोर्सेस जपून ठेवण्याच्या दृष्टीने चाललेला हा प्रयोग..! पण होतं भलतंच.. २००५ साली फ्रीझ करून ठेवलेले ते दोघं जागे होतात २५०५ साली! ते सुद्धा ’Great Garbage Avalanche of 2505' वर..! सुमारे ५०० वर्षांत मानवामधे इतका फरक पडलेला असतो, की त्याला साध्या बेसिक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. सगळ्या समाजाचा आय.क्यु. जवळजवळ ० ला जाऊन पोचलेला असतो!! सगळीकडे स्टुपिड आणि इडियट्सचा भरणा झालेला असतो.. Joe उठतो तोच मुळी कचर्‍याच्या ढीगार्‍यावरून.. पूर्णपणे डिसओरिएंटेड असल्यामुळे काय चाललंय काही कळत नाही.. कोणाशी बोलायला जावं तर सगळ...

अपेक्षाभंग!!! ... :|

huh, पाहीला एकदाचा वळू ! इतकी हैराण झाले होते मी ऑनलाईन मिळत नाही म्हणून.. पण मिळाला, आणि अगदी उत्साहाने बसले पाहायला.. नाही आवडला मला.. :( कदाचित खूपच अपेक्षा वाढल्या होत्या त्या पिक्चरच्या चर्चेने.. म्हणून असेल.. पण तितका नाहीच आवडला.. ह्म्म आता तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.. पिक्चर ’बघायला’ मस्त वाटतो.. गावतलं वातावरण,ते राजकारण मस्त घेतलंय.. पण ज्या बद्दल आहे पिक्चर तो वळू, म्हणजे देवाला वाहीलेला, माजलेला बैल.. तो किती शांत दाखवावा? नुस्ता आपला इकडुन तिकडे फिरतोय.. आणि म्हणे डुरक्याचा लई त्रास.. तितका त्रासदायक नाहीच वाटला तो.. [ गोड आहे उलट! :))) ] आणि त्याचा सस्पेन्स तो किती! मला वाटलं चांगला मोट्ठा असणार, त्याला पकडणं खूप अवघड जाणार .. कसलं काय.. १०-५ पावलांवरून ते इंजेक्शन मारतात.. इतकी लोकं पळत , दंगा करत येतात, त्या आवाजाने बैल ढिम्म हलत नाही! ही लोकं इंजेक्शन कधी मारतायत अशी वाट पाहात उभा राहीलेला वाटतो.. असो.. ते डॉक्युमेट्री घेणं वगैरे मला विनोदी वाटलं.. आणि दिलीप प्रभावळ्कर अजिबात विनोदी नाही वाटला.. काहीच्या काही घुसडलीयेत काही काही लोकं! दिलिप प्रभावळकर, अमृता सुभाष आण...

चिल्ड्रेन ऑफ हेवन...!

काल चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला.. खूप ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून पाहायचा होता.. फार आवडला मुव्ही.. स्टोरी काय माहीतीच असेल सगळ्यांना, आणि मला परीक्षणं लिहीता येत नाहीत.. म्हणून फार नाही लिहीत.. पण मनात आलं ते उतरवतीय.. सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची इतकी सवय झाली होती, की हा पिक्चर पाहताना इतकं शांत आणि वेगळं वाटलं.. साधी पण सुंदर कथा.. साधं चित्रीकरण, साध्या लोकेशन्स..फार बरं वाटलं असं पाहून.. (सुरवातीला ते मीठ विकणार्या माणसाचं ओरडणं ऐकून तर भारतात पोचले मी!) .. इराण मधलं वातावरण, तिथले लोकांचे दारीद्र्य, झारा आणि अली इतके लहान असून त्यांचे घरकामात आई बाबांना मदत करणं.. झारा तर केव्हढीश्शी आहे! पण एक शाळा झाली की कुठे भांडी घास, नाहीतर लहान भावाला(बहीणीला) सांभाळ अशी कामं करत राहते..(झाराच्या डोक्यावर हिजाब पाहून तर कसंतरीच वाटलं.. कसं आयुष्य असेल ना तिथे मुलींचं??) ते बुट हरवणं,दोघांनी मग अलीचे बुट शेअर करणं,ती पळापळ, पैसे नसल्यामुळे बाबांना कळू नये म्हणूनची धडपड..तो समजुतदार...