SSKचे दिवस ! :D


SSKचे दिवस ! :D


sskपरवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत फिरत अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK?? तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स.S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !
इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो.. :) )

आयडिअल कॉम्प्लेक्स !

आमच्या MIT कॉलेजच्या अगदी जवळ , आजूबाजूला भरपूर कट्टे, चहा, कॉफ्या प्यायच्या टपर्‍या, शेजारी ’झेस्ट’नावाचे अतिशय उच्चभ्रू कॉफी हाउस आणि कॉम्प्लेक्सच्या खालीच “आई गं… ! “ :) नाही, मी नाही ओरडते.. आई गं , नावाचे चाट -जॉईंट होते ते.. चाट – जॉईंट ? फार मोठं नाव झाले.. त्याला आई गं च म्हणूया! तेच बेस्ट ! इतके सगळे पथ्यावर पडणार्‍या गोष्टी दिसल्यावर क्लास आवडायलाच पाहीजे ! मग सर कसे शिकवतात वगैरे राहीलं बाजूला ! पैसे भरून क्लास पक्का करून टाकला. पण बॅच कुठली मिळावी ? सकाळी ६.३० !! अरे देवा.. सकाळी ६.३० वाजता कोण्तरी इंजिनिअरिंग मॅथ्स १ शिकले असेल का? पण पर्याय नव्हता. आणि होकार भरला..
क्लासला जाण्यासाठी मिथू दुसर्‍या दिवशी सकाळी ६.१०ला वगैरे माझ्याकडे आली, तेव्हा मी झोपले होते !! :Dबाबांच्या हाकांना दाद न देत ढाराढूर झोपणे हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा बजावायचे मी! शेवटी कसेतरी घाईत आवरून घराबाहेर पडायलाच वाजले ६.२५ ! संपलं.. पहील्याच दिवशी उशीर ? सर महाशिस्तीचे असले तर काही खरं नाही ! घाईघाईने पोचलो आयडिअल कॉम्प्लेक्सला.. तर खाली मोठ्ठा घोळका गाड्यांवर बसलेला.. जवळ जवळ पावणे सात वाजले तरी सर आलेच नव्हते. हुश्श, वाचलो बुवा आज ! असं म्हणायच्या आतच कळले की This is very normal ! :D SSK सर कधीच वेळेवर येत नाहीत !! आता आम्ही आ च वासला! म्हणजे काय? मग एव्हढं टाईट शेड्युल, सतराशेसाठ ब्रॅंचेस, सगळी कडचा पोर्शन संपवतात कसे सर ?? उत्तर मिळाले : That’s SSK !! :)
जरावेळात खरंच सरांची मरून स्कॉर्पियो आली. ड्रायव्हर दिसला, मागे कोणीच दिसेना ? म्हटलं म्हणजे काय आता? ड्रायव्हरसारखे दिसणारे सद्गृहस्थच एसेस्के आहेत की काय ? पण नाही! ते मागच्या सीटवर झोपले होते .. :) )) बिल्डींगपाशी आल्यावर ताडकन उठून केस बिस नीट करून सर उतरले आणि मुलांमुळेच क्लासला उशीर होत असल्याच्या अविर्भावात कोणाएका कडे किल्ली देऊन सर्वांना वर क्लासरूममधे पिटाळले!! :) ) क्लासरूममधे बसल्यावर चक्क त्यांनी माईक काढला आणि बोलू लागले !! 8-) पहीला धक्का हा! मॅथ्स शिकवायला माईक? बर्र… ते झालंच.. पुढचा धक्का म्हणजे चक्क विनोदी बोलत होते ते! आम्ही आपले हसतोय! तेव्हाच समजलं भारी मजा येणार या क्लासला!
सरांचे उशीरा येणं अगदी रोजचंच. सुरवातीला आम्ही दोघी वैतागायचो! पण उशीराच जावं म्हटलं तर नेमके त्या दिवशी सर वेळेत हजर ! वर काहीतरी कॉमेडी टोमणे ऐकून घ्या! :) त्यापेक्षा लवकरच जाऊन गप्पा मारूया असा चांगला निर्णय आम्ही घेतला! त्यातून आमच्या ११-१२वीच्या गृपलाही सांगितले, एसेस्केलाच या, आयडियलच्या सकाळच्या बॅचलाच या! पण माझ्या घराच्या जवळ राहणारे योगिता,विशाल आणि वरूणच आले. बाकी लोक्स दुसरीकडे गेले. मग तर काय ! रोजच्या भरपूर गप्पा! सकाळच्या थंडीत कुडकुडत गॉसिपिंग करायला काय धमाल येते ते सांगूच नाही शकणार मी! :) तरी आम्ही फार सज्जन मुलं. की बावळट म्हणायचे माहीत नाही! पण त्या गप्पांना बरोबर चहा असता तर अजुन मजा आली असती. पण असले खर्च निदान तेव्हा तरी व्हायचे नाहीत. आणि त्यातून एसेस्के नक्की कधी येतायत कोणाला ठाऊक??चहा प्यायला जायचो आणि नेमके यायचे ते..
खरं आता विचार केल्यावर वाटतं, एसेस्केंचे फक्त उशीरा येणंच लक्षात राहतंय. पण मुळात किती उत्तम शिकवायची कला होती त्यांच्याकडे?? माईक घेऊन, समोरच्या पहिल्या बाकड्यावर बसून, अमिताभाअरखी पांढरी फ्रेंच दाढी असलेले ते काहीतरी जोक्स टाकायला लागले की हशा उसळायचा अगदी ! त्यांची बरीच वाक्यं मी आता विसरले. पण एखाद्याने फालतू मिस्टेक केली की ते अगदी साधूच्या थाटात शाप देणार, तेही माईकवरून : “ए इंजिनिअर/टोणग्यांनो शाप देऊ का रे??” , ” तुझा एम१ ४ वेळा राहणार बघ!!”, “(फळ्यावर गणित सोडवत) एक-दोन-तीन-चार स्टेप्स मधे गणित पूर्ण!” किंवा “हे मूल माठ आहे! “ कधी म्हणणार: ” कळतंय का टोनीलाल? की आयवा जातंय?” [ आयवा जातंय म्हणजे टॅन्जंट जातंय!! :) ) ]
एरवी क्लासला उशीर झाला म्हणून फोन केला की सर म्हणणार : “अरे फ्लायोव्हरपाशीच आहे बघ, ५ मिनिटात येतो!” (येतात पाऊण तासानी). बाकी बरीच या ओर्कुटच्या कम्युनिटीत आहेत. जरूर वाचा! :) )
त्यांच्यामुळे मला एम१ कधीच अवघड वाटला नाही! अगदी हसत खेळत क्लास पार पडला, गप्पा-गॉसिपिंग झाले, क्लासमध्ये विनोद झाले, कधी कधी ते आम्ही गणित सोडवत असताना गाणंही गुणगुणायचे!! I mean, I have never seen any teacher like this! VIT ला शिकवायचे वाटतं! आम्ही कायम म्हणायचो काय धमाल येत असेल कॉलेजमधे! त्यांच्याकडे किती गाड्या असतील हा आमचा नेहेमीचा कोड्यांचा प्रश्न!
खूप आनंदी दिवस होते ते! बघा ना, “मला” गणित कधीही न आवडलेल्या मुलीला कधीही एम१-एम२-एम३ ची भिती बसली नाही, एव्हढंच काय मी त्यात फक्त ४०वर पास न होता चक्क स्कोरही करू शकले म्हणजे काय म्हणायचे आता?? तेहि परिक्षेच्या आधी फक्त एसेस्केंची क्लासची वही वाचून जायचे! दॅट्स इट ! एव्हढं सोपं झाले होते.. हा आता कधी कधी अगदी रडकुंडीला आणायचे सर. पोर्शनच कम्प्लीट करायचे नाहीत. मग आम्ही मुलंच दमदाटी करणार, सर धावपळ करत सर्व ठिकाणांचा पोर्शन संपवू पाहणार. नेहेमी तो पूर्ण व्हायचाच असेही नाही! बरेच जण वैतागायचेही , पण आम्हाला राग असा कधी आला नाही! बहुतेक आम्ही ९०+ मार्कांची स्वप्नं पाहीली नाहीत ,त्यामुळे आमचे काही बिनसले नाही! :)
धम्माल होती पण! अजुनही आयडियल कॉम्प्लेक्स दिसले की हे सगळं आठवतं, इथे बसून तर त्या आठवणी येतातच! [ अजुनच मजा म्हणजे ग्राफीक्सचा क्लास आमचा तिथेच व्हायचा! व ते सर होते JVK ! J.V. Kulkarni ! पण त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी! ] :)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives