पोस्ट्स

जून, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी भटकंती - सोल्वॅंग - California's Little Denmark !

इमेज
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स.. जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! From Cachuma Lake, Solvang 1 लगेचच कोपेनहेगन ड्राईव्ह आला. आणि एक वेगळीच सिटी सामोरी आली ! From Cachuma Lake, Solvang 1 From Cachuma Lake, Solvang 1 १९११ साली काही डॅनिश शिक्षक मंडळी या गावात आली व त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली. (ती काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.. तिथे १९१४ साली Atterdag College सुरू झाले, जे आता अस्तित्वात नाही.. ) या डॅनिश मंडळींबरोबर त्यांची संस्कृतीही आलीच.. ती त्यांनी जोपासली.. १९३६ साली , सोल्वॅंगच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, डॅनिश डेज या त्यांच्या सणा दरम्यान भावी डॅनिश राजा-राणी भेट देऊन गेले.. पण त्याला खरे व्यावसायिक रूप आले जेव्हा Saturday Evening Postने त्याच्यावर एक पोस्ट लिहीले.. त्यानंतर प्रवासी आले, तो भाग अजुन जास्त डॅनिश बनवला गेला, इमारतींना डॅनिश मुलामा दिला.. डॅनिश व्यापारी येऊन आपले चीझ, वाईन्स, कॉफी विकू लागले.. अप्रतिम बेकर

Gone too soon..

Like a comet Blazing 'cross the evening sky Gone too soon Like a rainbow Fading in the twinkling of an eye Gone too soon Shiny and sparkly And splendidly bright Here one day Gone one night Like the loss of sunlight On a cloudy afternoon Gone too soon Like a castle Built upon a sandy beach Gone too soon Like a perfect flower That is just beyond your reach Gone too soon Born to amuse, to inspire, to delight Here one day Gone one night Like a sunset Dying with the rising of the moon Gone too soon Gone too soon -Michael Jackson

माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )

इमेज
’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. :) ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang - Danish word meaning ' sunny field' ) ठिकाण ठरलं.. भल्या पहाटे उठल्यामुळे दुपारचे १२च वाजले होते! आवरून, ब्रेकफास्ट(!) करून निघायला २ वाजलेच असते... पटकन खाणं आटोपले आणि आवरून २.१५ ला घराबाहेर पडलो.. तसा उशीरच म्हणायचा! पण उन्हाळ्याची हीच तर मजा ना? पण जसे वाटले तसे घडले तर ट्रीप कसली?? अंहं, काहीही अनुचित प्रकार नाही झाला! फक्त अस्मादिकांच्या अहोंनी सर्प्राईज द्यायचे ठरवले! गाडी सॅन्ता बार्बराच्या रस्त्याला, इथली लाईफलाईन असलेल्या १०१ फ्रीवेला लागल्यावर त्याने सांगितले की आपण आधी एका लेक - तळ्यापाशी जाणार आहोत ! मग काय,

सूर्य-ढगांची लपाछपी

इमेज
आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला! आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :( सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :) (हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( ) बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा! किती उच्च कॅमेर्‍याने फोटो काढले की तो

निरोप आणि रंगरंगिले छैलछबिले!! :)

इमेज
आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्‍या साईट्स बद्दल काही विशेष ममत्व वाटत नाही.. तेच इतरांना माझ्या ब्लॉगबद्दल नको वाटायला.. म्हणुन हा निरोप.. असो.. आजचे पोस्ट मी खरंतर केवळ निरोपसमारंभ नाही.. मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो.. तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची! पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही!