पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी. सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.  नंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.   स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. एखाद्या प्रचंड मोठ्या