पोस्ट्स

फेब्रुवारी, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डबा ऐसपैस !!

इमेज
आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. ! हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy .. म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :) चला बर्‍याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :) ( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))

माझेही दोन पैसे..

इमेज
मला खरंतर अजिबात हे पोस्ट लिहायचे नव्हते. सगळे हेच लिहीत आहेत! सारेगम लिट्ल चॅम्प्स.. रिझल्ट वगैरे. पण काही गोष्टी वाचल्या आणि डोकंच आऊट झालं! कार्तिकी जिंकली यात अपेक्षाभंगाचे दुःख्ख वाटणे मी समजू शकते. प्रथमेश, आर्या खूप डिझर्विंग होते वगैरे. पण म्हणून ते नाही जिंकले, तर किती गदारोळ!? आर्या/प्रथमेश इव्हन सुरात जरा कच्चा असणारा रोहीत जिंकला तर तो बरोबर रिझल्ट! आणि ताला सुराची उत्तम जाण असलेली, रोहीत इतकीच उत्कृष्ट परफॉर्मर असलेली कार्तिकी जिंकली , की ते राजकारण, चुकीचा निकाल, झी चे अंतर्गत राजकारण, कार्तिकीच्या पालकांनी पैसे चारले, आणि या सगळ्याच्या वरताण कडी म्हणजे, ’गायकवाड’ नाव ना तिचं!!! अरे काय चाल्लंय काय?? हा? आजच्या जमान्यात, हे असे विचार कोणी करू शकत असेल हा विचार मी या जन्मातच काय पुढच्या ७ जन्मात करू शकले नसते.. मटा मधेही यावर भरभरून लेख आले. अनेक फोरम्सवर वाद पेटले आहेत! काही लोकं तर सगळा राग त्या बिचार्‍या कार्तिकीवर काढत आहेत! तिला सगळी गाणी तरी येत होती का, कस्ला तो भसाडा आणि लाऊड आवाज, अन काय काय... अरे कमॉन, तिच्याकडे टॅलंट नसतं तर ती नक्कीच इथे नसती आली! तसं व्हायला