मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खादाडी... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Veggie Soup

लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: २ टोमॅटो २ गाजरं ५-७ पालकाची पानं ४-५ bok choy ची पानं ५-७ Romain व Iceberg Lettuce ची पानं २-३ Red Cabbage/ Chicory ची पानं अर्धी ढब्बू मिरची १ मध्यम कांदा ४ लसणाच्या पाकळ्या मीरपूड थोडी कोथिंबीर मीठ (असल्यास) गार्लिक बटर. [ हे न वापरल्यास ही रेस्पी व्हीगन होईल.]  क्रमवार पाककृती: छोट्या कुकरमध्ये वरील सर्व भाज्या/ग्रीन्स (कांदा वगळून) व मीठ घालून २ शिट्ट्या काढाव्यात. [ भाज्या फार गाळ करायच्या नाही आहेत. माझा कुकर छोटा आणि जरा बिघडलेला आहे, सारख्या शिट्ट्या करतो. मोठा कुकर वापरला तर कदाचित एकच शिट्टी व प्रेशर बास होईल.] तोवर कांदा जरा मोठा कापून घेणे. गॅसवर भांड्यात गार्लिक बटर घालून कांदा मोठ्या फ्लेमवर परतून घेणे व अर्धाकच्चा शिजवणे. त्यातच कोथिंबीर घालून परतणे. व कुकरमधील शिजवलेल्या भाज्या - त्यातल्या पाण्यासकट घालून गरम करणे.  व्हेजी सूप तयार!   वाढणी/प्रमाण: दोन जणांना दोन सर्वींग्ज माहितीचा स्रोत: मीच.

बटर चिकन

मागच्या आठवड्यात बटर चिकन केले होते. हल्ली महिन्यातून दोनदातरी होतेच ते. इथे Los Angeles, मध्ये आल्यापासून आम्हाला विविध रेस्टॉरंट्सच्या होम डिलिव्हरीची फार सवय लागली होती! पण एकंदरीत सर्व इंडीयन रेस्टॉरंट्सप्रमाणे कुठेही कन्सिस्टन्सी नाही हो! मागच्या वेळेस अमुक मधीन ढमुक चांगले होते म्हणावे तर पुढच्या वेळेस नक्की घोळ होणार! शेवटी स्वतः करून , एक फिक्स रेसिपी शोधणे आले. हल्ली तेच बरे वाटते. मनापासून खाल्लेही जाते!  :)  माझ्या ब्लॉगवर २००८ मध्ये मी ही पोस्ट लिहीली होती. खरं म्हणजे ती रेस्पी म्हणावी तर बटर चिकनची नाहीये! [पण आम्ही हीच रेसीपी वापरून केलेली तेव्हाची डिश मात्र बटर चिकनसारखीच लागत होती! :))] पण ते काही खरे नव्हे. चांगली ऑथेंटीक रेस्पी परत लिहीलीच पाहीजे मला.  ही घ्या ट्राईड & टेस्टेड बटर चिकनची पाककृती! :)  लागणारा वेळ:  ४० मिनिटे लागणारे जिन्नस:  ५०० ते ७०० ग्रॅम बोनलेस, स्किनलेस चिकन ब्रेस्ट मोठा चमचा दही अर्धा चमचा लिंबाचा रस हळद २ मोठे कांदे २ टोमॅटो ६-७ मोठ्या लसूण पाकळ्या बटर (भरपूर!) ८फ्लु औंझ हेवी व्हिप...

माझी खाद्ययात्रा..

अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्‍याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायची.. पण मला तेव्हढी आवडच नव्हती.. दादा भारतात असताना कसं नेहेमी साग्रसंगीत पंगत असायची.. फर्माईशींची रेलचेल.. पण नंतर बंदच पडले.. असं असताना, मी इतकी बदलावे म्हणजे फारच झालं.. इतकी म्हणजे इतकी की आता मला झोपेतही भूक लागते.. सारखे नवीन पदार्थ करायचा(निदान खाण्याचा तरी) उत्साह येतो.. नवरा स्वखुषीने करून देणार असेल तर लॉटरीच! पण एकंदरीत असं आहे.. पण .. इथेही गोची आहेच.. मला स्वयपाक करायला खूप काही आवडत नाही! :( म्हणजे आवडतो.. पण तेव्हढा पेशन्स नाही.. काहीतरी उरकायचे झाले.. नशिबाने पदार्थ चांगले (?) होतात म्हणुन बरंय.. माझं एक असं.. आणि नवर्‍याची कथा वेगळीच.. त्याला दर १५ (?) दिवसांनी तरी बाहेरचे जेवण आठवते.. कितीही घरात छान केले तरी बाहेर ज...

कंग पाओ टोफु..!

मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. :) तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप आवडली.. आणि तेव्हापासून मी ती नेहेमीच घ्यायला लागले.... दर वेळेला बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं, घरी ट्राय करावी.. तर सद्ध्या चालू श्रावण.. म्हणून चिकन च्या ऐवजी टोफु घालून करावी असा विचार केला.. आणि बराच सेम पदार्थ तयार झाला! (चिकनला तोड नाही पण) :) नंतर जालावर शोधताना कळलं, की ही बरीच कॉमन रेसीपी आहे.. :( तरी मी सद्ध्या तरी ती self invented recipe आहे असं समजून चालले आहे.. मी ही पाककृती खूपच अंदाजाने आणी आयत्या वेळेस केली असल्या मुळे , घरात बर्‍याच गोष्टी नव्हत्या.. रेड बेल पेप्पर ( सिमला मिरची), किंवा झुकीनी (काकडी सदृश प्रकार) इत्यादी जिन्नस नसल्या मुळे साधी लाल मिरची, आ...

बटर चिकन आणि व्हेज. बिर्याणी

ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं च होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत.. बटर चिकन ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!) असो.. मला जमेल तशी देतीय रेसीपी. अगदी अचूक प्रमाण नाही देता येणार कारण मी अंदाजेच घालते सगळे मसाले.. जिन्नस : १) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन. २) एक मोठा कांदा चिरून. ( अमेरीकेतला असेल तर अर्धाच. आमचा कॉस्कोचा होता. तो जरा अतीच जास्त आहे..) ३)एक टोमॅटो. ४) खोबरं ५) आलं, लसूण. ६) ३ मिरच्या ७) थोडी कोथिंबीर. ८)चिकन मसाला.. ९) थोडासा काळा मसाला.. १०) आवश्यक वाटला तर फूड कलर्.(अर्थात लाल.) ११) दही. १२) हळद्,तिखट,तेल वगैरे. कृती : १. प्रथम चिकन साफ करून त्याचे तुकडे करून ठेवणे. मग दही, हळद्,आणि थोडा चिकन मसाला घालून मॅरीनेट करावे. २. मग कुकर मधे शिजवून घ्यावे. ३. मसाल्यासाठी : चिरलेला कांदा बटर मधे किंचित परतून घ्यावा. खोबरं परतून घ्यावं(बटर शि...

माझी chef-गिरी...

सद्ध्या वाचन आणि स्वयपाक घरात खुडबुड करणे चालू आहे. आईनस्टाईनची बायोग्राफी हाताला लागली. ती वाचत आहे, आणि ती संपायला फारच वेळ आहे. त्यामूळे पुस्तकावर लिहीता नाही येणार.. मग विचार केला स्वयपाकातले (यशस्वी) मेनु टाकायला काही हरकत नाही.. स्पेशली मी जो आज टाकणार आहे तो तर माझ्या साठी अविस्मरणीय कॅटॅगरीतला आहे.. एकतर आम्हा दोघांचाही आवडता पदार्थ म्हणून करायला गेले, पण करताना त्याला जो काही वेळ आणि मेहनत लागलीय, ते पाहून मी कधी विसरीन असं वाटत नाही.. असो.. पण end result चांगला होता, त्यामुळे हे घ्या... व्हेज. मांचुरीयन, आणि शेजवान फ़्राईड राईस... !