अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी १

रविवार सकाळ, दिनांक ६ सप्टेंबर .. सकाळी तसे आरामातच उठलो. खरंतर आमचा सकाळी ८लाच निघायचा प्लॅन होता. पण आम्ही आपले उठून आरामात गप्पा, चहा, कॉफी, ब्रेड ऑम्लेटचा नाश्ता असे करत बसलो होतो. शेवटी निघू निघू म्हणत १०-१०.३० ला घराबाहेर पडलो. मामा आम्हाला मेट्रो स्टेशनवर सोडणार होता, आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो.
अमेरिकेत इतके वर्षं राहून मेट्रोचा प्रवास घडलाच नाही, कारण कायम हाताशी कार असतेच ना? त्यामुळे खूप उत्सुकता होती त्या प्रवासाची. नवखेपणा होताच, त्याचबरोबर नवलाई होती.. आजवर नुसतेच पाहीले किंवा ऐकले होते मेट्रोबद्दल.. ती आपोआप उघड-बंद होणारी दारं तर मी लहान मुलीच्या उत्साहाने पाहात होते.. ५-७ मिनिटातच आमची मेट्रो आली, आणि आम्ही धावतपळत एकदाचे जाऊन बसलो.. लोकांना विचारूनही घेतले.. हो, उगीच घोळ नको… हातात मेट्रोचा मॅप होता.. त्यात प्रत्येक स्टेशनचे नाव होते. अगदी पटापट येत होती ती सर्व स्टेशन्स.. खूप मजा आली! वॉशिंग्टनचे मेट्रोचे जाळे सुद्धा चांगले आहे. त्यामुळे कारची अजिबात आवश्यकता वाटली नाही!
२० मिनिटात वगैरे स्मिथ्सॉनियन स्टेशन आले. भुयारातून बाहेर आलो तर काय ? सगळ्या भल्या थोरल्या, रोमन कल्चरच्या दिसणार्‍या बिल्डींग्सची रांग लांबवर पसरलीय ! माझी नजर नुसती भिरभिरत होती.. मला बहुतेक फक्त कॅपिटॉल हिल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंटच ओळखू आले असेल.. असो.. तर मॅप सांभाळत आम्ही सज्ज होऊन निघालो .. हे असं ठिकाण होतं, जिथे (कितीही नकोसं वाटलं तरी सत्य तेच आहे.. ) संपूर्ण जगावर राज्य करणार्‍या राज्यकर्ते होते, त्यांची पांढरी घरं होती, फार जुन्या ऐतिहासिक इमारती होत्या, भरपूर म्हणजे खचाखच भरलेली म्युझिअम्स होती, असंख्य पुतळे होते, सर्व ठिकाणांच्या मधे मैलोनमैल पसरलेले रस्ते होते, वर तळपता सूर्य होता व आमच्याकडे होते प्रत्येकी दोन(च) पाय व ४जीबी(च) कार्ड असलेला कॅमेरा , हँडीकॅम.. सुरवातीला अडखळलोच आम्ही. कसे पाहायचे हे सर्व? तेही कमी वेळात ? कुठून सुरवात करावी ? ती सगळीकडे नेणारी टूर घ्यावी का ?? हजार प्रश्न! मग आम्ही घुसलो प्रथम स्मिथसॉनियन इन्फॉर्मेशन सेंटर मधे. मोठा कॅसल होता तो ! मला काय पाहू हेच कळत नव्हतं! नजर नुसती भिरभिरतीय. कुठल्यातरी इमारतीचा सुळका दिसायचा तर कुठे खांबावरचे नक्षीदार डिझाईन दिसायचे, तर कधी सुंदर पुतळा, कधी विटकरी रंगाच्या त्या दगडी तर कधी पांढर्‍याशुभ्र गुळगुळीत इमारती.. अगदी टिप्पिकल टुरिस्ट आहोत असे वाटण्याचे क्षण आमच्या ह्याच ट्रिपमधे आले. कारण हे सगळं परत पाहू की नाही याची गॅरंटी नाही. कोण इतक्या लांब येणार परत? भारतात जायचे निम्मे डिस्टंस कव्हर होते त्यात. त्यामुळे जे जे दिसेल, ते ते आम्ही ६ डोळ्यांनी टिपत होतो. २ माझे, २ निनादचे, आणि २ कॅमेर्‍यांचे ! स्मिथसॉनियन कॅसल मधे गेलो तर समोरच दिसला एक मोठठा ढीग! वर एक खूर्ची.. खाली काय वाट्टेल ते!
अरे हे ओळखीचे वाटतेय.. ह्म्म.. तो होता “नाईट ऍट द म्युझियम – बॅटल ऑफ स्मिथसॉनियन ” मधला ढिग. तो मुव्ही (दुसरा भाग) मला रटाळ वाटल्याने मी एकच फोटो काढला, माहीतीपत्रक घेतले आणि निघालो ! टोप्या, गॉगल्स, कॉटनचे कपडे कशानेही ते वरचे ऊन कमी वाटत नव्हते. भाजणारं ऊन म्हणजे काय ते इथे कळले. आत्ताच ही दशा तर पुढे कसं होईल ? अजुन ५-६ तास तरी इथेच आहोत आपण ! आता उजवीकडे एअर अँड स्पेस म्युझियम होते, तर डावीकडे म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी! एअर अँड स्पेस जास्त नावाजलेले आहे, परंतू आम्हाला विमानांपेक्षा इंटरेस्ट प्राणीमात्रात वाटल्याने आम्ही तिथे निघालो. त्या म्युझियमला परपेंडीक्युलर , दोन टोकाला होते, वॉशिंग्टन मॉन्युमेंट व कॅपिटॉल हिल. ते प्रचंड अंतर पाहून जीव दडपला. पण ते विचार बाजूला ठेऊन म्युझियम मधे गेलो. नाईट ऍट द म्युझियम पार्ट वन मधले प्राणी थे भेटायची शक्यता असल्याने फार खुष होतो! त्यातून कळले ही सर्व म्युझियम्स फुकटच असतात! तो आनंद जास्त अवर्णनिय होता!
आत शिरलो तर सर्व प्रकारचे प्राणी.. निर्जीव चतुष्पाद व सजीव .. दोन पायाचे प्राणी.. ( काय म्हणतात त्यांना ? द्वीपाद?? :O ) असो.. हाय फंडू शब्द वापरायला गेले की असं तोंडावर आपटतो आपण! आम्हाला सर्व प्राणी पाहण्यात इन्टरेस्टही नव्हता व वेळही ! त्यामुळे आम्ही सरळ आपले रेक्सी दिसतोय का पाहायला निघालो ! तो आणि डमडम आमचे एकदम आवडते कॅरॅक्टर्स! ( Ref : Night at the museum, again!) हा पाहा रेक्सी : क्युट आहे ना !!
जनरल फिरलो.. खूप प्राणी पाहीले. प्रत्येक खंडानुसार विभाग केले होते. त्यामुळे मला काहीएक लक्षात नाही आता.. पण मजा आली होती! नंतर भारतातून आलेला 45.52 कॅरटचा “होप डायमंड” बघितला..


ते झाल्यावर पटकन निघून एअर ऍंड पेस मध्ये गेलो..









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!