मुख्य सामग्रीवर वगळा

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्राण्याकडे पाहावं तसेच पाहतात.. नाही तसे मी बाकीचेही उद्द्योग करते, नोकरीचे अर्ज करते, थोडा जमला तर अभ्यास करते, अधुन-मधुन कुठल्यातरी कंपनीच्या परीक्षा देऊन येते, पण माझा बराचसा वेळ हा वाचनातच जातो. प्रत्यक्ष library मधून पुस्तके आणून वाचणे यात जी मजा आहे ती बाकी कशात नसली तरी, internet मुळे अनेक इतर गोष्टींकडे लक्ष गेले, जे मी कधी स्वतःहुन वाचले नसते. उदा. मायबोली, मनोगत सारख्या साईट्स.. ज्यांच्यामुळे मी मराठी कविता वाचायला लागले. (आणि त्या कळायलाही लागल्या.. :)) माझी आई जरी कविता करत असली तरी दुर्दैवानी (आणि तुमच्या सुदैवानी) ती देणगी माझ्याकडे नाही. त्यामुळे फक्त वाचनावरच आनंद मानायचा.. मायबोली मी मुख्यतः कथा-कविता-विनोद-विडंबन ई. साठी वाचते. फारच उत्कृष्ठ दर्जाचे साहीत्य आहे तिथे. अनेक दर्जेदार कवी, कवयित्री,photographer,चित्रकार आहेत तिथे! मायबोलीचा उपयोग मी कविता लिहीण्यात जरी केला नसला तरी मी चित्रे काढू लागले.. गझल कशाशी खातात ते मला कळू लागले.. (आणि आता तर गझलेची कार्यशाळा सुरू झाल्यापसून ते आपल्या बसची बात नाही हेही कळाले!) खरच मायबोली वर जाऊन आले की असे वाटते आपण किती दरिद्री आहोत! काही म्हणून प्रतिभा नाही... हा एक ब्लॉग काढुन महीना झाला तरी काय लिहावं कळत नव्हतं.. आणि या लोकांना इतक्या चांगल्या कल्पना सुचतात कशा, आणि ते त्यांना शब्दांत बांधतात कसे, हे माझ्यासाठी कोडंच आहे! पण ठीके.. आपल्याला निदान वाचता येते याचा आनंद होतो अशावेळी. मनोगत देखील अशीच एक साईट.. पण ती आता पूर्वीसारखी नाही राहीली.. सुदैवानी मायबोली अजूनही तशीच दर्जेदार आहे. (हे माझे मत.. अनेकांना मनोगत अधिक चांगली वाटू शकते.) मराठीब्लॉग्सनी तर खजिनाच उघडला माझ्यासाठी.. इऽऽतके (मराठी) ब्लॉग्स.. आणि काही काही लोकांचे ब्लॉग्स असेच सुंदर.. कुणाकुणाचे नाव घ्यायचे! पण तरीही.. ट्युलीप च्या ब्लॉगनी मलाही ब्लॉग सुरू करावा अशी ईच्छा झाली. इतके सहज आणि सोप्पे असतं होय ब्लॉगींग.. मग काय अवघड आहे! ( पण आता कळतय सहज आणि सोप्प लिहीणेच सगळ्यात अवघड आहे!) आपल्या आयुष्यातले काही प्रसंग इथे share करणे वाटत तितकं सोप्प नाहीय. पण लिहायची इच्छा निर्माण झाली हे मात्र खरं...
या बेकारीच्या दिवसांत(जे अजून चालूच आहेत!) अक्षरशः पुस्तकांचा फडशा पाडला.. (मी वाचलेली पुस्तके, आवडलेली पुस्तके वर नंतर कधी तरी लिहीन..)
दुसरी माझी activity म्हणजे गाणी ऐकणे.. इंजिनिअरींगच्या काळात खरे म्हणजे हे वेड लागले.. अनेक सुंदर जुनी-नवी हिंदी , इंग्लीश, मराठी गाणि ऐकली.. शास्त्रीय बैठकीची ही गाणी (कधीकधी) आवडू लागली.. (इथे पण, माझी आई उत्तम गाते.. पण माझ्याकडे तो गुण नाही.. आम्ही फक्त कानसेन.. ) इतकी गाण्याची आवड असूनसुद्धा मी कधी आयडिया सारेगमप चा एकही भाग पाहू नाही शकले... कारण तो t.v. वर लागतो! .. हो मी आख्ख्या २४ तासात २४ सेकंद सुद्धा t.v. पहात नाही. पाहीलाच तर discovery, natgeo, pogo!, cartoon network (:D) etc etc.. बाकी t.v. वर पाहण्यासारखे काहीही नसते असे माझे स्पष्ट मत आहे! (पुणेकर आहे मी.. इथे-तिथे मतं नोंदवलीच पाहीजेत!! )
भाषा शिकायची आवड खरं म्हणजे मला लहानपणापासून आहे. ८वी मधे जेव्हा संस्कृत शिकले, तेव्हापासूनच मी संस्कृतच्या प्रेमात पडले. ( याला बर्वेकाकूंचा क्लासही कारणीभूत आहे.. ) पण जसे ठरवले तसे मी काही संस्कृत शिकणे चालू ठेवले नाही.. आई आणि भाऊ शिकले असल्यामुळे असेल पण japanese बद्द्ल उत्सुकता वाटतीय.. थोडं-थोडं शिकतही आहे.. मानसीमुळे जर्मन बद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालय.. पण ती भाषा मला उगीचच (अस तीचे म्हणणे..) अवघड वाटते.. बाकी भाषांमधली spanish पण जरा शिकायला बरी वाटतीय.. बाकीच्या भाषा मला या जन्मात जमतील असॆ वाटत नाही!..
एकंदरीत माझे interests पाहता मी चुकून engg ला आले की काय असे वाटते. पण मला Computer बद्दल प्रचंड fascination आहे.. नविन टेक्नॊलॉजी,सॉफ्टवेअर्स शिकणे/शोधणे मला खूप आवडतात.. computer दुरुस्त करणे हेही मला खूप आवडते.. (ofcoz माझ्या भावाच्या-कपीलच्या मदतीने) आणि माझ्या comp. लाही माझी ही आवड कळल्यामुळे तो बर्‍याचदा बंद पडुन मला माझी आवड जोपासायला मदत करतो! .. :D
अर्थात जरी हे सगळे interests/hobbies असले तरी बेकार घरात बसणे अजिबात सुखावह कल्पना नाहीय.. इतके प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, ही फार छान भावना नाहीय़! आपलं काय चुकते म्हणून नोकरी मिळत नाही, आपण Loser आहोत या विचारानी frustration येतं.. आधीच फार friendly नसणारी मी या विचारांनी अजून एकटी राहायला लागते.. लोकांना face करावसं वाटत नाही.. आणि मी 'माणुसघाणी' म्हणून ओळखली जाते !.. :( पण हे तेवढ्यापुरतंच.. दुपारी मी अशी असीन तर संध्याकाळी मस्तपैकी रेडीओ मिर्ची ऐकत jogging करत असते.. afterall i knw am capricornian, and capricorn ppl hav to fight alot to achieve success! (कुणाला असा अनुभव मगरींनो ?? :D )
neways.... हे सगळं फारच 'मी-माझं-मला' झाले का?? पण शेवटी हा 'माझा' ब्लॉग असल्याने 'मी' 'माझ्याशिवाय' नाही तर अजून कुणाबद्दल लिहीणार?
पहीलंच पोस्ट असल्याने आणि काही विषय डोक्यात नसल्याने हे लिखाण बरेच random आणि abstract झाले असण्याची शक्यता आहे.. कुणी वाचलंच.. आणि त्यातून आवडलंच तर अवश्य कळवा! (म्हणजे मला पुढे लिहू की नको ते कळेल.. :) )
Signature2
३४ टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी.

सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.

 नंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.

स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला.

एखाद्या प्रचंड मोठ्या सॅम्पल साईझबद…

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा. माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस(  ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड!  मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). …

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!)
तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी!
बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात!
____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्यावर, स्ट…