लायब्ररी !!

फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम वर तर, काहीच वाचावसं सापडत नाही आजकाल! म्हणजे वाचणेबल असतं बरच काय काय.. पण बहुधा मला नेट वर वाचायचा कंटाळा आलाय.. शेवटी नवर्‍याला लायब्ररीमधे घेऊन जाण्याचा तगादा लावला.. ( काय ना.. ड्रायव्हींग येत नसेल तर अमेरीकेत अगदी भजं होऊन जातं तुमचं!! :( माझी स्कुटी पाहीजे होती इथे... :D)
एकदाचं लायब्ररी मधे आलो !! काय सुंदर आणि प्रचंड आहे इथली लायब्ररी.. ऐकुन होतेच पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं.. कार्ड घेण्यासाठी रांगेत उभी राहीले, तर १ मिनिटार सगळी प्रोसिजर खतम..! कार्ड हातात, आणि अन्लिमिटेड पुस्तकं , ३ आठवड्यांसाठी... wow !! घाईने पुस्तकांच्या सेक्शन मधे गेले, आणि लिटरली वेड लागलं.. आख्खा मजला भरून फक्त fiction.. त्याच्या वरच्या मजल्यावर non-fiction आणि reference books..अधे मधे बसायला टेबलं होतीच.. बाकी सगळ्या सुविधा होत्याच.. पण मला आवडलं ते पुस्तकांचे कलेक्शन आणि लायब्ररीचं इंटेरियर ! काय अफलातून होतं ते.. दिवसच्या दिवस तिथे बसून , कॉफी पीत पुस्तक वाचत बसावं...

अधाशासारखी पुस्तकं घ्यायला गेले.. पण असल्या अजस्त्र कलेक्शन मधून काय घ्याव न काय नको होत होतं.. पुस्तकांची लिस्ट असायला हवी होती बरोबर... त्यामुळे डॅन ब्राऊन चे angels and demons आणि Da vinci code ची special illustrated edition आणि अशीच आधीच वाचलेली अजून २-४ पुस्तकं घेऊन आले.. आता काही दिवस तरी वेळ कसा घालवावा हा प्रश्न नाही!! (नवर्‍याला तर हसूच येत होतं माझा उत्साह पाहून॥)

पण एक प्रश्न पडलाय.. चांगल्या पुस्तकांची यादी कुठे मिळेल मला? कोणी सजेस्ट करू शकाल का, कुठली पुस्तकं वाचू? इथे कमेंट्स मधे प्लिज तुमची आवडती पुस्तकं लिहा.. इंग्लिशच.. :( इथे मराठी नाही मिळत.. thanks in advance!
Signature2

टिप्पण्या

निनाद म्हणाले…
फक्त फिक्शनच वाचायचं आहे का?
की इतर चालेल?

मी मधे नाओमी चं 'नो लोगो' वाचलं अमेरिकन कॉर्पोरेटस् विषयी एक वेगळा विचार प्रवाह.
चांगलं आहे.
-निनाद
Unknown म्हणाले…
vegla pan chalel na.. thanks!
Raj म्हणाले…
भाग्यश्री, तुम्हाला नक्की कुठल्या प्रकारची पुस्तके आवडतात हे ठाउक नाही. म्हणून यावर सोपा उपाय. ही मला आवडलेल्या पुस्तकांची यादी. यातली कुठली आवडतात ते बघा. Happy reading :-)

http://www.librarything.com/catalog/rajkashana
Dk म्हणाले…
Hi Bhagyashri,
3 good books 4U...
POWERSHIFT
THIRDWAVE
FUTURESHOCK

all by Alvin Toffler.
Unsui म्हणाले…
Use www.amazon.com and www.shelfari.com for reading book reviews , and then get those books from library.
My all time favorites
Fiction - Illusions - Richard Bach, Old Man and the Sea - Ernest Hemingway. Bird and Other Short Stories - Daphne Du Maurier.
Non Fiction(Memoirs)- Wild Grass: Three Portraits of Change in Modern China- Ian Johnson, Oracle Bones - Peter Hessler, River Town: Two Years on the Yangtze - Peter Hessler, Mr. China - Tim Clissold, Riding the Iron Rooster - Paul Theroux.

Happy Reading
Anand Sarolkar म्हणाले…
1. The Kite Runner
2. Shantaram
3. The reluctant Funadamentalist
4. Catcher in the Rye
5. Old man and the Sea
6. The Alchemist

Hee ankhi kahi "Must reads" :)
Unknown म्हणाले…
thanks saglyana.. mi list var takte mazya.. raj, mala librarything mahit navte.. jabri ahe tumchi list!
Nandan म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले…
thanks nandan..pan duva mazyach blog cha dilat ki tumhi.. :)
Nandan म्हणाले…
Hi Bhagyashri, mee kahi varshanpoorvi english pustaka vachayala suruvat keli tevha mala hi hach prashn padla hota. Shevati mag, pu la nchya lekhanat Wodehouse aani Hemingway chya pustakancha ullekh aalela aaThavat asalyane tyanchi pustaka pratham vachoon kadhali. Mag mitranni suchavalyavar Somerset Maugham pasoon Fredrick Forsyth paryant naveen lekhak samajale.

Agadi utkrushta pustaka vachayachi asateel tar Modern Library ne 20vya shatakateel sarvotkrushta 100 pustakanchi yadi tayar keli aahe. Tee ya duvyavar pahta yeil -
http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnovels.html

Shivay rajendra ne suchavalelya Librarything.com sarakhech Shelfari.com hehi ek uttam sanketsthal aahe. Tikade hi baryach changalya pustakanchi yadi miLu shakel.

Tumachya vaachanat ekhade changale pustak aale, tar blog var tyabaddal nakki liha. Vachayala aavadel.
Nandan म्हणाले…
ho, chukun blog chich link copy zali. Naveen pratisadat sudharana keli aahe :)
Unknown म्हणाले…
:) thanks alot! check karte link.. ani nakki lihin avdlelya pustakavar..
HAREKRISHNAJI म्हणाले…
नविन काही पेन-स्केच-शेडींग ?
HAREKRISHNAJI म्हणाले…
नविन काही पेन-स्केच-शेडींग ?
Unknown म्हणाले…
navin farsa nahi ho.. prayatn bara jamla ki takat jain na.. :)
बहिर्जी नाईक म्हणाले…
please read 'Chronicle of a death foretold' it is a gripping story written by a nobel laurette. i have read marathi translation long time back but can not forget the theme even today.
अनामित म्हणाले…
Few books worth reading as follows

Books by Ayn Rand :
The fountainHead
Atlas Shrugged

Books by Richard Bach :
Illusions
Jonathan Livingsten Seagull

Book by Robert M Pirsig :
Zen & the art of motorcycle Maintenance



Sanjeev
अनामित म्हणाले…
Amazon has a set of about 1000 books by Penguin, If you search by Penguin classics you should find it. Most of those books should be available in your local library. Each and every one of them is worth the time! Enjoy!
अनामित म्हणाले…
Let me suggest u some,
To Kill a Mockingbird
The Alchemist
Papillon by Henri Charrière
Not without my daughter
etc...
athavalyanantar anakhi suchavil, nakki!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!