थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Thai Veggie Stir Fry & Chicken Linguine Noodles]


लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भाज्या :
गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित )
थोडेसे भाजलेले दाणे (नवर्‍याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते)
५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून
वाळलेली लाल मिरची कुटून
कुकींग वाईन (असल्यास.) (माझ्याकडे नव्हती. मी थोडे व्हिनेगर+लिंबूरस घातले)
सॉस :
(तिखट) चिली सॉस,
सोया सॉस ( मी कमी सॉल्ट असलेला आणि अगदी थोडाच वापरला)
थाई स्वीट चिली सॉस
१/३ कप व्हेजिटेबल अथवा चिकन स्टॉक.
अर्ध्या लिंबाचा रस
चमचाभर मध ( गोड हवं असल्यास अजुन जास्त घेता येईल)
२ टीस्पून कॉर्न स्टार्च ४ टेबलस्पून पाण्यात मिसळून. (कॉर्न स्टार्च नसल्यास ४ टीस्पून मैदा घ्यावा)
क्रमवार पाककृती:
स्टर फ्राय सॉसः
सर्वप्रथम कढईमध्ये व्हेज /चिकन स्टॉक , चिली सॉस, सॉय सॉस, थाई चिली सॉस, लिंबाचा रस घालून गरम करत ठेवणे. रेसीपीमध्ये मधही यातच घेण्यास सांगितला होता. परंतू तो गरम करू नये असे वाचले असल्याने मी तो शेवटीच मिक्स केला.
या वरील मिश्रणाला थोडी उकळी आली की ठेचलेला लसूण व पाण्यात मिक्स केलेले कॉर्न स्टार्च घालणे.
कॉर्न स्टार्चमुळे सॉस थोडा घट्ट झाला की हे मिश्रण बाजूला ठेवून देणे.
स्टर फ्राय भाज्या :
थोडेसेच तेल घेऊन त्यावर सिमला मिरची, दाणे घालणे. दाणे थोडे परतले गेले की बाकी सर्व भाज्या अ‍ॅड करणे.
थोडासा चिली सॉस, सॉय सॉस, कुकींग वाईन / व्हिनेगर + लिंबूरस घालणे.
तसेच थोडी वाळलेल्या मिरचीची पूड घालून झाकण ठेवून शिजवणे.
हे झाल्यावर वर तयार केलेला स्टर फ्राय सॉस या भाज्यांमध्ये मिसळून एकजीव करून त्याची वाफ काढणे.
झाले तयार थाई व्हेजी स्टर फ्राय ! स्मित
चव : लिंबामुळे आंबट, सॉय सॉस मुळे खारट, चिली सॉस व स्वीट चिली सॉस मुळे गोड-तिखट व मधामुळे गोड अशी एकत्र अफलातून लागते! स्मित
या बरोबर मी चिकन लिंग्विनी पास्ता/नुडल्स केला होता. त्याची रेसीपी छोटीच असल्याने इथेच देते.
गव्हाचे लिंग्वीनी नुडल्स मीठ असलेल्या पाण्यात शिजवून घेतले.
नुडल्स साठी रोस्टेड चिकनचे पीसेस(फ्रोझन आणले) कॉर्न स्टार्च व सॉय सॉसच्या मिश्रणात मॅरिनेट केले.
व्हेज हवे असणार्‍यांनी ही स्टेप गाळली तरी चालेल.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करून सिमला मिरची, पातीचा कांदा, थोडा साधा कांदा परतून घ्यावा.
मॅरिनेट केलेले चिकन (स्टार्चसकट टाकले तरी चालेल) व थोडास्सा चिली सॉस घालून एक वाफ काढावी.
व शिजवलेले लिंग्विनी नुडल्स मिसळून एक वाफ काढली. (सॉय सॉस असल्याने मीठ टाकायची गरज पडत नाही)
वाढणी/प्रमाण:
२ जणांनी भरपेट एव्हढेच खाल्ले तर एकावेळेस पुरेल. :)
अधिक टिपा:
पटकन करा व मटकवा ! स्मित
माहितीचा स्रोत:
स्टर फ्राय अबाऊट.कॉमवरून व लिंग्विनी स्वप्रयोग.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives