पोस्ट्स

2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"स्वच्छतेच्या बैलाला.. " च्या निमित्ताने...

इमेज
तसा हा प्रचंड दुर्लक्षित विषय.. स्वच्छता, आरोग्य याच्याशी निगडीत असल्याने खरंतर भरपूर लक्ष घातलं पाहीजे.. आपल्या भारतात नसलेल्या (किंवा अती अस्वच्छ असलेल्या) स्त्रियांच्या स्वच्छतागृहांचा हा प्रश्न.. मायबोलीच्या दिवाळी अंकात अज्जुकाचा "स्वच्छतेच्या बैलाला...." हा लेख वाचला, आणि सगळं पटत गेलं.. कधी ना कधी , कुठे ना कुठे हा प्रश्न भेडसावतच असतो.. रादर, भारतात कुठेही जाताना हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.. बाहेर पड्ल्यावर कुठे टॉयलेटला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पिणं हा सगळ्यात सोप्पा आणि तेव्हढाच चुकीचा उपाय.. पण जवळ्पास सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी हाच उपाय अवलांबला असेल.. सरकार किंवा ज्यांच्या अधिकारात येतात या गोष्टी ते काही करत नाहीत.. हे तर झालंच.. पण आपण काहीतरी करू शकतो ना??? आपल्या परीने प्रयत्न.. स्वच्छतेच्या बैलाला वाचून अनेक लोकांना ते पट्लं.. आणि आता ती सर्व लोकं एकत्र येऊन या अडचणीवर काहीतरी उपाय शोधत आहेत.. उदा: एखादी शॉर्ट फिल्म तयार करून ती सगळीकडे वितरीत करणे.. लोकांच्या मनावर हॅमर करणे.. संबंधित लोकांपर्यंत हे पोचवणे, लोकल वृत्तपत्रांमधून छापणे, शाळांमधून ...

आली दिवाळी!!!

इमेज
आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे.. :) तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा.. दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे.. आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे फोन.. मित्रमैत्रिणी.. दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की मी,स्नेहल,आदित्य,गजु-चिंटू असं आम्हा ५ जणांची तपासणी सूरू व्हायची.. कुठे चांगली माती आहे?? बांधकाम चालू आहे त्या बिल्डींगचे.. तिथे वीटा चांगल्या दिसतायत का कुठे? मी सगळ्यात लहान.. त्यामुळे आमचं काम लिंबू टिंबू.. उगीच आपलं मागे मागे फिरायचे.. :)) मेन काम हीच लोकं करणार.. मग माती मिळाली मनासारखी की माझं काम सुरू.. चाळणी पैदा करायची घरातून , आणि चाळत बसायचं! काय छान मातीत लोळायला मिळायचं! :P मग इकडे आमचे आर्किटेक्ट लोकं किल्ल्यांची रूपरेषा ठरवायचे.. मग हळु हळू २-३ दिवसात किल्ला साकारला जायचा.. कुणी डॉक्टर असेल तर त्यांच्या कडून इंजेक्शनची सिरींज मिळवून त्याचं कारंजं करायचे.. मावळे सा...

इडियॉक्रसी..!

इमेज
असं म्हणतात माकडापासून आत्ताचा मानव विकसित झाला.. ४ पायांवरून २ पायांवर आला.. या इव्हॉल्युशन मधे शेपटीसारखे न लागणारे अवयव नष्ट झाले.. पण उद्या जर अशी वेळ आली की, मानवाने मेंदूचा, बुद्धीचा वापर करणं सोडून दिलं.. तर काय वेळ येईल?? इडियॉक्रसी बघितल्यावर समजतं काय होईल...! Joe या अत्यंत ऍव्हरेज अशा यु.एस आर्मी लायब्ररीयनला आणि Rita या प्रॉस्टीट्युटला मिलिट्रीच्या human hibernation project मधे सामिल करून घेतात.. प्रयोग असा की १वर्ष त्या दोघांना फ्रीझ करून ठेवायचं.. थोडक्यात रिसोर्सेस जपून ठेवण्याच्या दृष्टीने चाललेला हा प्रयोग..! पण होतं भलतंच.. २००५ साली फ्रीझ करून ठेवलेले ते दोघं जागे होतात २५०५ साली! ते सुद्धा ’Great Garbage Avalanche of 2505' वर..! सुमारे ५०० वर्षांत मानवामधे इतका फरक पडलेला असतो, की त्याला साध्या बेसिक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. सगळ्या समाजाचा आय.क्यु. जवळजवळ ० ला जाऊन पोचलेला असतो!! सगळीकडे स्टुपिड आणि इडियट्सचा भरणा झालेला असतो.. Joe उठतो तोच मुळी कचर्‍याच्या ढीगार्‍यावरून.. पूर्णपणे डिसओरिएंटेड असल्यामुळे काय चाललंय काही कळत नाही.. कोणाशी बोलायला जावं तर सगळ...

आवडलेले काही - कवितांचा खोखो..

खूप गडबडीत असल्याने खो ला उत्तर द्यायला उशीरच झाला खरा.. संवेदने खो चालू केल्याबद्द्ल आणि राजने मला खो दिल्याबद्द्ल धन्यवाद! सगळ्यांनीच उत्तमोत्तम कवीता लिहील्या आहेत. त्यामुळे काय लिहावं हा प्रश्नच होता.. कारण मी कवीतांमधे खूप रमणारी मुलगी नाहीए. आवडत नाहीत असं नाही, परंतू कवीता समजून घेऊन वाचण्याचा पेशन्स नाहीए माझ्यात.. त्यामुळे फार कविता वाचल्याही नाहीत,ज्या वाचल्या त्या सगळ्याच लक्षात नाहीत आता... असो.. तर मी इथे १ कवीता देणार आहे माझ्या आईची.. माझी आई उत्तम कविता करते,वेळ-प्रसंगानुसार, समयोचित कवीता करणं हा आईचा हातखंडा प्रकार आहे.. या कविता जगाच्या दृष्टीने साध्याच असतील, वृत्तं,यमक,आणि अजुन काय काय सांभाळलं गेलं असेलच असं नाही. परंतू माझ्या दृष्टीने या कवीता फार मोलाच्या आहेत.. १) "सामना" ( ही कवीता, आईने ,तिचे वडील हॉस्पिटलमधे मृत्युशी झुंझत असताना लिहीली आहे.. माझे आजोबा, एक उत्तम शिक्षक होते, क्रिकेटचे प्रचंड वेड.. रणजी सामन्यांमधे आजोबांनी अंपायरींग देखील केले होते.. म्हणून ही कवीता "सामना"! इतकी आतून आली आहे ती, की ही कविता वाचताना मला हमखास माझे आजोब...

Feels Like Heaven ... !

इमेज
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्यालाच जमेल.. आपण फक्त तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा.. दुसरं काय करू शकतो नाहीतरी आपण? या टेंप्लेटमधे फोटोज दिसायला अडचण येतेय.. :( किती त्रास! तोवर ही लिंक घ्या.. माझे फ्लीकर अकाउंट..

कंग पाओ टोफु..!

इमेज
मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. :) तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप आवडली.. आणि तेव्हापासून मी ती नेहेमीच घ्यायला लागले.... दर वेळेला बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं, घरी ट्राय करावी.. तर सद्ध्या चालू श्रावण.. म्हणून चिकन च्या ऐवजी टोफु घालून करावी असा विचार केला.. आणि बराच सेम पदार्थ तयार झाला! (चिकनला तोड नाही पण) :) नंतर जालावर शोधताना कळलं, की ही बरीच कॉमन रेसीपी आहे.. :( तरी मी सद्ध्या तरी ती self invented recipe आहे असं समजून चालले आहे.. मी ही पाककृती खूपच अंदाजाने आणी आयत्या वेळेस केली असल्या मुळे , घरात बर्‍याच गोष्टी नव्हत्या.. रेड बेल पेप्पर ( सिमला मिरची), किंवा झुकीनी (काकडी सदृश प्रकार) इत्यादी जिन्नस नसल्या मुळे साधी लाल मिरची, आ...

भुकंप .. !

इमेज
लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!) जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते.. मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच मी ही इथे माझ्या शब्दात तो अनुभव मांडते.. माझा इथलाच काय आयुष्यातला पहीला धरणीकंप.. :) भारतात व्हायचे तेव्हा अस्मादीक झोपलेले असल्यामुळे कधिही कळला नाही.. इथे आज, सकाळी मस्त उशीरा उठून मिपावर टीपी करत बसले होते तर तासाभरात धबधब्धब आवाज्,सोफा,खिडक्या,दारं,झुंबरं, दिवे सगळं काही हलतंय , उठून उभी राहीले तर माझ्यासकट खालची जमीन, आख्खं घर हलतयं हा अनुभव अतिशय स्केरी होता!! असा भुकंप मी भारतात नाही अनुभवला.. कदाचित लाकडाची घरं असल्यामुळे असेल, पण सगळं घर लोकल मधे ठेवल्यासारखं हलत होते.. मी थरथर कापत होते लिटरली..प्रचंड सैरभैर झाले.. त्यातुन वरून्,शेजारून लोकं बाहेर येण्यासाठी पळत सुटली होती, त्याचाही आवाज होत होता.. कशी बशी दारा पर्यंत आ...

The Goal !

इमेज
सद्ध्या पुस्तक वाचनामध्ये ’ द गोल ’ चालू आहे.. अमेझिंग पुस्तक! प्रत्येकाने वाचावे असं.. थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते ...

Women of Tilonia...

इमेज
हे असं भारतात आणि तेही राजस्थानातल्या एका खेड्यात होऊ शकतं हे मला खरंच वाटत नाहीये! बेअरफुट सोल्जर्स ऑफ तिलोनिया हा लेख वाचून कोणालाही असेच वाटेल.. ज्या गावात बसदेखील येत नाही, अशा शहरीकरणाचा अजिबातच संबंध नसलेल्या अजमेर जिल्ह्यातील ’ तिलोनीया ’ या गावातील अर्ध-शिक्षित अथवा अशिक्षित महीलांना बरोबर घेऊन काढलेलं हे कॉलेज, बेअरफुट कॉलेज! येथील बायकांना काय काय येत असावं? पूर्वी घुंघट घेऊन बसायच्या त्या या बायका आता, सोलर एनर्जीवर, कुकर,कंप्युटर, ई गोष्टी स्वतः बनवतात!! या बायकांच काम काय विचारले तर इलेक्ट्रॉनि्क सर्कीट्स, सोलर चार्जर बनवणं हे कॉमन उत्तर असेल.. इतकंच नव्हे तर या कॉलेजच्या इमारती देखील याच बायकांनी बांधल्या आहेत! या अशिक्षित महीलांना असं संपूर्णपणे स्वयंसिद्ध बनवलंय,यावर्षीचा 'Ashden award for sustainable energy’ हा पुरस्कार मिळालेले डॉ. बंकर रॉय यांनी सुरू केलेल्या बेअरफुट कॉलेजनी..!! संपूर्ण माहीती वर दिलेल्या लिंक मधे मिळेलच.. पण इथे या अविश्वसनीय प्रकाराबद्द्ल माहीती दिल्याशिवाय राहवले नाही! ह्म्म.. स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष उलटून गेल्यावर खरंतर अशा बातम्या अविश्व...

आठवणी ... !!

इमेज
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!! सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते.. वास म्हटलं की मला आठवते ते माझं पर्फ्युम्सचं कलेक्शन.. सगळ्यात पहील्यांदा माझं असं पर्फ्युम मला मिळालं १०वी च्या रिझल्ट नंतर.. आत्याने अमेरीकेमधून आणलेलं.. ते मी ११-१२वी मधे वापरलं.. आणि जेव्हा संपत आलं तेव्हा ती बाटली बाजूला ठेऊन दिली.. तेव्हापासून मला हा छंद लागला.. आवडतं सेंट पूर्ण संपवायचे नाही.. अजुनही ती बाटली उघडली की माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ समोर येऊन ठाकतो! ११-१२वी ! शाळा संपवून नुकतीच कॉलेज नावाच्या विश्वात पाऊल टाकलेलं.. फारसा अभ्यास करायची पद्धतच नाही.. त्यामुळे बारावीला देखील डोक्याला चिंता नव्हत्या! इझिली , लकीली मार्क्स पडत होते.. खूप नाही, पण वाईटही नाहीत.. त्यामुळे मी ते दिवस सगळ्यात एन्जॉय केले.. तिथेच मला माझे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी भेटले.. २-२ वे...

अविस्मरणीय !

इमेज
पुण्यात वळीवाचा आणि आता मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यापासून माझी इथे चलबिचल होत होती... पाऊस अत्यंत प्रिय.. आणि त्यातून पुण्याचा ! आणि मी पुण्यात नाही, असे पहील्यांदाच घडले.. ( खड्डे-बिड्डे नाही येत हो डोक्यात अशा वेळी!) इथेही वेळीअवेळी पाऊस पडत असतो.. पण रिमझिम.. एकदाच मुसळधार पाऊस झाला होता, माझा वाढदिवस होता तेव्हा.. काय आनंद झाला होता मला! पाऊस आलाय आणि मी उगीचच खुष झाले नाहीय, असे एकदाही होत नाही.. असो..तर इथला पाऊस वेगळा.. पुण्याचा वेगळा.. आणि पुण्याचा पाऊस मी मेज्ज्ज्जर मिस करत होते.... परवा असच फिरायला बाहेर पडलो.. आणि एका घाट-सदृश रस्त्यावरून जाताना अचानक आम्हाला ओल्या मातीचा वास आला!! हो अगदी आपल्या भारतातल्या सारखा!! खरं तर तिथे अजिबात पाऊस पडत नव्हता, पण तरीही तो वास आला.. फक्त मलाच नव्हे,तर नवर्‍यालादेखील.. दोघंही वेडावून गेलो.. भारतात असतानाही वेड लावतोच तो वास.. पण इथे?? कसलं भारी वाटलं तो वास आल्याने मी सांगूच शकत नाही!! तिथून परत येताना आम्ही सगळ्या खिड्क्या उघड्या ठेऊन, अगदी छातीभरभरून वास घेतला.. श्वास अडकायची वेळ आली... पण अतिशय खुष होऊन परत आलो.. पुण्याचा पाऊस नाही निद...

काही फोटोज... !

इमेज
click on the image to view enlarged version.. घराजवळचा समुद्र .. व त्याची काही रूपे !! सॅंटा बार्बराला जाताना लागणारी झाडांची रांग! हे सर्व चालत्या/धावत्या गाडीतून काढलेत हं फोटोज! सॅंटा बार्बरा पिएर.. बीच वर एक लग्न लागत होतं.. त्या नवजोडप्यासाठीची ही बग्गी!! ओहाय (ojai ) चे सुंदर जंगल अन नागमोडी वाट! लेक कॅसितास.. ये हसीन वादीया....! घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं! सनसेट आणि विमान !! अजुन एक सनसेट!

अपेक्षाभंग!!! ... :|

इमेज
huh, पाहीला एकदाचा वळू ! इतकी हैराण झाले होते मी ऑनलाईन मिळत नाही म्हणून.. पण मिळाला, आणि अगदी उत्साहाने बसले पाहायला.. नाही आवडला मला.. :( कदाचित खूपच अपेक्षा वाढल्या होत्या त्या पिक्चरच्या चर्चेने.. म्हणून असेल.. पण तितका नाहीच आवडला.. ह्म्म आता तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.. पिक्चर ’बघायला’ मस्त वाटतो.. गावतलं वातावरण,ते राजकारण मस्त घेतलंय.. पण ज्या बद्दल आहे पिक्चर तो वळू, म्हणजे देवाला वाहीलेला, माजलेला बैल.. तो किती शांत दाखवावा? नुस्ता आपला इकडुन तिकडे फिरतोय.. आणि म्हणे डुरक्याचा लई त्रास.. तितका त्रासदायक नाहीच वाटला तो.. [ गोड आहे उलट! :))) ] आणि त्याचा सस्पेन्स तो किती! मला वाटलं चांगला मोट्ठा असणार, त्याला पकडणं खूप अवघड जाणार .. कसलं काय.. १०-५ पावलांवरून ते इंजेक्शन मारतात.. इतकी लोकं पळत , दंगा करत येतात, त्या आवाजाने बैल ढिम्म हलत नाही! ही लोकं इंजेक्शन कधी मारतायत अशी वाट पाहात उभा राहीलेला वाटतो.. असो.. ते डॉक्युमेट्री घेणं वगैरे मला विनोदी वाटलं.. आणि दिलीप प्रभावळ्कर अजिबात विनोदी नाही वाटला.. काहीच्या काही घुसडलीयेत काही काही लोकं! दिलिप प्रभावळकर, अमृता सुभाष आण...

मोर !

इमेज
मागच्या वर्षी केलेले वारली चित्र.. कापडावर अक्रेलिक पेन्ट वापरून काढले आहे .. चित्र सम्पूर्ण बसत नाही, त्यावर क्लिक केले तर दिसेल ..

चिल्ड्रेन ऑफ हेवन...!

इमेज
काल चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला.. खूप ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून पाहायचा होता.. फार आवडला मुव्ही.. स्टोरी काय माहीतीच असेल सगळ्यांना, आणि मला परीक्षणं लिहीता येत नाहीत.. म्हणून फार नाही लिहीत.. पण मनात आलं ते उतरवतीय.. सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची इतकी सवय झाली होती, की हा पिक्चर पाहताना इतकं शांत आणि वेगळं वाटलं.. साधी पण सुंदर कथा.. साधं चित्रीकरण, साध्या लोकेशन्स..फार बरं वाटलं असं पाहून.. (सुरवातीला ते मीठ विकणार्या माणसाचं ओरडणं ऐकून तर भारतात पोचले मी!) .. इराण मधलं वातावरण, तिथले लोकांचे दारीद्र्य, झारा आणि अली इतके लहान असून त्यांचे घरकामात आई बाबांना मदत करणं.. झारा तर केव्हढीश्शी आहे! पण एक शाळा झाली की कुठे भांडी घास, नाहीतर लहान भावाला(बहीणीला) सांभाळ अशी कामं करत राहते..(झाराच्या डोक्यावर हिजाब पाहून तर कसंतरीच वाटलं.. कसं आयुष्य असेल ना तिथे मुलींचं??) ते बुट हरवणं,दोघांनी मग अलीचे बुट शेअर करणं,ती पळापळ, पैसे नसल्यामुळे बाबांना कळू नये म्हणूनची धडपड..तो समजुतदार...