Women of Tilonia...
हे असं भारतात आणि तेही राजस्थानातल्या एका खेड्यात होऊ शकतं हे मला खरंच वाटत नाहीये! बेअरफुट सोल्जर्स ऑफ तिलोनिया हा लेख वाचून कोणालाही असेच वाटेल..
ज्या गावात बसदेखील येत नाही, अशा शहरीकरणाचा अजिबातच संबंध नसलेल्या अजमेर जिल्ह्यातील ’तिलोनीया’ या गावातील अर्ध-शिक्षित अथवा अशिक्षित महीलांना बरोबर घेऊन काढलेलं हे कॉलेज, बेअरफुट कॉलेज!
येथील बायकांना काय काय येत असावं? पूर्वी घुंघट घेऊन बसायच्या त्या या बायका आता, सोलर एनर्जीवर, कुकर,कंप्युटर, ई गोष्टी स्वतः बनवतात!! या बायकांच काम काय विचारले तर इलेक्ट्रॉनि्क सर्कीट्स, सोलर चार्जर बनवणं हे कॉमन उत्तर असेल.. इतकंच नव्हे तर या कॉलेजच्या इमारती देखील याच बायकांनी बांधल्या आहेत! या अशिक्षित महीलांना असं संपूर्णपणे स्वयंसिद्ध बनवलंय,यावर्षीचा 'Ashden award for sustainable energy’ हा पुरस्कार मिळालेले डॉ. बंकर रॉय यांनी सुरू केलेल्या बेअरफुट कॉलेजनी..!!
संपूर्ण माहीती वर दिलेल्या लिंक मधे मिळेलच.. पण इथे या अविश्वसनीय प्रकाराबद्द्ल माहीती दिल्याशिवाय राहवले नाही!
ह्म्म.. स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष उलटून गेल्यावर खरंतर अशा बातम्या अविश्वसनिय वाटू नयेत.. पण वाटतात.. आपल्या भारतात चांगलं काही होत असेल असं कधी कधी वाटतंच नाही.. आसपासचा गोंधळ,करप्शन, गलिच्छ राजकारणं, वाढती लोकसंख्या,त्यामुळे असलेली अस्वच्छता या आणि असल्याच गोष्टी नजरेत भरतात.. परंतू ही बातमी वाचून बोलती बंद झाली.. रादर मला माझीच लाज वाटली.. या अर्धशिक्षित बायका काय काय करत आहेत.. स्वतः तर स्वयंपूर्ण झाल्याच, पण गावाला देखील वीज, आणि सोलर कुकर बनवून वगैरे देतात.. आणि आपण किती छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसतो, किंवा छोट्या-छोट्या गोष्टींनी नाउमेद होतो.. त्या बायकांना किती त्रास सहन करावा लागला असेल? गावातून किती विरोध झाला असेल.. ! पण तरी त्या पुढे जात आहेत.. स्वतः काहीतरी बनत आहेत.. खूप इन्पायरींग वाटलं हे वाचून..सगळ्यांनी वाचावं असा लेख आहे, आणि ती गोष्ट आहे! पण आपली प्रसार-माध्यमं याची दखल घेतील तर लोकांना हे कळेल.. या लेखातले हे वाक्य वाचून फार वाईट वाटले.. "वर्षातून दोनदा या संसदेचं तिलोनियाला अधिवेशन असतं. हे अधिवेशन बघायला सगळ्या रात्रशाळांतील विद्यार्थी तर असतातच, पण जगभरातून पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी येतात. गेल्या वर्षी या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण इंग्लंड, फ्रांस व इटलीमध्ये केलं गेलं. आपल्याकडे त्यावेळी ऐश्वर्या रायचं कुठल्या वडा-पिंपळाशी लागलेलं लग्न गाजत होतं."
असो.. ब्लॉगविश्वाने हे वाचावं म्हणून आवर्जून या लेखाचा इथे मी उल्लेख करत आहे.. आपल्या परीने असं काही करता आलं तर अजुनंच बरं!!
जाताजाता, खालील व्हीडीओ पाहा.. तिथेच काम करणार्या एका बाईबद्द्ल आहे.. युट्युब वर Women of tilonia नावाने सर्च मारला तरी बरेच व्हीडीओ दिसतात..

टिप्पण्या
keep it up.
yeh well said!If we can do atleast something like this then it might help the cause!
oh.. have added 2nd part of mi. maa. maa. mee 2! Do visit & comment whether it is... well jaane do!
keep writing! :)
“A celebrity is a person who works hard all his life to become known, then wears dark glasses to avoid being recognized.”