मुख्य सामग्रीवर वगळा

इडियॉक्रसी..!

असं म्हणतात माकडापासून आत्ताचा मानव विकसित झाला.. ४ पायांवरून २ पायांवर आला.. या इव्हॉल्युशन मधे शेपटीसारखे न लागणारे अवयव नष्ट झाले..

पण उद्या जर अशी वेळ आली की, मानवाने मेंदूचा, बुद्धीचा वापर करणं सोडून दिलं.. तर काय वेळ येईल?? इडियॉक्रसी बघितल्यावर समजतं काय होईल...!

Joe या अत्यंत ऍव्हरेज अशा यु.एस आर्मी लायब्ररीयनला आणि Rita या प्रॉस्टीट्युटला मिलिट्रीच्या human hibernation project मधे सामिल करून घेतात.. प्रयोग असा की १वर्ष त्या दोघांना फ्रीझ करून ठेवायचं.. थोडक्यात रिसोर्सेस जपून ठेवण्याच्या दृष्टीने चाललेला हा प्रयोग..!

पण होतं भलतंच.. २००५ साली फ्रीझ करून ठेवलेले ते दोघं जागे होतात २५०५ साली! ते सुद्धा ’Great Garbage Avalanche of 2505' वर..! सुमारे ५०० वर्षांत मानवामधे इतका फरक पडलेला असतो, की त्याला साध्या बेसिक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. सगळ्या समाजाचा आय.क्यु. जवळजवळ ० ला जाऊन पोचलेला असतो!! सगळीकडे स्टुपिड आणि इडियट्सचा भरणा झालेला असतो..

Joe उठतो तोच मुळी कचर्‍याच्या ढीगार्‍यावरून.. पूर्णपणे डिसओरिएंटेड असल्यामुळे काय चाललंय काही कळत नाही.. कोणाशी बोलायला जावं तर सगळे आजुबाजुला स्लॅंग बोलणारी जनता याच्या सभ्य इंग्लिशला हसतात.. टॉयलेट सोडलं तर पाणी कुठे नाहीच! सगळीकडे प्यायलाही स्पोर्ट्स ड्रींक.. सगळी माणसं स्टुपिड झाली आहेत! साधी वाक्यं डोक्यात शिरायला ५-एक मिनिटं वेळ घेणार, मग २+३ किती हा तर फारच भला मोठा प्रश्न झाला!

२५०५ साली आवश्यक असणारा बारकोड टॅटू Joe च्या हातावर नसल्यामुळे त्याला Unscannable घोषित केलं जातं.. 2505 साली Unscannable माणूस दिसणं म्हणजे आत्ता २००८ साली डायनॉसॉर दिसणं, इतकं दुर्मिळ..!
न्यायव्यवस्था नुसतीच आंधळी नाही, तर Retarded झालेली.! Joe ला जेल मधे टाकण्यात येतं.. तिथून तो पळूनही जाऊ शकतो. मात्र तुरूंगात असताना झालेल्या एका महा-अवघड प्रश्नाचं उत्तर त्याला आल्यामुळे , त्याच्या अतिप्रचंड आयक्यु मुळे त्याला व्हाईट हाऊस मधे बोलवलं जाते..
[अती अवघड प्रश्न हाच, की एका बादलीत २ गॅलन पाणी आहे, आणि दुसर्‍या बादलीत ५ गॅलन, तर माझ्याकडे बादल्या किती!! :)))) ]

असो.. इथे काही सगळी स्टोरी नाही लिहीत मी.. ती सगळी मजा पिक्चरमधेच बघितली पाहीजे!! ४-५ वेळेला तर Rofl होईल इतकी हसले मी!!

पण हा काही कॉमेडी पिक्चर नाही.. ही तर झाली ब्लॅक कॉमेडी.. ! माणसाने बुद्धी गहाण टाकली तर अशी वेळ येईल.. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचा , मेंदूचा वापर केला नाही तर अशी वेळ येऊही शकेल..! ही वॉर्निंग नक्कीच मिळते या पिक्चरमधून!!
Signature2

टिप्पण्या

Raj म्हणाले…
chitrapaT majedar disato aahe. baghayala hava :)
Amol म्हणाले…
बर्‍याच दिवसांपासून ब्लॉकबस्टर मधे दिसला की बघायचा विचार करत होतो. आता बघायला पाहिजे. छान रिव्यू.
Unknown म्हणाले…
नक्की बघ, आणि प्लीज तुझ्या स्टाईलने परिक्षण लिही! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत! कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे.. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे.. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण! एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे.. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत! केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे! हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली! गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच.. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! .. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे.. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे.. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे...