मुख्य सामग्रीवर वगळा

"स्वच्छतेच्या बैलाला.. " च्या निमित्ताने...

तसा हा प्रचंड दुर्लक्षित विषय.. स्वच्छता, आरोग्य याच्याशी निगडीत असल्याने खरंतर भरपूर लक्ष घातलं पाहीजे.. आपल्या भारतात नसलेल्या (किंवा अती अस्वच्छ असलेल्या) स्त्रियांच्या स्वच्छतागृहांचा हा प्रश्न..

मायबोलीच्या दिवाळी अंकात अज्जुकाचा "स्वच्छतेच्या बैलाला...." हा लेख वाचला, आणि सगळं पटत गेलं..

कधी ना कधी , कुठे ना कुठे हा प्रश्न भेडसावतच असतो.. रादर, भारतात कुठेही जाताना हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.. बाहेर पड्ल्यावर कुठे टॉयलेटला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पिणं हा सगळ्यात सोप्पा आणि तेव्हढाच चुकीचा उपाय.. पण जवळ्पास सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी हाच उपाय अवलांबला असेल..

सरकार किंवा ज्यांच्या अधिकारात येतात या गोष्टी ते काही करत नाहीत.. हे तर झालंच.. पण आपण काहीतरी करू शकतो ना??? आपल्या परीने प्रयत्न.. स्वच्छतेच्या बैलाला वाचून अनेक लोकांना ते पट्लं.. आणि आता ती सर्व लोकं एकत्र येऊन या अडचणीवर काहीतरी उपाय शोधत आहेत.. उदा: एखादी शॉर्ट फिल्म तयार करून ती सगळीकडे वितरीत करणे.. लोकांच्या मनावर हॅमर करणे.. संबंधित लोकांपर्यंत हे पोचवणे, लोकल वृत्तपत्रांमधून छापणे, शाळांमधून मुलांना ट्रेन करणे, इत्यादी इत्यादी... नाहीतर, ही समस्या आहे हे लोकांना समजणारच नाही! स्त्रियाच केवळ दुर्लक्ष करतात तिथे बाकीच्यांची काय कथा..

याच कारणामुळे ज्यांना खरंच तळमळीने या प्रश्नाचा निकाल लावावासा वाटतो, ते एकत्र जमून करता येण्यासारखे उपाय करत आहेत,शोधत आहेत.... इथे ही सर्व चर्चा वाचता येईल..

सद्ध्या तरी माझ्या हातात ब्लॉगवर लिहून जमेल तितक्या लोकांपर्यंत पोचवणे इतकेच आहे.. त्यामुळे ही पोस्ट..
सर्व बायका याला रिलेट करू शकतीलच.. पुरूषांनीही अज्जुकाचा लेख वाचून पाहावा.. सर्वात बेसिक असलेली ही गरज.. पण किती वानवा आहे याबाबतीत.. फक्त भारतातच असे नाही तर इतर ठीकाणीही स्वच्छतागृहे स्वच्छ नसतात.. त्यासाठी नुस्तं सरकारने रेस्टरुम्स बांधून काही होणार नाहीए, तर तळागाळातल्या लोकांपर्यंत तो अवेअरनेस पोचला पाहीजे.. म्हणून ही सगळी धडपड..

ज्यांना खरंच हा प्रश्न सुटावा असं वाटते त्यांनी त्या चर्चेमधे सहभाग घ्यावा. निदान त्या लेखाची, चर्चेची लिंक आपल्या ब्लॉगमधे द्यावी.. जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हे पोचावं..

तेव्हढं नक्कीच करता येण्याजोगं आहे...
Signature2

टिप्पण्या

Raj म्हणाले…
सहमत आहे. जेव्हा भारतात सार्वजनिक स्वच्छता येईल तो खरोखर सुदिन ठरेल. आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे इतके वावडे का या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.
Unknown म्हणाले…
ह्म्म,खरंच वावडे आहे! घरं चकचकीत असतील, पण घराबाहेर कचरा करायला काही पाहात नाहीत लोकं! :(
बाहेरही घरच्यासारखं वागलं, स्वच्छता पाळ्ली तरच हा प्रश्न जरा तरी सुटेल..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत! कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे.. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे.. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण! एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे.. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत! केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे! हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली! गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच.. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! .. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे.. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे.. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे...