आली दिवाळी!!!
आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे.. :) तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा..
दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे.. आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे फोन.. मित्रमैत्रिणी..
दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की मी,स्नेहल,आदित्य,गजु-चिंटू असं आम्हा ५ जणांची तपासणी सूरू व्हायची.. कुठे चांगली माती आहे?? बांधकाम चालू आहे त्या बिल्डींगचे.. तिथे वीटा चांगल्या दिसतायत का कुठे? मी सगळ्यात लहान.. त्यामुळे आमचं काम लिंबू टिंबू.. उगीच आपलं मागे मागे फिरायचे.. :)) मेन काम हीच लोकं करणार..
मग माती मिळाली मनासारखी की माझं काम सुरू.. चाळणी पैदा करायची घरातून , आणि चाळत बसायचं! काय छान मातीत लोळायला मिळायचं! :P
मग इकडे आमचे आर्किटेक्ट लोकं किल्ल्यांची रूपरेषा ठरवायचे.. मग हळु हळू २-३ दिवसात किल्ला साकारला जायचा.. कुणी डॉक्टर असेल तर त्यांच्या कडून इंजेक्शनची सिरींज मिळवून त्याचं कारंजं करायचे.. मावळे साठवलेले असायचेच मागच्या वर्षीचे.. दरवर्षी त्यात भर पडायची मग.. मोहरी टाकून पाणी घालून ठेवायचं.. ( हे प्रकरण आम्हाला कधी नीट जमलं नाही! नीट सलग उगवायचीच नाही! :( ) मग नंतर, शिवाजी महाराजांना स्थानापन्न केलं जायचं.. नेहेमीचे घोळ व्हायचेच.. शिवाजी महाराजांपेक्षा शेतकरी किंवा कुत्रा मोठा वगरे.. पण तेव्हढं चालायचंच ! :P
किल्ला छान तयार झाला की मग कॉलनीमधून चक्कर मारायची.. कुणाचा किल्ला बेक्कार आहे.. कुणाचा अज्जुन झाला पण नाही.. कुणाचा फार छान झाला तर म्हणायचं, मोठ्यांनी मदत केलीय वगैरे.. असं छान सगळ्या किल्ल्यांना निकालात काढून शेवटी आपलाच लै भारी करत घरी यायचो.. :))
लहानपणी मी खूप झोपाळू होते.. (आत्ताही आहे.. फक्त आता ’खूप जास्त झोपाळू’ आहे! :D )
मला सगळे माझे मित्र-मैत्रिणी चिडवायचे, की नरक चतुर्दशीला काही तू पहाटे उठणार नाहीस !
दरवर्षी आदल्या रात्री मी ’पण’ करायचे उद्या लवकर उठायचे.. आई बाबांना सांगायचे , मला ४ ला उठवा! मी सगळ्यात आधी फटाके लावणार..!
कसलं काय? कशी-बशी ६ ला उठायचे, आणि आवरून, अभ्यंग स्नान,ओवाळून, नट्टा पट्टा करून फटाके फोडायला ७.३० वाजायचे! :)) पण सगळ्यात धीट मी.. आदित्य तर फार घाबरायचा फटाक्यांना! :)) त्यामुळे मी येई पर्यंत कुणी सुतळी-ऍटम बॉंब फोडलेले नसायचे.. त्यातल्या त्यात स्नेहल आपली लवंगी आणि लक्ष्मी फटाके फोडणार.. :) फारफार तर माळ..
मस्तपैकी २तास फटाके फोडायचे.. मग आईच्या हाका सुरू.. सगळ्यांचं आवरून झालेले असायचे. मग कॉलनीतल्या विठोबाला आणि दशभुजा गणपतीला सहकुटुंब जाऊन यायचे.. छान नवीन कपडे घातलेले.. सक्काळी सक्काळी तो फटाक्यांचा टीपीकल वास.. रांगोळ्या, दिवे,आकाश-कंदील.. वाह.. काय वातावरण असायचे.. मग दर्शन झाले की हमखास शेजारच्या स्टॉलवर डोकावायचे.. खूप लहान असताना, चंपक,ठकठक, किशोर हे ठरलेले असायचे.. मोठं झाल्यावर काही आई-स्पेशल माहेर-मेनका तसेच भविष्यवाले दिवाळी अंक , आजोबांसाठी स्पोर्ट्स-स्पेशल दिवाळी अंक अशी खरेदी व्हायची!..
मग घरी येऊन मी निवांत झोपाळ्यात बसून पुस्तकं संपवायचे काम करायचे.. आतमधे आई फराळाची ताटं करायची.. बर्याचदा नरक चतुर्दशीला शेजारी असायचेच बरोबर.. एकत्र फराळ आणि कॉफी.. :)
मग काय फुल्ल टीपी.. ! पण हे फक्त १२वी पर्यंतच.. मेल्या त्या इंजिनिअरींगवाल्यांना परिक्षा दिवाळी नंतर ठेवायला कुणी सांगितल्या गॉड नोज.. तेव्हा ते एक टेन्शन.. मला नाही आईला.. :)
संध्याकाळी परत फटाके..! काय दिवस होते राव.. फुल मजा करा.. काही त्रासच नाही.. संध्याकाळपासून फटाके उडवायला सुरवात.. मग जरा फराळ-जेवणासाठी ब्रेक.. मग ते झालं की परत रात्री आतिषबाजी पाहायला गच्चीवर जमायचे..
नम्तर लक्ष्मीपूजन म्हणजे दुपारपासून गडबड.. ! माझी गडबड म्हणजे काय घालायचे.. कसं नटायचं! :)) आई आपली आवरतीय.. सगळं सामान काढून, कशी सजावट करायची वगैरेचा विचार करण्यात बिझी.. दर वर्षी आईचं वेगळं डिझाईन असायचं.. कधी फुलांच्या रांगोळीने सजवलंय तर कधी धान्यांच्या.. कधी देवीचा मुखवटा काढलाय तर कधी साधी ठीपक्यांची.. छान सगळे चांदीचे देव,भांडी बाहेर काढून ठेवलेली.. मग पूजा सुरू.. आरतीची वेळ आली की परत आमची फटाके फोडायची घाई.. तेव्हा आवर्जुन अगदी आत्ता-आत्ता पर्यंत मी भुईनळा नाहीतर भुईचक्र लावून यायचेच!
मग सगळ्या बिल्डींगमधे आमंत्रण करायला जायचं.. पूजा झाली, प्रसादाला या.. (हळदी-कुंकूच असतं ना ते?)
मग सगळ्या काकवा(काकूज) येणार.. मग आम्ही दोघी सगळीकडे जाणार.. सगळीकडचा फराळ तर खाल्लाच पाहीजे.. !
त्यातच पोट भरून जायचं.. मग रात्री दमून लवकर झोपून जावं म्हटलं तर सगळीकडे फटाक्यांची माळ लागलेली.. कधी कधी असह्य व्हायचं.. ( आम्ही किती त्रास दिला असेल लहानपणी??)
मग पाडवा.. आई जाम खुष ! :) बाबांनी मस्त साडी घेतलेली असायची आईला.. मलाही काहीतरी.. मग बाबांना छान तेलानी चोळून चोळून मसाज करायचा.. काय ते छान सुवासिक तेल असायचे.. संध्याकाळी आजी -आजोबा बोलवून काहीतरी घेऊन देणार.. ठरलेला कार्यक्रम! :)
मग भाऊबिज!!! :) मी खुष... दादा होता भारतात तोपर्यंत तो खूप खूप त्रास द्यायचा ओवाळणी द्यायला.. कधी कधी तर हातावर नुस्ताच सव्वा रुपया.. :( मग नंतर हळूच एखादा छान फ्रॉक(लहानपणी), सायकल्ची किल्ली(थोडं मोठं झाल्यावर), किंवा स्कुटीची किल्ली,अंगठी (इंजिनिअरींगला) ठेवायचा!!
संध्याकाळी मामाकडे जायचं.. तिथेही कपिलला लुटायचं! :) खादाडी करून घरी..
घरी आलं की सगळ्यात वाईट काम असायचं.. किल्ल्याच्या बोगद्यात ऍटम-बॉम्ब लावून तो फोडणं.. तेव्हा मात्र वाईट वाटायचं.. संपली दिवाळी... :( उद्या-परवापासून सुरू तेच तेच रुटीन... किल्ला नाही, फटाके नाहीत,फराळ नाहि.. नवीन कपडे घालून मिरवणं नाही...मुळात सुट्टी नाही! म्हणजे सुट्टीमधलं कॅरम,पत्ते,व्हीडीओ गेम्स सगळं कटाप?? श्या दिवाळी अजुन मोठी का नसते वगैरे विचार ...
____________________________________________________________________
काय छान दिवस होते ते.. आता काय, तो उत्साहच नाही राहीला.. मित्र-मैत्रिणीही जवळ नाहीत.. मुळात भारतातच नाही मग काय मजा? भारतात असते तरी ती मजा राहीली नाही हे खरंच.. गेल्या ४-५ दिवाळ्या अशाच गेल्या.. लहानपणच्ं फटाके उडवणे कमी झालं.. बंदच रादर.. मित्र-मैत्रिणीही पसरले.. मग काय मजा?
ह्म्म.. असो.. असं असलं तरी दिवाळी आहे ही!! आनंदाचा उत्सव..! छान फराळ करायला घेतलाय.. बेसनाचे लाडू करून संपत आले.. :D अजुन जमेल तसं करणारच सगळं..! लायटींगच्या माळा, पणत्या, दिवे सगळं आणून ठेवलं.. घर स्वच्छ करून ठेवलंय.. दिवाळीच्या स्वागताला छान तयार झालेय..
तुम्ही झालात?
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची,भरभराटीची,सुख-समृद्धीची जावो!!

टिप्पण्या
this time I am home. Next time I wont be here. But still looking forward to Diwali big time
mast vatla comment pahun.. enjoy ur diwali at home! :)
शुभेच्छा आणि धन्यवाद ..
दिवाळीच्या वेळी, मी घरी बोलताना असा आव आणत होतो की काही जास्त वेगळॆ नाही इथे, फराळ आहे, आणि बाकी वातावरण पण सणाचे आहे halloween असल्याने...etc
आज तुझे पोस्ट वाचले आणि सगळे चित्र उभे राहिले डोळ्यासमोर...आणि प्रचंड आठवण आली एकदम सही लिहीले आहेस !
माझी दिवाळी पण almost सेम असायची..पण मला दिवाळीनंतर किल्ल्यतल्या गुहेत फटाके लावून किल्ले मोडण्यात जरा जास्तच मजा यायची :s
एकूणच मस्त आहे ब्लॉग ....हो idiocracy
वर कोणी लिहील असे वाटले नव्हते :)
idiocracy var ka nahi lihaycha ! kay bhari movie ahe! :D
Tula ani Ninad la best wishes.