The Goal !

सद्ध्या पुस्तक वाचनामध्ये ’द गोल’ चालू आहे.. अमेझिंग पुस्तक! प्रत्येकाने वाचावे असं..

थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते सर्व अफलातून आहे! वाचलीच पाहीजे ती थॉट प्रोसेस!

फर्स्ट इयर ला असताना वाचलेले हे पुस्तक.. तेव्हा बॉटलनेक म्हणजे काय तेदेखील कळत नव्हतं तेव्हा वाचलेलं.. पण तरी देखील शेवटपर्यंत वाचलं.. इतकं इंटरेस्टींग.. त्यानंतर ३ वेळा वाचलं.. दर वेळेला काही नवीन गोष्टी कळत गेल्या.. नव्याने उभारी मिळाली.. परवा इथे आल्यावर पहीलं पुस्तक विकत घेतलं ते हेच! बाबांकडे आहे हे पुस्तक.. पण माझ्या पण संग्रही पाहीजे म्हणून घेतलं.. वाचताना इतकं रिलेट करू शकले..की विकत घेतल्याचं चिज झालं..

पुस्तकात शेवटी काय होतं ते महत्वाचं नाही.. नायक आहे म्हटल्यावर तो यशस्वी होणारच.. पण कसा? त्या मागे त्याने काय कष्ट घेतले.. कसा विचार केला.. हे महत्वाचे.. सगळ्यात महत्वाची ऍटीट्युड! ’नमस्ते लंडन’ मधे अक्षयकुमार म्हणतो तसं, जोपर्यंत तुम्ही खरंच हरत नाही तो पर्यंत तुम्ही जिंकू शकता.. अगदी हेच विचार यात मांडले आहेत.. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच!

मला स्वतःला खूप काही शिकण्यासारखं मिळतं हे पुस्तक वाचून.. तुम्हालाही आवडेल.. जरूर वाचावे असं पुस्तक!
Signature2

टिप्पण्या

Dk म्हणाले…
Bhags,

Would love to read this ASAP.Can you telll me what is the price?
Bhagyashree म्हणाले…
hi deep.. thanks for the comment.
tya book chi actual kimmat ahe 24.95$. amazon var deals madhe mala 15$ la milala. pan used book agadi 1$ pasun sudha ahe.

indiat/punyat asashil tar kay deccanla, ABC la rastyavar suddha milu shakel agadi swastat.

kharach ASAP milvun vachnyasarkha book! vachlas tar sang kasa vatla.. :)
अनामित म्हणाले…
सदरचे पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे का? असल्यास कोणी प्रकाशीत केला आहे? पुस्तक वाचावयाची उत्सुकता वाढली आहे.
सुधीर
Bhagyashree म्हणाले…
माझ्या पाहण्यात आलेला नाहीये अजुन अनुवाद.. काही माहीती मिळाली तर नक्की लिहीन इथे..
अनामित म्हणाले…
Bhagyasree,
Knowing your writing Im pretty sure, you'd be able to translate the same in a very interesting ways, relating to a common man and in very simple words.
Dada
Unknown म्हणाले…
Dada,translation of the whole book? :O hehe.. karin nakki! ;)
thanks for the comment!! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!