मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

द हॅपनिंग...

मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला....    SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल.. काहीएक माहीत नसताना हा पिक्चर बघण्यात कदाचित जास्त मजा(भिती?) आहे !)  सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध..  आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात...  म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मा...

धमाल! :)

हे नवीन टेम्प्लेट भलतंच टेम्प्टींग आहे.. सारखं ब्लॉग उघडून ते बघत बसायचे..मग काय, काहीतरी खरडावसं वाटते.. असा काही संबंध असतो असं मला वाटलं नव्हतं.. पण होतंय खरं.. आजचा दिवस विशेष मस्त गेला.. हल्ली स्प्रिंग जवळ आल्यामुळे भलतंच उत्साही वगैरे वगैरे वाटू लागले आहे.. सुर्योदयाचे माहीत नाही, ते कधीच माहीत नसतं अस्मादिकांना, पण सुर्यास्त उशीरा होतोय.. आज चांगला ७.३० वाजे पर्यंत उजेड होता! येय.. आता काही दिवसांनी ९ पर्यंत उजेड.. येडपट आहेत इथली लोकं.. तुम्हालाही करतात आणि.. घड्याळं पुढे मागे करायची आणि नाचत बसायचे उशीरापर्यंत उजेड पाहून.. काय अर्थ आहे!? असो.. ५ ला अंधारून येण्यापेक्षा खूप बरंय.. आई तर वैतागून ५ लाच शुभंकरोति म्हणून दिवेलागण करायची! जाम मजा! :) मागच्या विकेंडला चक्का टांगून श्रीखंड केले .. हा बेस्ट प्रकार आहे.. हमखास बरोबर आणि मस्त होणारा.. आईकडे नशिबाने सच्छीद्र पिशवी होती, त्यामुळे तिला आम्ही चक्क्याला टांगणीला लावणे हे काम नेमून दिलेय.. ह्म्म, तर श्रीखंड तयार असल्याने जेवणानंतरच्या गोडची सोय झाली.. मला गोड दिसले की काय आनंद होतो! :O इतकं गोड खाल्यामुळे अर्थात व्यायाम मस्ट!...

माझी खाद्ययात्रा..

अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्‍याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायची.. पण मला तेव्हढी आवडच नव्हती.. दादा भारतात असताना कसं नेहेमी साग्रसंगीत पंगत असायची.. फर्माईशींची रेलचेल.. पण नंतर बंदच पडले.. असं असताना, मी इतकी बदलावे म्हणजे फारच झालं.. इतकी म्हणजे इतकी की आता मला झोपेतही भूक लागते.. सारखे नवीन पदार्थ करायचा(निदान खाण्याचा तरी) उत्साह येतो.. नवरा स्वखुषीने करून देणार असेल तर लॉटरीच! पण एकंदरीत असं आहे.. पण .. इथेही गोची आहेच.. मला स्वयपाक करायला खूप काही आवडत नाही! :( म्हणजे आवडतो.. पण तेव्हढा पेशन्स नाही.. काहीतरी उरकायचे झाले.. नशिबाने पदार्थ चांगले (?) होतात म्हणुन बरंय.. माझं एक असं.. आणि नवर्‍याची कथा वेगळीच.. त्याला दर १५ (?) दिवसांनी तरी बाहेरचे जेवण आठवते.. कितीही घरात छान केले तरी बाहेर ज...

डबा ऐसपैस !!

आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. ! हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy .. म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :) चला बर्‍याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :) ( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))

माझेही दोन पैसे..

मला खरंतर अजिबात हे पोस्ट लिहायचे नव्हते. सगळे हेच लिहीत आहेत! सारेगम लिट्ल चॅम्प्स.. रिझल्ट वगैरे. पण काही गोष्टी वाचल्या आणि डोकंच आऊट झालं! कार्तिकी जिंकली यात अपेक्षाभंगाचे दुःख्ख वाटणे मी समजू शकते. प्रथमेश, आर्या खूप डिझर्विंग होते वगैरे. पण म्हणून ते नाही जिंकले, तर किती गदारोळ!? आर्या/प्रथमेश इव्हन सुरात जरा कच्चा असणारा रोहीत जिंकला तर तो बरोबर रिझल्ट! आणि ताला सुराची उत्तम जाण असलेली, रोहीत इतकीच उत्कृष्ट परफॉर्मर असलेली कार्तिकी जिंकली , की ते राजकारण, चुकीचा निकाल, झी चे अंतर्गत राजकारण, कार्तिकीच्या पालकांनी पैसे चारले, आणि या सगळ्याच्या वरताण कडी म्हणजे, ’गायकवाड’ नाव ना तिचं!!! अरे काय चाल्लंय काय?? हा? आजच्या जमान्यात, हे असे विचार कोणी करू शकत असेल हा विचार मी या जन्मातच काय पुढच्या ७ जन्मात करू शकले नसते.. मटा मधेही यावर भरभरून लेख आले. अनेक फोरम्सवर वाद पेटले आहेत! काही लोकं तर सगळा राग त्या बिचार्‍या कार्तिकीवर काढत आहेत! तिला सगळी गाणी तरी येत होती का, कस्ला तो भसाडा आणि लाऊड आवाज, अन काय काय... अरे कमॉन, तिच्याकडे टॅलंट नसतं तर ती नक्कीच इथे नसती आली! तसं व्हायला ...

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :) ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड! ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :))) तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं! मला ...

"स्वच्छतेच्या बैलाला.. " च्या निमित्ताने...

तसा हा प्रचंड दुर्लक्षित विषय.. स्वच्छता, आरोग्य याच्याशी निगडीत असल्याने खरंतर भरपूर लक्ष घातलं पाहीजे.. आपल्या भारतात नसलेल्या (किंवा अती अस्वच्छ असलेल्या) स्त्रियांच्या स्वच्छतागृहांचा हा प्रश्न.. मायबोलीच्या दिवाळी अंकात अज्जुकाचा "स्वच्छतेच्या बैलाला...." हा लेख वाचला, आणि सगळं पटत गेलं.. कधी ना कधी , कुठे ना कुठे हा प्रश्न भेडसावतच असतो.. रादर, भारतात कुठेही जाताना हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.. बाहेर पड्ल्यावर कुठे टॉयलेटला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पिणं हा सगळ्यात सोप्पा आणि तेव्हढाच चुकीचा उपाय.. पण जवळ्पास सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी हाच उपाय अवलांबला असेल.. सरकार किंवा ज्यांच्या अधिकारात येतात या गोष्टी ते काही करत नाहीत.. हे तर झालंच.. पण आपण काहीतरी करू शकतो ना??? आपल्या परीने प्रयत्न.. स्वच्छतेच्या बैलाला वाचून अनेक लोकांना ते पट्लं.. आणि आता ती सर्व लोकं एकत्र येऊन या अडचणीवर काहीतरी उपाय शोधत आहेत.. उदा: एखादी शॉर्ट फिल्म तयार करून ती सगळीकडे वितरीत करणे.. लोकांच्या मनावर हॅमर करणे.. संबंधित लोकांपर्यंत हे पोचवणे, लोकल वृत्तपत्रांमधून छापणे, शाळांमधून ...