धमाल! :)
हे नवीन टेम्प्लेट भलतंच टेम्प्टींग आहे.. सारखं ब्लॉग उघडून ते बघत बसायचे..मग काय, काहीतरी खरडावसं वाटते.. असा काही संबंध असतो असं मला वाटलं नव्हतं.. पण होतंय खरं..
आजचा दिवस विशेष मस्त गेला.. हल्ली स्प्रिंग जवळ आल्यामुळे भलतंच उत्साही वगैरे वगैरे वाटू लागले आहे.. सुर्योदयाचे माहीत नाही, ते कधीच माहीत नसतं अस्मादिकांना, पण सुर्यास्त उशीरा होतोय.. आज चांगला ७.३० वाजे पर्यंत उजेड होता! येय.. आता काही दिवसांनी ९ पर्यंत उजेड.. येडपट आहेत इथली लोकं.. तुम्हालाही करतात आणि.. घड्याळं पुढे मागे करायची आणि नाचत बसायचे उशीरापर्यंत उजेड पाहून.. काय अर्थ आहे!? असो.. ५ ला अंधारून येण्यापेक्षा खूप बरंय.. आई तर वैतागून ५ लाच शुभंकरोति म्हणून दिवेलागण करायची! जाम मजा! :)
मागच्या विकेंडला चक्का टांगून श्रीखंड केले .. हा बेस्ट प्रकार आहे.. हमखास बरोबर आणि मस्त होणारा.. आईकडे नशिबाने सच्छीद्र पिशवी होती, त्यामुळे तिला आम्ही चक्क्याला टांगणीला लावणे हे काम नेमून दिलेय.. ह्म्म, तर श्रीखंड तयार असल्याने जेवणानंतरच्या गोडची सोय झाली.. मला गोड दिसले की काय आनंद होतो! :O इतकं गोड खाल्यामुळे अर्थात व्यायाम मस्ट! तोही चक्क झाला! त्यामुळे आजचा दिवस विशेष!
रात्री जागून चहा पीत, गाणी ऐकत, पुस्तके वाचण्याची ऐश आज अनेक वर्षांनी मनासारखी पार पडली.. ( हो, मला मल्टीटास्कींग येते.. ) वेल, पूर्वी कॉफी असायची आज फॉर अ चेंज चहा घेतला.. चांगला लागतो यावेळी चहाही, पूर्वी अनेक वर्षं उगीच दुर्लक्ष केले त्याकडे.. मायबोलीवरून बरेच दिवाळी अंक मागवले होते.. त्यातले उरले सुरले वाचायचे आहे अजुन बरेच.. काय वेळ आली आहे.. पूर्वी दिवाळी अंक म्हणजे फार शेवटच्या नंबरला असयचे वाचण्याच्या यादीत.. सद्ध्या घरात काहीच वाचायला नसल्याने उपासमार होतीय अगदी, त्यामुळे दिवाळी अंकावर समाधान मानावे लागतेय.. मराठी पुस्तके प्रचंड मिस करतेय मी! कधी एकदा पुण्याला जाऊन पुस्तकांच गठ्ठा आणतेय इथे असे झाले आहे.. :(
असो.. एकंदरीत दिवस इतका चांगला पार पडल्यावर नोंद नको करायला? म्हणुन शेवटी उघडला ब्लॉग.. आजकाल माझे खरडणे फार वाढले आहे.. काही इंटरेस्टिंग विषय असेल तरच लिहायचे वगैरे जुने झाले!
पुस्तकांवर लिहीणे हाच माझा आधी बर्याचदा छंद होता, तेच बंद झाल्याने अवघड झालेय.. आणि पिक्चर्स? इतके पाहीलेत की कशावर लिहायचे हा प्रश्नच पडलाय!
( तरी लेटेस्ट , गेल्या आठवड्यात पाहीलेले भयानक, आणि विचित्र पिक्चर्स :
२८ डेज लेटर [ बेक्कार किळसवाणा ! डॅनी बॉयल जरा पडलाय का डोक्यावर? :( ] ,
युएसएवर लागलेला, जीपर्स क्रीपर्स(२ का ३ काय होतं आठवत नाही)[भयंकर घाबरले.. त्यानंतरचा स्केलेटन की पाहायचा प्लॅन रद्द केला... ] ,
इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड [ चांगलाय, पण अती कॉन्संट्रेट वगैरे करावे लागले.. नवर्याला तर अर्धवट गेम खेळत बघितल्याने काहीही धड कळले नाही.. त्याने लगेच ब्लॉकबस्टर बंदच केले :D ].. )
आज उपक्रमवर हेलन या युरोपिअन थाटाच्या गावाबद्दल वाचून सोल्वॅंग या डॅनिश गावाबद्दल खरच लिहावेसे वाटू लागले आहे! इथे आम्ही तसे बरेच उशीरा संध्याकाळी गेलो.. तरीही आख्ख्या गावाचा तो डॅनिश लुक, ती धमाल घरं-दुकानं-हॉटेल्स पाहून वेड लागलं होतं! एकसंध आणि एकसुरी स्ट्रक्चर्स असलेल्या या देशात असं काहीतरी गिचमिडीतली घरं, तो जुना काळ पाहून फार बेस्ट वाटलं!
मी आता परत तिथे चांगलं दिवसउजेडी , भरपूर वेळ जाऊन , भरपूर फोटो काढून लिहीन..
एकंदरीत इथली भ्रमंती लिहून ठेवायचीच आहे.. मला खात्री आहे , काही दिवसांनी मी सगळं विसरेन.. काही वर्षांनी तर इथे इथे गेलो होतो हे ही विसरायला होईल.. सिरिअसली घेतलं पाहीजे..
अमेरिकेत येऊन एक फार फार चांगली गोष्ट झाली.. खूप फिरायला मिळतंय.. आकाशातल्या कोमट काळजाच्या बापाचे आभार ( ही उक्ती मायबोलीवरून साभार.. ) की आम्ही कॅलिफॉर्नियात आणि त्याहूनही एंटरटेनमेंट कॅपिटल मधे राहतोय.. बेसिकली केव्हाही फिरायला हवामान चांगले व वर्षानुवर्षं राहीलो इथे तरी संपणार नाहीत इतकी फिरायला ठीकाणं आहेत... आणि त्यानंतरचे नवर्याचे आभार.. त्यालाही नशिबाने ही आवड आहे, व मैलोनमैल ड्राईव्ह करायचा उत्साह आहे.. ( मला भरपूर फोटो काढता येतात त्यामुळे.. ) :)
आय होप, लवकरच काहीतरी भ्रमंतीवर मला लिहीता येईल..
असो.. खरडण्याचा टंकाळा आला.. बास करते आता.. पुन्हा भेटू.. शुभरात्री/शुभदिवस..

टिप्पण्या
jeeper creeper 1 pahil ahe ka?
Shoor bahin anee pedrat bhavu :)
kharadanyacha tankala tar bhareech :)
ae mi jeeper creeper cha jo kahi hota to bhag pahilyandach paahilay.. 1 pahin ata.. jara himmat aliy ase movies pahaychi.. :)
मराठी पुस्तकांना मिस्स करणं म्हणजे काय असतं हे समजू शकते मी!
आणि भ्रमंती केलीयेस ती लक्षात ठेवून लिही नक्की :)
बरं पण सारखा लिहिण्याचे टंकाळे करु नक्कोस गं( सही वाटतोय ’टंकाळा’)
jeva kharach hatat bharpur dollars khelat astil teva ghein! :) saddhyachya recession vagere paristhitit katkasar uttam ! :)
baki sarvanna dhanyavad !! :)
इथला हिवाळा अनुभवला की मगच समजू शकते की हे लोक उन्हळ्यामधे वेडे का होतात!!
माज़्या ब्लॉग वरील आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.