मुख्य सामग्रीवर वगळा

GTD - Getting things Done

सध्या प्रॉडक्टीव्हिटीचा फीवर चढला आहे तर त्या एरियातले बायबल वाचायला घेतले आहे. गेटींग थिंग्ज डन - डेव्हिड अ‍ॅलन. मला खूप आवडत आहे. जीटीडी मेथडॉलॉजीशी ओळख माझी विविध टूडू अ‍ॅप्स मुळे आधीच होती. आता मूळ मेथडॉलॉजीचा जनक त्याबद्दल काय म्हणतोय मुळात ते वाचायला छान वाटतंय.

 मुळात जीटीडीचा आधार आहे क्कोअर- म्हणजे कॅप्चर,क्लॅरिफाय,ओर्गनाईझ,रिफ्लेक्ट, एंगेज.

 १) कॅप्चरः (collect what has your attention) डोक्यातील सर्वच्या सर्व थॉट्स ओता. ह्यासाठी जीटीडीमध्ये इनबॉक्स ही फॅसिलिटी असते. त्यात अक्षरश: दिवसभरात जेजे डोक्यात येईल ते नोंदवत राहयचे. काय आहे ती गोष्ट, टूडू आहे की इव्हेंट, की जनरल ऐकलेली इंटरेस्टींग माहिती त्याच्याशी आत्ता काही देणंघेणं नाही.

 २) क्लॅरिफाय: (process what it means) म्हणजे जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा इनबॉक्स उघडून एक एक गोष्ट बघायची. ही गोष्ट्/आयटेम अ‍ॅक्शनेबल आहे की नाही? अ‍ॅक्शनेबल असेल व जर ती २ मिनिटाच्या आत करता येणार असेल तर लगेच करून टाका. दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ती त्या स्पेसिफिक कप्प्यात/ प्रोजेक्टमध्ये/ फोल्डरमध्ये ढकला. जर ती अ‍ॅक्शनेबल नसून नुसती माहिती असेल तर ती जपून ठेवण्याजोगी आहे की नाही? जपून ठेवायची असल्यास रेफरंस फोल्डरमध्ये ढकला. नाहीतर ट्रॅश करा. लगेच डिसाईड करता येत नसेल तर ती इन्क्युबेट करा. समडे/ मेबी ह्या फोल्डरला टाका.

 ३) ऑर्गनाईझ: (put it where it belongs) लिस्टा करा, फोल्डर्स करा, प्रोजेक्ट करा. त्याना योग्य त्या ड्यु डेट्स/ रिमाईंडर्स द्या. बायदवे दोन पेक्षा जास्त सबटास्क असतील तर तो प्रोजेक्ट होतो. थोडक्यात शक्य तितकं काम बारीक तुकड्यात/ अ‍ॅक्शनेबल आयटेम्स मध्ये समोर ठेवा. नुसतं डिसेंबर पर्यंत ४ पुस्तकं संपवायची हे गोल नव्हे. रोज अर्धा तास पुस्तक वाचायचे हा नीट अ‍ॅक्शनेबल आयटेम.

 ४) रिफ्लेक्टः (Review frequently) ज्या लिस्टा केल्या आहेत त्या वरचेवर तपासा.. काय सुधारणा हव्या आहेत, काही कामांसाठी इतरांची मदत हवी आहे का? किंवा अजुन काही बदल असतील तर ते करा. थोडक्यात कामं असाईन करा स्वतःला व ती होत आहेत ना हे तपासा.

 ५) एंगेज: (simply do) ज्या लिस्टा केल्या आहेत, टास्क असाईन केले आहेत ते करा  :heehee:

 थोडक्यामध्ये (असं म्हणून किती लिहीले!) एनीवे.. तर थोडक्यात तुमचे मन शांत पाहिजे. अमुक एक करायचे आहे असा नुसता विचार जरी आला तरी तुमचे सबकॉन्शस माईंड ते काम करायचे आहे असा धोसरा लावून बसतो. विचार आल्याक्षणी तुम्ही ते केले नाही तर मनासाठी ते अपयशी फिलिंग असते. कारण ते अजुन 'डन' नाहीये. त्याला डेव्हिड ओपन लुप म्हणतो. हे असे कोणतेही ओपन लुप ठेवायचे नाहीत. जे काही डोक्यात उमटले आहे ते तुमच्या सिस्टीममध्ये आले म्हणजे मन शांत होते. कुठेतरी ह्याची नोंद आहे. तुमच्या मनात उठणारे विचार व तुम्ही अ‍ॅक्चुअल करू शकलेली कामं हे इन्व्हर्सली प्रपोर्शनेट असते. मन जितके शांत तितकी कामं होतात. मनात वादळं, तुम्ही नुसतेच विचार करत राहता. कामं होत नाहीत. तर असे आहे. मला अतोनात आवडतंय पुस्तक. खूप महिने हे पुस्तक वाचायचे डोक्यात होते. (ओपन लुप! :heehee: ) ते फायन्ली आता जमत आहे. पुस्तक पूर्ण झाले की येईन परत. सध्या २०% झालेय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??